Link copied!
Sign in / Sign up
4
Shares

लिपस्टिक लावल्यावर किती वेळाने निघून जाते


लिपस्टिक लावल्यानंतर स्त्रीला सर्वात जास्त चिंता सतावते की, ही लिपस्टिक किती वेळपर्यंत टिकून राहील. आणि बऱ्याच स्त्रियांचे ओठ कसे असतात त्यावरही ही लिपस्टिक टिकणे अवलंबुन असते. तेव्हा ह्या ब्लॉगमधून आपण लिप्स्टिकच्या काही गोष्टी समजून घेऊ.

१) ओठांवर मृत त्वचा वारंवार येत असते. ही मृत त्वचा पूर्णपणे काढून ओठांची त्वचा मुलायम करता येईल. ही त्वचा काढण्यासाठी दात घासण्याच्या ब्रशवर थोडं व्हॅसलिन लावा आणि ओठांवर हलकं घासा. यामुळे ही त्वचा निघून जाईल. तसंच तिथं जखमही होणार नाही. यामुळे लिपस्टिक दीर्घकाळ ओठांवर राहण्यास मदत होईल.

२) ओठ कोरडे पडण्यापासून मॉइश्चरायजर किंवा फाउंडेशन कामी येतं. लिपस्टिक लावण्याआधी हे मॉइश्चरायझर किंवा फाउंडेशन ओठांवर लावा, याचा तुम्ही प्रायमर म्हणून वापर करू शकता. हे फाउंडेशन थोडावेळ ओठांवर ठेवा. काही वेळानं हे प्रायमर हळूहळू पुसून टाका. यानंतर ओठांवर लिपस्टिक लावा. यामुळे ओठांची त्वचा ओली राहण्यास मदत होईल आणि लिपस्टिक जास्त काळ टिकेल.

३) ओठांना आकर्षक लूक मिळण्यासाठी लिप लायनर महत्त्वाचं आहे. ओठांवर लिपस्टिक लावण्याआधी लिप लायनरनं आकार द्या. यामुळे लिपस्टिक लावणं सोपं जाईल. यासाठी तुम्ही आयब्रो पेन्सिलचाही वापर करू शकता. लिक्विड लिपस्टिक लावताना हा पर्याय कामी येईल. यामुळे तुम्हाला लिपस्टिक लावणं सोपं जाईल आणि ओठांना आकर्षक लूकही मिळेल.

४) आपल्या आवडीची लिपस्टिक लावताना ब्रशचा वापर करा. तुमच्या आवडीची लिपस्टिक लावताना ती योग्य पद्धतीने ओठांवर लावा. सुरुवातीला लिपस्टिकचा पहिला थर द्या आणि त्यानंतर तुम्हाला हवा असलेला लूक मिळण्यासाठी दुसरा थर द्या. 

साभार- म.टा 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

We have a great opportunity for you. You can EARN up to Rs 10,000/- every month right in the comfort of your own HOME. Sounds interesting? Fill in this form and we will call you.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon