Link copied!
Sign in / Sign up
12
Shares

लोहाची (आयरन)कमतरता म्हणजे काय आणि त्यावरचे उपाय

हल्ली तरुणींमध्ये जवळपास ८० ते ९० टक्के मुलींमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता आढळून येते. त्याचे कारण म्हणजे बदलती जीवनशैली. लोहाची कमतरता म्हणजे अ‍ॅनिमिया होणे. हा काही आजार नाही पण तो अनेक आजारांना कारण ठरु शकतो. त्यामुळे लोहाची कमतरता वेळीच भरून काढली पाहिजे. अन्यथा आरोग्यास धोका पोहोचतो.

रक्ताचा रंग लाल असतो तो हिमोग्लोबिन मुळे आणि तेच तयार करण्यासाठी लोहाची आवश्यकता असते. लाल रक्त पेशींतील प्रथिन जे शरीरभर ऑक्सिजनचे वहन करते त्यासाठी लोहाची आवश्यकता असते. रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी योग्य नसेल तर पेशी आणि स्नायू यांना पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन अर्थात प्राणवायू मिळत नाही आणि ते परिणामकारक कार्य करु शकत नाहीत. तेव्हा शरीर अशक्त होते म्हणजेच अ‍ॅनिमिया होतो. लोहाच्या कमतरता असणारा अशक्तपणा हा बहुदा सर्वसामान्य आजार आहे.

लक्षणे-

शरीरात लोहाची कमतरता असल्याची लक्षणे सहजपणे ओळखता येतात. जास्त काम न करताही थकवा येतो. झोप पूर्ण झाली तरीही आळस येत असेल तर हिमोग्लोबिन कमी झाले असे समजावे. हा त्रास पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये अधिक होतो. त्याशिवा काही लक्षणे दिसतात.

अशक्तपणा आणि थकवा

चिडचिडा स्वभाव

डोळ्यांसमोर अंधारी येणे

चक्कर येणे

डोकेदुखी

मासिकपाळीत अनियमितता

दम लागणे

एकाग्रतेत कमतरता

केस गळणे

कोरडी निस्तेज त्वचा आणि केस

नखे तुटणे

कारणे-

लोहायुक्त आहाराची कमतरता.

गर्भावस्थेत qकवा मासिक पाळीत अतिरक्तस्राव होणे

शरीरांतर्गत रक्तस्राव

लोह अवशोषण अक्षमता

सर्वसाधारणपणे आढळून येणारा हा आजार काही व्यक्तींमध्ेय होण्याची चिन्हे अधिक असतात

गर्भधारणक्षम वयाच्या स्त्रिया

गर्भवती स्त्री

पोषक आहार न घेणाऱ्या व्यक्ती

सतत रक्तदान करणाऱ्या व्यक्ती

नवजात अर्भके आणि मुले विशेषतः मुदतपुर्व प्रसुती झालेली बालके

शाकाहारी व्यक्ती ज्यांच्या आहारात लोहयुक्त पदार्थांची कमतरता असते.

उपाययोजना

रक्तातील लोहाची कमतरता दूर करण्यासाठी उपाय केला पाहिजे. त्यात आहारातून नैसर्गिक स्वरुपात लोह जाणे आवश्यक आहे. आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश असावा ते पाहूया.

डॉक्टरांचा सल्ला-

शरीरात लोहाची कमतरता आहे असे वाटल्यास सुरुवातील क़रण्याची महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या डॉक्टरचा सल्ला घ्यावा. त्यांनी निदान केल्यास आहारातील लोहाच्या सेवनाचे प्रमाण वाढवले पाहिजे. उपचारांचे लक्ष्य हे हिमोग्लोबिनची पातळी योग्य राखणे आणि लोहाचे प्रमाणही योग्य राखले पाहिजे.

लोहयुक्त आहार-

बीट

लांल मांस, चिकन

हिरव्या पालेभाज्या

सुकामेवा

मटार, बीन्स आणि इतर डाळी

मासळी

लोहयुक्त पदार्थ

डाळी आणि दाणे

लोहाच्या अवशोषणासाठी-

लोहयुक्त आहार घेतले आणि प्रमाण स्थिर झाले असे होत नाही. कारण रक्तात लोहाचे शोषण होण्यासाठी सी जीवनसत्त्वाची आवश्यकता असते. त्यामुळे लोहयुक्त आहार घेताना सी जीवनसत्त्वाचेही पुरेशा प्रमाणात सेवन करावे. त्यामुळे लोहाचे सेवन अवशोषण योग्य प्रमाणात होते.

सी जीवनसत्त्वयुक्त आहार-

संत्री, मोसंबी, स्ट्रॉबेरी, किवी, पेरू, पपया, अननस, आंबा

ब्रोकोली

लाल आणि हिरवी भोपळी मिरची

फ्लॉवर

टोमॅटो

हिरव्या पालेभाज्या.

थोडक्यात लोहयुक्त आहार घेताना त्यात सी जीवनसत्त्वाचा समावेश केल्या लोहाचे अवशोषण होते अन्यथा लोहयुक्त आहाराचा शरीराला फायदा होणार नाही.

आपल्यामध्ये लोहाच्या कमतरतेची काही लक्षणे दिसत असल्यास आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन आहारातून लोहाचे प्रमाण वाढवण्याचा प्रयत्न करावा.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon