Link copied!
Sign in / Sign up
14
Shares

स्त्रियांच्या स्वच्छतेसाठी पाच नैसर्गिक घटक

स्त्रियांच्या आरोग्यामध्ये त्यांची शाररिक स्वच्छता चांगली राखणे हे अत्यंत महत्वाचे असते. काही स्त्रिया त्यांच्या गुप्तांगाची स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतात,चुकीचे साफ करतात. खरंतर योनीची स्वत:ची अशी स्वच्छता यंत्रणा असते,जी आपण बर्‍याचदा साबण किंवा बॉडी वॉश वापरून खराब करतो. यामुळे योनीतील चांगले पीएचचे संतुलन बिघडवतो. योनीच्या स्वच्छतेसाठी कोमट पाणी पुरेसे असते. तथापि हे काही वेळा पुरेसे नसते. स्त्रियांच्या स्वच्छतेसाठी बाजारात विविध उत्पादने उपलब्ध आहेत. शरीरातील अत्यंत नाजूक भागावर हे रासायनिक घटक निवडण्यापेक्षा निसर्गात पूर्वीपासूनच उपलब्ध असलेले घटक वापरल्यास दिर्घकाळ स्वच्छता राखता येते. हे घटक नेमके कोण-कोणते हे आज आपण जाणून घेऊ :

१. कोरफडीचे जेल

कोरफडीमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीला प्रतिबंध करणारे घटक उपलब्ध असतात. याशिवाय कोरफडीच्या गराने ती जागा एकदम मऊ राहते त्यामुळे योनीच्या स्वच्छतेसाठी हा गर उपयुक्त ठरतो. कोरफडीच्या पानातून काढलेला ताजा गर शक्यतो वापरावा. (पॅकबंद जेल वापरण्याची खात्री देऊ शकत नाही कारण त्यात काही अंश रसायनांचा समावेश असू शकतो.) यामध्ये दोन चमचे कोमट पाणी घाला आणि तुमच्या कडे संपुर्ण नैसर्गिक जेल तयार आहे. ज्यानी तुम्ही ती जागा स्वच्छ करू शकता.

२. दही

एखाद्यावेळी जेव्हा तुमच्या योनीला कुठला संसर्ग झाला असेल तेव्हा दह्याचा वापर करा. शीतकपाटात ठेवलेले दही हा संसर्ग कमी करण्यास मदत करेल. योनीमधील संसर्गावर दही लावल्यास तेथे चांगल्या बॅक्टेरियाची वाढ होते आणि संसर्ग कमी होतो. सबंधित जागेवर दही लावून एक तासाने कोमट पाण्याने स्वच्छ धुवावे. संसर्ग कमी झालेला दिसेल.

३.लिंबाची पाने

लिंबाची पाने रोगप्रतिकारक असून ते योनीतील पीएचचा समतोल राखण्यास मदत करते आणि दुर्गंधी दूर करते. योनी साफ करण्यासाठी लिंबाची पाने सहज उपयोगात आणू शकता. लिंबाची पाने बारीक चिरून पाण्यात ती मऊ होईपर्यंत आणि पाणी हिरवे दिसेपर्यंत उकळवावी. ते पाणी गाळून ते थंड होईपर्यंत थांबा. हे मिश्रण योनी स्वच्छतेसाठी अतिशय उपयुक्त आहे. हा उपाय करण्या अगोदर या पानांची स्वत:ला अ‍ॅलर्जी आहे का नाही हे डॉक्टरांकडे जाऊन तपासा.

४.मेथीचे दाणे

मेथीचे दाणे पाच सहा दाणे पाण्यात उकळून याने योनी धुतली तर ती स्वच्छ होते.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

We have a great opportunity for you. You can EARN up to Rs 10,000/- every month right in the comfort of your own HOME. Sounds interesting? Fill in this form and we will call you.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon