Link copied!
Sign in / Sign up
10
Shares

मैदा आणि मैद्याचे पदार्थ खाताय ? हे नक्की वाचा

          आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या आहारात रोज थोडे का होईन मैद्याचे प्रमाण असते. मैद्यापासून बनलेले अनेक पदार्थ स्वादिष्ट लागतात. उदा- बिस्कटे, ब्रेड, समोसा,केक,रोटी, नान इत्यादी. पण तुम्हांला माहिती आहे का अति प्रमाणातील मैद्याचे आणि मैद्याच्या पदार्थचे सेवन हे तुमच्या आरोग्यस घातक ठरू शकते. मैदा आणि मैद्याचे पदार्थ हे कश्या प्रकारे आरोग्यस घातक ठरू शकतात हे आपण पाहणार आहोत..

१. वजन वाढते.

जास्त प्रमाणात मैदा सेवन केल्याने शरीराचे वजन वाढून लठ्ठपणा वाढतो एवढेच नव्हे तर कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते.

२. पचनविषयक समस्या

मैदा हा पचायला जड असतो त्यामुळे मैद्याच्या आणि त्या पासून बनलेल्या पदार्थच्या सेवनाने पचनविषयक समस्या निर्माण होतात.

३. मलविषक तक्ररी निर्माण होतात.

मैद्यमध्ये फायबर नसल्यामुळे सततच्या मैद्याच्या पदार्थाच्या सेवनामुळे व त्यामुळे मल घट्ट होतो व इतर मलविषयक समस्या निर्माण होतात.

४. ऍलर्जी होण्याची शक्यता

मैद्यात असलेल्या ग्लूटनामुळे खाद्यपदार्थ मऊ व चिवट बनतात परंतु हा ग्लूटना पोटाशी संबंधित ऍलर्जी निर्माण करू शकतो.

५. संधिवात आणि , हाडे कमजोर होणे.

जेव्हा रक्तातील साखर वाढते, तेव्हा रक्तातील ग्लुकोज गोठण्यास सुरवात होते, नंतर शरीरात रासायनिक प्रक्रिया होते आणि त्यामुळे संधीवाताची समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. तसेच मैदाचे पीठ बनवताना त्यातील फायबर पूर्णपणे नाहीसे करतात त्यामुळे या पिठापासून बनलेल्या पदार्थसतत सेवन केल्यामुळे हाडातील कॅल्शियम कमी होऊन हाडे कमजोर होतात.

६. मधुमेहाचा होण्याची शक्यता वाढते. 

मैदा खाल्ल्याने साखरेची पातळी लगेच वाढते कारण मैद्यात खूप उच्च ग्लिसमिक निर्देशांक असतो. म्हणून जर आपण जास्त मैदा खाल्ला तर मग आपल्याला स्वादुपिंडाची तक्रार सुरू होतात आणि परिणामस्वरूप मधुमेह होण्याची शक्यता वाढते. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon