Link copied!
Sign in / Sign up
27
Shares

माहेरी गेल्यावर आईच्या भेटीत तुम्ही काय -काय करतात !

 

आई म्हणजे एक सुपरवूमन, मल्टी-टास्कींग करणारी ब्युटी क्वीन! तिच्याबद्दल बोलायचं तर अशा हजार गोष्टी आहेत ज्या आपण बोलू शकतो. ती आपला पहिला ‘वूमन क्रश’ असते आणि जिच्यावर आपण आयुष्यभर प्रेम करू अशी ती एकमेव स्त्री असते.

या आहेत काही अशा गोष्टी ज्या आपण आपल्या घरच्या या प्राईम मिनिस्टरला भेटायला जाताना आपल्या डोक्यात येतात. चला, आमच्याबरोबर थोडसं तुम्हीदेखील आठवणीत रममाण व्हा.

१) खरेदी

जेव्हा तुम्ही लहान होता, तुम्हाला असं नाही का वाटायचं की आपले आई-बाबा जगातले सगळ्यात मोठे श्रीमंत आहेत! तुम्हाला जे काही हवं किंवा गरजेचं असायचं ते सगळं ते घेऊ शकायचे. तुमच्या गरजा तेव्हा खूप छोट्या असायच्या, उदा. एखादी कॉफी किंवा केक. पण असं वाटायचं की त्यांच्याकडे जगातला सगळं पैसा आहे. तरीही, ते तुम्हाला तिला थोड्याशा शॉपिंगसाठी बाहेर काढण्यापासून थांबवत नाही, नाही का! फक्त (तुम्ही दोघी) माय-लेकी!

२) घरचं जेवण!

ती सगळ्यात बेस्ट बिर्याणी बनवते आणि बटाट्याची भाजीदेखील! तिच्या चपात्या नेहमीच गोल आणि मऊ असतात. तिच्या हातात जादू आहे आणि तिला स्वयपाकघरात काम करताना बघणं म्हणजे पर्वणी असते! ती तिच्या घराची राणी असते आणि ही (महा)राणी आणि ती जेवण/खाद्यपदार्थ आत्तापर्यंत कधी बनलेच नसतील इतके चविष्ट बनवते. पौष्टिक आणि स्वादिष्ट जेवण हे तर घरी गेल्यावर ठरलेलंच.

३) आईबरोबर स्वयपाकघरात

तिच्याबरोबर वेळ घालवणं म्हणजे तिच्याबरोबर स्वयपाकघरात वेळ घालवणं हेदेखील आलं. जेव्हा तुम्ही लहान होता तेव्हा कट्ट्यावर बसलेल्या तुम्हाला ती तुमचा वेळ जावा म्हणून स्वयपाक करता करता गोष्टीदेखील सांगायची. जेव्हा तुम्ही मोठे झाल्यावर ती तुम्हाला खायला काय हवय ते विचारायची आणि तिनेच तर तुम्हाला तुमच्या आवडत्या गोष्टी बनवायला शिकवलं. या घरच्या तरबेज ‘शेफ’बरोबर स्वयपाक करणं तुम्हाला नेहमीच आनंद देईल आणि जेव्हा तुम्ही घरी जाणार असाल, तेव्हा तुम्हाला तिचे ‘मास्टरशेफ’ क्लासेस आठवतील.

४) आईबरोबर गॉसिप

तुमच्या बेस्ट फ्रेंडलाही मागे टाकणारी गॉसिप क्वीन म्हणजे तुमची आई. शेजारी-पाजारी सुट्टीला कुठे जाणार इथपासून तुमच्या (चुलत)

बहिणीला सध्या कशाने झपाटलंय इथपर्यंतची सगळी माहिती तिला असायची. गॉसिप करताना होणारे तिचे हावभाव यामुळे ती खूप गोड दिसणं ही तिची नॉस्टॅल्जिक (nostalgic) करणारी आठवण आपल्याला नेहमीच तिला भेटायला जाऊन पुन्हा एकदा चहा घेत तसच गॉसिप करावसं वाटायला लावेल.

५)  तिच्या ‘फेवरेट रेस्तराँ’ला जाणं

आपण आपल्या आईबरोबर विंडो किंवा ग्रोसरी शॉपिंगनंतर किंवा एखाद्या दुकानदाराशी चांगली घासाघीस केल्यानंतर किंवा सहज एखाद्या संध्याकाळी चाट खायला म्हणून जावं असं एखादं तरी रेस्तराँ असतच. हे रेस्तराँ आपल्या आईबरोबरच्या बऱ्याच आठवणींत असतं. ते म्हणजे खाणं आणि (बिनशर्त) प्रेम असलेलं एक विशेष ठिकाण असतं. आपल्या आईला भेटताना दोघींनी मिळून जिथे गेलंच पाहिजे असं.

६) लहानपणच्या आठवणी

तुम्ही घरी गेलेले आहात आणि तुम्ही फोटो अल्बम उघडला नाही असं बहुधा होतच नाही. तुमच्या लहानपणच्या एम्बॅरसिंग (embarrassing) गोष्टी लोकांना सांगायला आणि तुम्ही नुकतेच चालायला लागलेले असतानाचे, गोंडस अर्धनग्न अवस्थेत रांगणाऱ्या तुमचे फोटो लोकांना दाखवायला तिला खूप आवडते. मांडीवर ठेवलेल्या अल्बममधले ते फोटो बघता बघता घरी गेल्यानंतरचं तुमचं भूतकाळात रममाण होणं हे नक्कीच.  

७) मराठी सिरियल्स   

सगळ्या आयांमधली एक कॉमन गोष्ट म्हणजे TV वरचे कार्यक्रम. तुम्ही बघता त्या ‘TV शोज्’ची लिस्ट ही तुमच्या वाणसामानाच्या लिस्टपेक्षा नक्कीच मोठी असते. आणि मग आत्ताच्या एपिसोडमध्ये त्यातल्या मुख्य अभिनेत्रीने कोणते कपडे घातले, तिच्या दुष्ट सासूने काय केलं यावरची चर्चा ही इतर कशाहीपेक्षा महत्वाची असते. हे नेहमीचे विषय तर तुमच्या भेटीत नक्कीच येणार.

८)  काम सांगणे

खरं सांगा, तुम्ही तिचा नॅगिंग (nagging) मिस करता कि नाही? ‘तुझी खोली साफ कर’, ‘जाण्यापूर्वी सगळ्या गोष्टी तयार ठेव,’ ती तुम्हाला शंभर गोष्टी करायला सांगायची. हे त्यावेळी नॅगिंग किंवा टोचून बोलल्यासारखं वाटत असेल पण आता जेव्हा तुम्ही मागे वळून पाहता, तुम्ही ते थोडं ‘मिस’ करता. ‘खबरदारी घेणं नंतर उपाय करण्यापेक्षा चांगलं (Precaution is better than cure)’ हे तिचं वाक्य तर आता तुमचंदेखील फेवरेट वाक्य आहे, होय ना?

९) आराम करायची वेळ

जेव्हा तुम्ही तुमच्या आईला भेटायला जाता, तुम्ही फक्त तिला भेटण्याचा प्लॅन बनवत नाही तर तिच्याबरोबरचं संध्याकाळी फिरायला जाणं, चाट खाण्याची तिच्याबरोबर लावलेली स्पर्धा, आळसावलेल्या दुपारी काउचवर बसून चिप्स खाणं हे सगळंच तुम्ही प्लॅन करता. ही तुमची स्वत:ची हक्काची सुट्टी असते जिथं तुमचं घर हे हॉटेल आणि तुमची आई तुमची ‘स्टार शेफ’ जी लाड-कोडाने तुम्हाला बिघडवून टाकते.

१०)  आणि मुख्य म्हणजे, तिच्या‘बरोबर’ असणं

जेव्हा तुम्ही तुमच्या आईला भेटता, तुमच्या डोक्यात फक्त तिचेच विचार असतात. तिचं स्मित, तिचं हसणं, तिचं प्रेम आणि निरपेक्ष काळजी. तुम्ही घरी पोचल्यावर तिनं तुम्हाला मिठी मारणं तुमच्यासाठी आश्वासक अशी सुरक्षिततेची भावना असते. तुम्ही फक्त तिच्या आसपास जरी असला तरी तुम्हाला निश्चिंत करण्याची किमया तिला येते.

तर, वेळ झालीय! अशी वेळ की आपण जावं आणि आपल्या या प्रिय आईला भेटावं. तिनं खूप काळ आपली काळजी घेतली आहे आणि खरतर ती अजून घेतेच आहे. तिला एकदा तुमच्या भेटीचं सरप्राईज द्या!Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

We have a great opportunity for you. You can EARN up to Rs 10,000/- every month right in the comfort of your own HOME. Sounds interesting? Fill in this form and we will call you.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon