Link copied!
Sign in / Sign up
11
Shares

मुलांना लैंगिक शिक्षण द्यायची का गरज आहे ?


भारतीय समाजात ‘सेक्स किंवा लैंगिकता’ ह्या विषयावर आजही मौन बाळगले जाते हे काही गुपित नाही. एखादी व्यक्ती जेव्हा ‘सेक्स, ‘कॉण्डोम’ आणि ‘योनी’ असे शब्द उच्चारतो तेव्हा प्रत्येक जण त्या व्यक्तीकडे रोखून पाहतो आणि जणू काही ह्या गोष्टी सर्वसाधारण आयुष्यातील भाग नाहीत. सेक्स किंवा लैंगिकता याविषयी मोकळेपणाने बोलणे हे योग्य आहे आणि आपल्या मुलांना लैंगिकतेविषयी शक्य तितक्या लवकर शिकवायला हवी ही गोष्ट पूर्णपणे स्वीकारण्यासाठी आपल्या समाजाला अजूनही बराच वेळ लागणार आहे.

१) लैंगिक शिक्षण आजची गरज

भारतात लैंगिक अत्याचारांचे गुन्हे नोंद होण्याची संख्या वाढते आहे आणि सर्व जगभरातच मुलांचे संगोपन करताना लैंगिक शिक्षण हा अगदी महत्त्वाचा भाग झाला आहे. पुर्वीच्या काळी भारतीय मुलांना ८ वी किंवा दहावी इयत्तेपर्यंत लैंगिक शिक्षणाची ओळखही करुन देण्यात येत नव्हती. मुली जेव्हा पाचवी किंवा सहावी इयत्तेत जायच्या तेव्हा त्यांना मासिक पाळीविषयी माहिती देण्यात येत असे. पण तेवढेच पुरेसे नव्हते आणि नाही.

२) आपल्या मुलांना सावध करणे

आपण ज्या जगात राहतो ते जग जसे आपल्याला वाटते तितके सुयोग्य नाही ही दुर्दैवाने खरी गोष्ट आहे. अगदी कमीत कमी वयाच्या म्हणजे २ वर्षाच्या मुलाचेही लैंगिक शोषण केले जात असल्याची नोंद होते. त्यामुळेच खूप उशीर होण्याआधीच आपल्या लहानग्यांना या विषयीची माहिती देण्याची गरज निर्माण झाली आहे. अगदी लहान मुलाला देखील त्याच्या बरोबर एखादी दुर्देवी घटना घडल्यास त्याची माहिती देता यायला हवी.

३) लैंगिक शिक्षण वयानुसार कसे द्यावे ते पाहूया

लहान वयात शिक्षण देणे चांगले (२-८ वर्षे)- आपण काय सांगतो आहोत किंवा काय बोलतो आहोत हे मुलांना कळण्याइतपत ती मोठी झाली की लैंगिकतेविषयी बोलायला सुरुवात करावी. लहानग्यांसमवेत लैंगिकता किंवा सेक्स याविषयी बोलतान निश्चितच असहज जाणवेल. त्यामुळे मुलांना याविषयी समजावताना योग्य शब्दांचा वापर करा. सुरुवातीला शरीराचे विविध भाग चित्रांच्या मदतीने शिकवायला हवे त्यानंतर मुलांना स्वतःच्या शरीरामध्ये ते भाग दाखवायला सांगावे.

१. १.१) सहजतेने 

त्यानंतर दोन भिन्न लिंगीय व्यक्तींमध्ये वेगवेगळी गुप्तांगे असतात आणि त्यांचे कार्य अगदी सहजसोप्या सुलभ भाषेत लक्षात असू द्या की याविषयी मुलांशी बोलण्यात काहीही लाज वाटण्याचे कारण नाही. बहुतेक मुलांना प्रत्येकाच्या शरीरात गुप्तांग असते याची कल्पना साधारणपणे असते. मुलांना चड्डी वापरतो त्या जागी किंवा छातीला पालकांव्यतिरिक्त किंवा पालक असताना डॉक्टर यांच्याशिवाय कोणीही हात लावू शकत नाही किंवा हात नाही लावला पाहिजे ही एक सीमारेषा त्यांना समजावून सांगितली पाहिजे.

१.२) १३ वर्षाखालील मुलांची तयारी (१० -१२ वर्षे)

शरीरात होणाऱ्या विविध बदलांविषयी तेरा वर्षाखालील मुलांना ज्ञान असणे महत्त्वाचे असते. मुले जेव्हा दहा वर्षांची होतात तेव्हा शरीरात बदल होतात आणि ते का होतात याविषयी माहिती दिली पाहिजे. त्यांना थोडीशी शास्त्रीय माहिती द्यायला हवीच पण गमती गमतीत ती माहिती द्यावी.

सुरुवातीला स्वतःच्या शरीराविषयी समजावून सांगावे आणि मग विरुद्ध qलगी बालकाच्या शरीरातील बदलांविषयीही माहिती द्यावी. मुलांशी या गोष्टी बोलताना त्यांच्या बाबाला देखील बरोबर घ्या आणि आपल्या स्वतःच्या या वयातील आणि तारुण्यातील किस्से त्यांच्याबरोबर शेअर करा.

१.३) किशोरवयीन मुलांशी संवाद (१३-१८ वर्षे)

१३-१८ वर्षे हा वयाचा टप्पा थोडा कुशलेतेने हाताळावा लागतो. किशोरवयीन मुलाची पुढच्या पिढीला काय आवडते याची फक्त कल्पना करता येण्यासाठी स्वतःला वेगळे बाहेर डोकवावे लागेल( किंवा दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर आपले बाळ आता मोठे झाले आहे. ) त्यांच्याशी लैंगिकता किंवा सेक्स या विषयावर संवाद साधण्याचा प्रयत्न जरी केला तरी ते निषेधाचा सूर आळवतील किंवा तक्रार करतील पण जर तुम्ही त्यांना आग्रह केला तर ते ऐकूनही घेतील.

४) मुलांना लैंगिक संबंधांतून होणाऱ्या आजारांवविषयीच नव्हे तर अस्वच्छ शौचालयांमुळे होणाऱ्या आजारांविषयीही पुढे त्यांना अवगत करा. त्यांना गुप्तांगाच्या स्वच्छतेच्या महत्त्वाविषयीही अवश्य सांगा.

आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद ! Tinystep परिवाराच्या वतीने वाचकांना एक भेट देण्यात येणार आहे त्यासाठी इथे क्लिक करा 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon