Link copied!
Sign in / Sign up
12
Shares

मासिक पाळी आणि मासिक पाळीनंतर होणारे बदल. . .


मासिक पाळी विषयी सामान्य प्रश्न प्रत्येक मुलीला माहित असायला हवेत. कारण आपल्याकडे मासिक पाळी विषयी खूप मुलींना काहीच माहित नसते. आणि ती बिचारी एकदम वयात आल्यावर तिच्या शरीरात होणाऱ्या बदलांना घाबरून जाते. आणि ह्या वयात ती भेदरल्यासारखी होऊन जाते. तेव्हा ह्या लेखमालेतून तुम्हाला मासिक पाळी म्हणजे काय ? असे सामान्य प्रश्नावर माहिती देणार आहोत. मासिक पाळी ही स्त्रियांसाठी आणि मुलींसाठी खूप महत्वाची असते. पण आपल्याकडे मासिक पाळीच्या बाबत खूपच गैरसमज आणि अस्वच्छपणे घ्यायची गोष्ट आहे. पण बऱ्याचअंशी बराच गैरसमज अनेक मुलींच्या आणि स्त्रियांच्या मनातून निघून गेला आहे. पण काही स्त्रियांनी सांगितले की, मासिक पाळीविषयी पहिल्यापासून सविस्तर सांगा. आणि सध्या सोशल मीडियामध्येही मासिक पाळी आणि सॅनिटरी पॅड विषयी खूप बोलले जात आहे. तेव्हा ह्याविषयी आणखी चांगल्या व सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न.

मुलगी वयात आल्यावर तिच्या शरीरात अनेक बदल घडतात. आणि तिच्यात हे बदल होत असताना तिलाही ह्या बदलाबाबत जाणीव व्हायला लागते. आपण हीच गोष्ट थोडं सायंटिफिक आणि सविस्तर समजून घेऊया. ह्या रचनेत अनेक अवयव आहेत जसे की – अंडाशय (ovaries), अंडनलिका (fallopian tube), गर्भाशय, योनिमार्ग आणि योनी (. अंडाशये बदामाच्या आकाराची असतात व त्यात हजारो लहान लहान बीजांडे असतात. मासिक पाळीची सुरुवात म्हणजे मुलीचे स्त्रीमध्ये रूपांतर होण्याची प्रक्रिया होय. परिणामी ती गरोदर राहून आई बनू शकते. ज्यावेळी मुलगी वयात येत असते त्यावेळी दर महिन्याला योनीमार्गातून अंदाजे ३ ते ५ दिवस रक्त वाहत असते. ह्यालाही शारीरिक क्रियेला मासिक पाळी असे म्हणतात.

मुलगी वयात आली की दर महिन्याला एक स्त्रीबीज बिजाडांतून पक्व होऊन बाहेर पडते. त्याच्या वाढीसाठी गर्भाशयात एक आच्छादनही तयार केले जाते. योग्य काळात स्त्री व पुरुषाच्या वीर्यातील पुरूषबीज व स्त्रीच्या गर्भाशयातील स्त्रीबीज यांचा संयोग होऊन गर्भ तयार होतो. पण ज्यावेळी हे स्त्रीबीज फलित होत नाही त्यावेळेस फलित ण झालेल्या बिजासहित आच्छादन बाहेर टाकले जाते. ते रक्ताच्या स्वरुपात योनीमार्गाद्वारे बाहेर टाकले जाते म्हणून हा रक्तस्त्राव होतो.

मासिक पाळी कशी येत असते

एन्डोमेट्रिअम व रक्त गर्भाशयातून होणारे उत्सर्जनआणि त्यामुळे दर महिन्याला येणारी मासिक पाळी. मासिक पाळीची सुरुवात म्हणजे मुलीचे स्त्रीमध्ये रूपांतर होण्याची प्रक्रिया होय. परिणामी ती गरोदर राहून आई बनू शकते.

आपण अगोदर स्त्री प्रजननसंस्थेची रचना कशी आहे ते घेऊ. ह्या रचनेत अनेक अवयव आहेत जसे की, अंडाशय (ovaries)अंडनलिका (fallopian tube) गर्भाशय (uterus) योनिमार्ग (cervix) आणि योनी (vagina). अंडाशये बदामाच्या आकाराची असतात व त्यात हजारो लहान लहान बीजांडे असतात, जी उघड्या डोळ्यांनी दिसत नाही.

मासिक पाळी दरम्यान अंडाशयात होणारे बदल

मासिक पाळीच्या दरम्यान गर्भाशयाच्या भिंतींवर एन्डोमेट्रियम नावाचा जाड थर तयार होतो. याच वेळी अंडाशयातून एक बीजांड अंडनलिकेतून गर्भाशयात जाते. ह्या बीजांडाचा शुक्रजंतुशी संयोग झाल्यास गर्भधारणा होण्याची शक्यता असते व एन्डोमेट्रियमचा थर गर्भाचे पोषण करतो. बीजांडांचा शुक्रजंतुशी संयोग झाला नाही तर एन्डोमेट्रियमच्या थराचा उपयोग नसतो. अशा वेळी हा थर व त्यात असलेले रक्त योनीद्वारे शरीराबाहेर टाकले जाते. ह्या प्रक्रियेस मासिक पाळी असे म्हणतात व ही प्रक्रिया ३-७ दिवसात पूर्ण होते.

मासिक पाळीविषयक असलेले काही मुद्दे

१) कालावधी मासिक पाळीच्या दरम्यान

२) मासिक पाळीवरती परिणाम करणारे घटक

३) सोनम कपूरचे तिच्या मासिक पाळीविषयीचे मत

४) मासिक पाळीत काही काम करता येत नाही का?

५) मासिक पाळी किती दिवसांनी येते ?

६) मासिक पाळीचे काही फॅक्टस/ तथ्ये

७) काही स्त्रियांची पाळी ही त्याच तारखेला का येत नाही

८) तेव्हा ह्याविषयी काही चर्चा करू जेणेकरून त्याच्या समस्या कोणत्या ते लक्षात येईल.

९) अंगावरून पांढरे जाणे

१०) मासिक पाळी का येत नाही ?

कालावधी मासिक पाळीच्या दरम्यानचा 

दोन मासिक पाळीच्या दरम्यान २८ दिवसांचा कालावधी असतो. शारीरिक दृष्ट्या प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. त्याचप्रकारे प्रत्येक मुलीची मासिक पाळी देखील वेगळी असते. मुलींच्या मासिक पाळीचा कालावधी कमी-जास्त असू शकतो. काही मुलींना १५ दिवसात तर काहींना ३ महिन्याच्या कालांतराने पाळी येते. पाळी नियमित होण्यासाठी काही वेळ लागतो.

* पहिल्या वर्षांनंतर पाळी नियमित होणे गरजेचे आहे व स्त्राव प्रत्येक महिन्यात सारखे दिवस असला पाहिजे. पाळी साधारण २८ दिवसांच्या कालांतराने येते पण हा कालावधी २०-३५ दिवस असू शकतो.

मासिक पाळीवरती परिणाम करणारे घटक

तेव्हा मुक्तपणे तुमच्या मासिक पाळीविषयी बोला. बिन्दास्त तुमच्या पाळीविषयी बोला. मासिक पाळी वरती आता खूप साऱ्या घटकांचा परिणाम पडायला लागला आहे.

* जसा की तो मानसिक ताण - तणावाचा पडत असतो. पाळी ही महिलांमधील सामान्य गोष्ट आहे. पण यावेळी महिलांमध्ये अनेक हार्मोनल बदल घडत असतात. या बदलांमुळे स्त्रियांना अनेक त्रास सहन करावे लागतात.

* अनेक वेळा मासिक पाळी अनियमित असते, या अनियमिततेमागे अनेक कारणं असतात. 

* आताच्या एका संशोधनानुसार हवेतील वायू प्रदूषणाचा सुद्धा परिणाम हा मासिक पाळीवर होत असतो. नुकतेच न्यूयॉर्कमध्ये झालेल्या एका संशोधनात वायू प्रदूषण हे तरुणींमध्ये मासिक पाळी अनियमित असल्याचे कारण असल्याचे सांगितले आहे.

* संशोधनानुसार, हवेतील वाढत्या प्रदूषणामुळे तरुणींमध्ये अनियमित मासिक पाळीचे प्रमाण वाढले असल्याचे म्हटले आहे. अनियमित झालेली मासिक पाळी पुन्हा पूर्ववत होण्यासाठी बराच वेळ लागत असल्याचे संशोधनकर्त्यांचे म्हणणे आहे.

* वंध्यत्व, मेटाबोलिक सिंड्रोम आणि पॉलीसिस्टिक अंडाशय सिंड्रोमचाही धोका वाढतो. ह्या वायू प्रदूषणाच्या सतत संपर्कात आल्याने हृदय संबंधी, फुफ्फुसांचे रोग होण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे.

मासिक पाळी काहीवेळा की चुकते ह्याची माहिती मिळवण्यासाठी ह्यावर जाऊ शकता.

https://www.tinystep.in/blog/masik-pali-chukanyachee-karane 

सोनम कपूरचे तिच्या मासिक पाळीविषयीचे मत

‘माझ्या सर्व मैत्रिणींना माझ्याआधीच मासिक पाळी आली होती, त्यामुळे मी सुरुवातीला निराश झाली होती. माझ्यात काही कमी आहे का, असा प्रश्न मी आईवडिलांना विचारायचे. पण जेव्हा वयाच्या १५ व्या वर्षी मला पहिल्यांदा पाळी आली, तेव्हा मी खूप खूश झाले,’ असे सोनम म्हणाली. मासिक पाळीच्या दिवसांमध्ये घेतली जाणारी काळजी आणि त्या दिवसांबद्दल असणाऱ्या काही समजुतींबद्दलही सोनमने काही गोष्टी स्पष्ट केल्या. अनेकांना या दिवसांत आराम करण्यास सांगितले जाते, पण आराम न करता काही काम करावे किंवा शारीरिक हालचाली करायच्या.’’

मासिक पाळी ही सामान्यतः सर्वच स्त्रियांच्या जीवनात येत असते. आम्हा अभिनेत्रींना सुद्धा ह्यातुन जावे लागत असते. म्हणून खूप ह्याबाबत निराश आणि मलाच हा त्रास होतोय असे वाटून घेऊ नका. उलट खूप खुश व्हा आनंदित व्हा. मीही माझ्या मासिक पाळीच्या वेळी आनंदित झाली होते. असे सोनम म्हणाली.

मासिक पाळीत काही काम करता येत नाही का?

मासिकपाळी चालू असताना पूर्ण विश्रांतीची अजिबात गरज नाही. अतिकष्टाची कामे करू नयेत. पण घरातील नेहमीची कामे करावीत. ज्यांना पोटदुखी किंवा कंबरदुखी याचा अधिक त्रास असेल किंवा अंगावरून जास्त जात असेल तर मात्र विश्रांती घ्यावी.

मासिक पाळी किती दिवसांनी येते ?

मासिक पाळी दर २८ दिवसांनी येते पण कोणाला २९/३० दिवसांनी तर काहींना २४/ २५ दिवसांनी असा थोडा फार फरक पडू शकतो. मासिक पाळी सुरु झाल्यानंतर सुरुवातीला ती अगदी नियमितपणे येईल असे नाही. त्यातही दोन दिवस अलीकडे-पलीकडे असा फरक पडू शकतो. पण पुढे काही दिवसांनी त्यात नियमितपणा येतो.

मासिक पाळीचे काही फॅक्टस/ तथ्ये

* मासिक पाळी ही महिन्यातून येत असते, आणि ह्यामध्ये स्त्रीच्या योनि आणि सर्विक्समधून रक्त आणि काही टिश्यू बाहेर पडत असतात.

* मासिक पाळी ही दर महिन्याला येत असते आणि तिचे एक चक्रच चालू होते.

* मासिक पाळी ही हार्मोनल गोष्ट असते, तिचा पहिला दिवस म्हणजे तुम्हाला ब्लडींग होते आणि १४ दिवसानंतर अंदाजे बीजकोष फुटून स्त्री जनन पेशी बाहेर येण्याची क्रिया सुरु होते त्यावेळी अंडे हे फर्टिलाइ झाले नसते. हॉर्मोन लेव्हल हे खाली येऊन जातात २५ व्या दिवशी आणि ३० व्या दिवशी अंडे पुन्हा तयार व्हायला लागते.

काही स्त्रियांची पाळी ही त्याच तारखेला का येत नाही ?

खूपवेळा काही स्त्रियांची पाळी त्याच तारखेला येत नाहीच. ती बहुतेकदा ३ ते ४ दिवसानंतर येते किंवा काहीवेळा येतच नाही. व ही समस्या ज्या स्त्रियांना गरोदर व्हायचे असते त्या महिलांना खूपच त्रासदायक ठरत असते. आणि ह्यामुळे ती स्त्री अस्वस्थ होते आणि तिला खूप नैराश्य येते. ती घाबरून जाते की, नेमक्या कोणत्या कारणांमुळे “माझी मासिक पाळी आली नाही.”

तेव्हा ह्याविषयी काही चर्चा करू जेणेकरून त्याच्या समस्या कोणत्या ते लक्षात येईल.

* योनीमार्गामधून किंवा गर्भाशयाच्या पोकळीतून येणारा पांढरा आणि पिवळ्या रंगाचा चिकट द्रव वाहणे म्हणजे “अंगावरून पांढरे जाणे” असे म्हणतात.

* मासिक पाळी येण्याअगोदर आणि बीजकोषातून बीजांड बाहेर पडण्याच्या वेळी या स्त्रावात वाढ होते. त्याचबरोबर लैंगिक उत्तेजना ह्या गोष्टीमुळेही अंगावर पांढरे जात असते. पण जर इतरवेळी अतिप्रमाणातील अंगावर जाणे होत असेल तर ते अयोग्य आहे. पिवळ्या किंवा दुधी रंगाचा घट्ट स्त्राव असेल तर ते संसर्ग झाल्याचे लक्षण आहे. अशा स्त्रावात पू समाविष्ट असू शकतो.

* स्त्रियांना पॉलीसिस्टीक ओव्हेरियन डिसीज नावाचा प्रत्येक शंभरपैकी दहा स्त्रियांना आरोग्याच्या समस्येला तोंड द्यावे लागते. पीसीओसी ही समस्या हार्मोन्स म्हणजेच “संप्रेरकांच्या असंतुलनामुळे” होते ज्यामध्ये टेस्टॉस्टेरॉनची पातळी अचानक वाढते आणि या विकाराची काही लक्षणे दिसू लागतात.

* ह्याचा मासिक पाळीवर असा परिमाण होतो की, : पीसीओसी असणाऱ्या स्त्रियांमध्ये अचानक वजनवृद्धी होताना दिसते तसेच ओटीपोटाच्या वेदना, नैराश्य आणि अनियमित मासिक पाळी असे त्रास होतात.

* काही रुग्णांमध्ये पीसीओडीमुळे गर्भधारणा होण्यासही अडचणी निर्माण होतात. (ह्याविषयी PCOD म्हणजे काय? खाली दिलेल्या लिंकवर जाऊ शकता. )

 https://www.tinystep.in/blog/pcod-mhanje-kay-v-tyva-upay

* मासिक पाळीत काही स्त्रियांना अतिरक्तस्त्राव होतो. मासिक पाळी नियमित येते; परंतु प्रचंड प्रमाणात रक्तस्त्राव होतो. काही स्त्रियांमध्ये सहा ते सात दिवस अंगावरून जाते त्यामुळे मासिक पाळीत अशक्तपणा आणि इतरही आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते.

* रक्तस्त्रावातील दुर्गंधी अनेक महिलांना मासिक पाळी दरम्यान आणि नंतर रक्तस्त्रावास दुर्गंध येण्याचा त्रास होतो. स्वच्छता बाळगूनही अनेकदा हा त्रास होत असल्याचे आढळून आले आहे.

* सर्वसाधारणपणे योनीस्त्रावाला कोणताही वास नसतो, पण वास येणारा रक्तस्त्राव हाच व्यवस्थित येणारी मासिक पाळी आणि चक्र बिघडलेली मासिक पाळी यातील फरक आहे. मासिक पाळीदरम्यान येणारा खराब वास ही गंभीर समस्या आहे. योनीमार्ग किंवा गर्भाशयात असणार्‍या संसर्गामुळे हा वास येऊ शकतो.

मासिक पाळी न येण्याचे कारणे

* मोठ्या शहरांमध्ये, जसे की, मुंबई व पुण्यामध्ये बऱ्याच स्त्रिया जॉब करत असतात आणि त्यामध्ये त्यांची दिनचर्या ही खूपच प्रमाणात बदलल्यामुळे. इतर स्त्रिया ह्या नोकरी किंवा कुठे काम करत नसतात तरी सुद्धा बाळाची देखभाल करणे, त्यासाठी रात्री - बेरात्री उठणे, त्यामुळे तुमचीही दिनचर्या विस्कळीत होत असते. आणि अशावेळी तुम्हाला रात्री झोप लागत नाही. अखेरीस ह्या सर्व गोष्टींचा परिणाम हार्मोन्स असंतुलनावर होऊन तुम्हीही ह्या समस्यांच्या जाळ्यात अडकून जातात. आणि मासिक पाळीमध्ये अनियमितता येऊन ती येत नाही किंवा उशिरा येते. 

* खूप कमी वजन असण्याचा सुद्धा मासिक पाळीवर परिणाम होत असतो. 

ह्याविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी ह्या ठिकाणी जाऊ शकता. https://www.tinystep.in/blog/masik-pali-ka-yet-nahi-bhag-2

हॅलो मॉम्स... आम्ही तुमच्यासाठी एक खुशखबर घेऊन घेऊन आलो आहोत.

Tinystep ने तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी नैसर्गिक घटक असलेले फ्लोर क्लिनर लॉन्च केले आहे. जे तुम्हांला आणि तुमच्या बाळाला जंतूंपासून आणि हानिकारक केमीकल्स पासून दूर ठेवेल. चला तर मग जंतूंना आणि हानिकारक केमिकल्सला नाही म्हणूया... हे फ्लोर क्लिनर वापरून बघा आणि तुमची प्रतिक्रिया आम्हांला कळवा. तुम्ही हे फ्लोर क्लिनर इथे ऑर्डर करू शकता

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon