Link copied!
Sign in / Sign up
193
Shares

मानेचा भाग उजळ करायचा हे उपाय करा

मान हा शरीराचा शक्यतो न झाकला जाणारा असणारा भाग आहे. आणि या भागावर सुर्यप्रकाश थेट पडत असतो. त्यामुळे हा भाग हळू-हळू काळपट होतो. तसेच हा भाग काळा होण्यामागे आरोग्यविषयक काही कारणे देखील असतात. हा काळपट पण घालवणे तसे अवघड असते. परंतु महागडी केमिकलयुक्त सौंदर्य प्रसाधने वापरण्यापेक्षा काही घरगुती उपाय या समस्येवर करता येणे सहज शक्य आहे. हे घरगुती उपाय कोणते हे आपण पाहणार आहोत.

१. लिंबाचे ब्लिचिंग

लिंबू हे सगळ्यांच्या स्वयंपाक घरात सहज आढळते. लिंबामध्ये ब्लिचिंग करणारे घटक अढळतात. यात नैसर्गिकरित्या सायट्रिक ऍसिड असते. यामुळे तुमची काळवंडलेली त्वचा उजळू शकते. याकरता लिंबाचा रस आणि गुलाब पाणी एकत्र करा. आणि झोपण्यापूर्वी मानेवर लावा. आणि ते रात्रभर तसेच राहू द्या आणि सकाळी धुवा तुम्हांला नक्कीच फरक जाणवेल.

२. ओटस

ओट्स हे फक्त खाण्यासाठीच चांगले नसतात. तर हे तुमच्या काळवंडलेल्या मानेला सुद्धा उजळायला मदत करतात. ओट्स मध्ये देखील असे काही घटक असतात जे त्वचा उजळण्यास मदत करतात. मानेचा काळपटपणा घालवण्यासाठी टॉमेटो आणि पाणी व ओटस यांचे स्क्रब तयार करा आणि त्याने त्वचा स्क्रब करा. त्यानंतर मान धुवा आणि मॉश्चराइजर लावा.

४. संत्र्याचे साले

संत्र्यामध्येक जीवनसत्वामध्ये अँटिऑक्सिडंट असते. आणि ते त्वचा उजळण्यास उपयुक्त असते. तसेच त्वचेचा पोत सुधारण्यास देखील त्याची मदत होते. तसेच संत्र्यातील इतर घटक तुमच्या त्वचेला तजेला देतात आणि त्वचेचं पॉट सुधारून त्वचेचं आरोग्य राखतात. संत्र्याच्या सालाची पावडर दुधात मिक्स करा आणि ती पेस्ट चेहऱयावर लावा आणि ती थोड्यवेल तशीच मानेवर/चेहऱयावर राहू द्या. आणि नंतर धुवून टाका. लवकरच फरक जाणावेल

४. काकडी

काकडी मध्ये असे घटक असतात, जे तुमची त्वचेवरचा मृतपेशींचा थर काढून टाकण्यास मदत करतात. आणि तुमच्या त्वचेचा पोत सुधारून उन्हामुळे आलेला काळपट पण कमी करतात . तसेच काकडी त्वचेत,शरीरात थंडावा आणते. काकडी किस आणि तो किस थोड्या वेळ मानेवर लावा आणि धुवून टाका.काही दिवसात मानेवरचा काळपट पण कमी होईल सारखी सर्दी होण्याची प्रकृती असणाऱ्या व्यक्तीने हे करताना काळजी घ्यावी.

५. कोरफड

कोरफडीचे त्वचेविषयक अनेक उपयोग असल्याचे सिद्ध झाले आहे. कोरफड ही काही कारणाने काळवंडलेली त्वचा उजळ करतेच आणि काही त्वचेवर काही डाग असतील तर ते सुद्धा घालवते. कोरफडीच्या पाच गर घेऊन तुम्ही मानेला लावू शकतात. हा गर वीस मिनिटे मानेवर तसाच ठेवा आणि नंतर धुवा. काही दिवसात नक्कीच फरक जाणवेल. 

Click here for the best in baby advice
What do you think?
100%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon