Link copied!
Sign in / Sign up
7
Shares

पैलवान मसाज का करतात ?

          तुम्ही दिवसभर घरातली कामे करत, बाळाच्या मागे धावणे, घराबाहेरची कामे करणे ह्या गोष्टींमुळे खूप पाय दुखायला लागतात. आणि ह्यावेळी मसाज हा खूप कामास येतो. त्यासाठी पैसेही लागत नाहीत. अशावेळी पायांच्या तळव्यांची नियमित काळजी घेतल्यास तळव्यांचा कोरडेपणा दूर होतो. त्यासाठी तिळाच्या तेलाने नियमित मालिश करणे गरजेचे आहे. तेलाने कोरडेपणा दूर होऊन अंगात तरतरी येत असते. तुम्ही नवऱ्यासाठी मसाज करत असतात तेव्हा नवऱ्यालाही तुमची मालिश करायला सांगा. तुमच्यात प्रेम तर वाढेलच आणि दररोजच्या कामातून काहीतरी विश्रांती मिळेल. आणि त्यामुळे झोपण्यापूर्वी नियमित पायाच्या तळव्यांना मालिश केलेली उत्तम असते.

* अनेकदा उठता-बसताना, काहीवेळेला चालताना सांध्यातून आवाज येतो. तो आवाज येत नाही. वाताचे आजार असतील तर तेही दूर होतात. शरीरातील उष्णता कमी होते.

* अनेक ज्येष्ठांना झोपेचा त्रास होतो. कितीही केल्या त्यांना झोप लागत नाही त्यामुळे त्याचा चिडचिडेपणा वाढतो. त्या ज्येष्ठांनी नियमित पायाच्या तळव्यांना मालिश केल्यास झोप चांगली लागते.

* पायाला भेगा पडल्या असतील तर पाय कोमट पाण्याने स्वच्छ धुऊन ते कोरडे करावेत आणि तळव्यांना मालिश करावी, पायाच्या भेगा भरून येतात.

* काहीवेळेला ज्येष्ठांमध्ये आरोग्याच्या समस्यांमुळे चिडचिड वाढत जाते. छोट्या-छोट्या गोष्टीत हळवे व्हायला होते. अशावेळी मालिश हा त्यांच्यासाठी सर्वोत्तम उपचार आहे.

* वयोमानानुसार काही गोष्टी विसरायला होतात, पण जर मालिश पायांना नियमित केल्यास स्मरणशक्ती सुधारण्यासाठी मदत होते.

* चिंतेत असाल तेव्हा मसाज करा तणाव दूर होईल.

* तुम्हाला जर मस्क्युलर, जॉईन्ट चे दुखणे असेल तर ते दूर करते.

* रक्तदाब ला  व्यवस्थित ठेवतो.

* इम्यूनिटी सिस्टिम ला बूस्ट करते.

* आपल्याला झोप देखील चांगली लागते.

* तळव्यांची खूप जळजळ होत असेल तर तळपायाला दुधाने मालिश करून जेष्ठमधाचा दुधातून लेप केल्यास मधुमेहामुळे होणारी जळजळ कमी होते.

* दिवसभर बाहेर जाताना तुम्ही सॅंडल, टाचेची चप्पल, वापरतात,  त्याने पायांच्या तळव्यांपर्यंत रक्तप्रवाह होत नाही. त्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत करण्यासाठी पायांची मालिश करणे गरजेचे असते. झोपण्या अगोदर पायांच्या तळव्यांना पंधरा ते वीस मिनिटे चांगली तेलाने मालिश/ मसाज करावी. त्यामुळे रक्तपुरवठा सुरळीत होतो, मधुमेहींना याचा त्रास जाणवतो. त्यांनी रोज झोपताना मालिश केलेली उत्तम आहे.

* प्रचंड थकवा जाणवत असेल आणि कामाचा प्रेशर असल्यास झोपण्यापूर्वी तेलाने मालिश केल्यास शांत झोप लागते.

* पाय खूप दुखत असल्यास रात्री झोपताना कोमट पाण्याने पाय धुवायचे. नंतर पायांना तेल लावून चांगली मालिश करून घ्यायची. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon