Link copied!
Sign in / Sign up
2
Shares

महाशिवरात्री का साजरी केली जाते ?


आज महाशिवरात्री आहे. शिव हा देव खूप लोकांना आवडत असतो. शिव हा स्त्रियांचा सुद्धा आवडता देव आहे. माघ कृष्ण चर्तुदशी ही तिथी ‘महाशिवरात्री’ म्हणून ओळखली जाते. देवांचे देव आणि तिन्ही लोकांचे स्वामी महादेव असे शिव ला मानले जाते. ह्याबाबत असे म्हटले जाते की, महाशिवरात्रीमध्ये भगवान शंकर पृथ्वीच्या जवळ येऊन तमोगुणांचे ते प्राशन करतात.

तुम्ही सोमवारचे व्रत करत नसाल पण ह्या दिवशी तुम्ही शिवाची आराधना केलीत तर भगवान शंकर प्रसन्न होतात आणि शिवभक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते. काही दंतकथेनुसार समुद्र मंथनातून निघालेले हलाहल याच दिवशी शंकरांनी प्राशन केले होते आणि जगाला विनाशापासून वाचवले.

पण काही पुराणानुसार या दिवशी शिव आणि पार्वतीचा विवाह झाला होता. महादेवांनी या दिवशी तांडव नृत्य केले होते आणि महादेवांना शांत करण्यासाठी आणि भूलोकाचा विनाश टाळण्यासाठी लोकांनी प्रार्थना केली होती.

या दिवशी महादेवांनी शिवलिंगाचे रुप धारण केले होते. महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री १२ ते ३ या प्रहरात महादेवांचा जागर आपल्याकडे केला जातो.

शंकराला बेलपत्र, रुद्राक्ष आणि नंदी बैल प्रिय आहेत म्हणून त्याला ते अर्पण केले जातात. या दिवशी शंकरांच्या पिंडिवर अभिषेक केला जातो. त्याला बेलपत्र पांढरी फुले, धोत्रा, आंबा यांची पत्री आणि भस्म अर्पण केला जातो.

शिव हे तमोगुणाचे प्रतिक दैवत आहे. या महाशिवरात्रीच्या काळात तमोगुणांचा अंगिकार शिव करत नाहीत, त्यामुळे तमोगुणांचा प्रभाव वाढतो.

आपल्यामध्ये तमोगुण येऊ नये म्हणून शिवाची आराधना करतात. आणि शिवरात्री ही ह्याच उपासनेसाठी असते. आणि तुम्हाला उपासना तीन प्रकारे करता येईल. उपवास, पूजा आणि जागरण. पहाटे उठून ह्या पूजेला सुरुवात होते. पुजेत महादेवाच्या पिंडिवर अभिषेक करावा. बेल, पांढरी फुले, रुद्राक्ष अर्पण करावा. धोत्रा, आंबा यांची पत्री अर्पण करावी. भस्म अर्पण करावे. ओम नम: शिवाय हा पंचाक्षरी मंत्राचा जप करावा. ह्या मंत्राने खूप लोकांना वेडे केले आहे विदेशातही ह्या मंत्राचा खूप गाजर केला जातो. तसेच वेगवेगळ्या प्रहर काळात मंत्र साधना करावी. ह्या दिवशी योगाची सुरुवात करता येईल. 

 बेंगळुरूच्या मॉमसाठी, खुशखबर .

टाईनी स्टेप नैसर्गिक घटक असणारे  फ्लोर क्लीनर लॉन्च करत आहे जे आपल्यासाठी, आपल्या बाळाला आणि आपल्या घरासाठी सुरक्षित आहे. तर मग आता  जंतू आणि रसायनयुक्त फ्लोर क्लीनर नाही म्हणा! प्रीलाँच ऑफरचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा. 
Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon