Link copied!
Sign in / Sign up
5
Shares

मांडे कसे तयार करतात रेसिपी (व्हिडिओ)

मनातल्या मनात मांडे खाल्ले, मनातले मांडे मनातच जिरले ही म्हण प्रत्येकाने नक्कीच ऐकली असेल. पण हा मांडे  प्रकार असतो तरी काय? पुरणपोळीसारखं काहीतरी असतं असं बरेच जण सांगतात.  तर हा प्रकार नक्की काय आहे हे आपण पाहणार आहोत. हा एक लोप पावत चाललेला खाद्य पदार्थ आहे. खान्देशात हा प्रकार खूप प्रसिद्ध आहे. 

व्हिडीओ स्रोत -संदीप जाधव 

मांड्यांचे सारण आपण पुरणपोळीचे करतो तसेच करतात. चण्याची डाळ धुवुन (चुलीवर) शिजत ठेवतात, शिजली की मोठ्या चाळणीवर ओतुन पाणी पुर्णपणे काढतात आणि मग परत (चुलीवर ) गॅसवर चढवुन तिच्यात गुळ घालुन गुळ शिजेपर्यंत आणि सारण थोडे सुकेपर्यंत ढवळत राहतात. गरम असतानाच पाट्यावर/ मिक्सरवर एकदम बारीक वाटतात. 

पुरणपोळीचा मैद्याच वापर करतात पण मांडण्यासाठी बहुतांश गव्हाचा वापर करतात. गहू दळून आणून किंवा गव्हाचे पीठ  वस्त्रगाळ करुन घेतात आणि वापरमग हवे तितके पिठ घेऊन थोडे तेल घालून, मीठ घालुन पाण्याने भिजवायचे. मीठ अगदी नेमके, योग्य प्रमाणात घालायला हवे, कारण कमी पडले तर मांडा करताना मोडतो. साधारण पोळ्यांसाठी भिजवतो तसे भिजवायचे नीमग त्याला तासभर तरी तेल लावुन  फिरवत तिंबत बसायचे. तासाभराने अगदी मैद्याच्या पिठासारखा पोत आणि लवचिकपणा येतो या पिठाच्या गोळ्याला. सारणापेक्षा पिठ निट जमणे अवघड आणि जिकरीचे असते.  रोजच्याच चुलीवर खापर ठेऊन मांडे भाजायचे. हे खापर म्हणजे खास मांडे भाजण्यासाठी बनवलेलेल मातीचे भांडे

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon