Link copied!
Sign in / Sign up
52
Shares

तुम्हांला साजेशी लिपस्टिकची शेड कशी निवडाल

घरात कोणता कार्यक्रम असला ऑफिस मध्ये पार्टी अश्या कार्यक्रमांना तयार होताना बहुतेक स्त्रियांना पडणारा प्रश्न म्हणजे ड्रेस ठरला ज्वेलरी ठरली पण आता कोणत्या शेडची लिपस्टिक लावू ? कोणती लिपस्टिक माझ्या त्वचेचा रंगानुसार मला उठून दिसेल ? याबाबतीत बराच वेळा गोंधळ होतो अश्या वेळी तुम्हांला कोणत्या शेडची लिपस्टिक कधी तुमच्या त्वचेच्या रंगला उठून दिसेल सूट होईल याबाबत आम्ही तुम्हांला मार्गदर्शन करणार आहोत.

      १. कृष्णवर्णी त्वचा 

अश्याप्रकाच्या त्वचा असणाऱ्या स्त्रियांना/मुलींना अनेक रंग खुलून दिसतात. यामध्ये गुलाबी, कोरल (गुलाबीसर) , पीच, लाल किंवा नारंगी रंगाची लिपस्टिक अश्या रंगाच्या लिपस्टिक साधारणतः उठून दिसतात.

२. उजळ त्वचा

अश्याप्रकाची  त्वचा असणाऱ्या स्त्रियांनी/ मुलींनी मॅट स्वरूपाच्या लिपस्टीक, थोड्या डार्क जसे ब्राऊन, बर्गंडी, कॉफी, ऑक्सब्लड अश्या आकर्षक रंगाच्या लिपस्टीकची निवड करावी

3. सावळी त्वचा 

सावळा म्हणजेच डस्की त्वचेचा रंग असणाऱ्या स्त्रियांना किंवा मुलींना याकरिता बर्न्ट ऑरेंज, पिंक (fuchsia pink)(जांभळट गुलाबी) अश्या ब्राईट रंगाच्या लिपस्टिक उठून दिसतात.

४. गहूवर्णी त्वचा 

फिकटसर गुलाबी, गडद गुलाबी, फिकटसर ऑरेंज असे रंग गहूवर्णीय स्त्रियांना मुलींना उठून दिसतात. पण तुम्हांला साध्याश्या कार्यक्रमाला किंवा रोजच्यासाठी लिपस्टिक लावायची असेल तर फिकटसर गुलाबी (कोरल पिंक )शेड वापरा.

हटके रंगाच्या लिपस्टिक

गुलाबी, मरून, लाल, वाइन अशा लिपस्टिकच्या व्यतिरिक्त हटके रंग म्हणजेच जांभळा, राखाडी असे रंग वापरायचे असतील तर असे रंग कोणीही बिनधास्त वापरा. फक्त ते व्यवस्थित कॅरी करा त्यामध्ये अवघडलेपणा येऊ देऊ नका.

ज्यांची जिवणी ओठ मोठे आहेत अश्या स्त्रियांनी असे रंग नक्कीच वापरून पाहावेत. अशा शेड लावतानासाधारणतः कपड्यांचे रंग हलकेच असू द्या.

कार्यक्रमानुसार आणि वेळेनुसार लिपस्टिक

रात्री पार्टी असेल वेस्टर्न ऑउटफिट असतील तर साधरणतः लाल गुलाबी आणि गडद म्हणजेच डार्क शेडचा वापर करावा.

रात्रीचा पारंपरिक कार्यक्रम असेल आणि पारंपरिक कपडे असतील तर ब्राऊन, गुलाबी, मरून असे रंग वापरावे

सकाळच्या कार्यक्रमांना फिकट रंगाच्या आणि त्वचेच्या रंगानुसार नैसर्गिक रंगच्या शेड वापराव्या. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon