Link copied!
Sign in / Sign up
13
Shares

वैवाहिक नाते न टिकण्याची काही करणे आणि त्यावरील उपाय

 

हल्ली फार लग्नानंतर म्हणा किंवा नाते जुळल्यानंतर नाती टिकवणे फार अवघड झाले आहे. लग्नानंतर लगेचच काही वर्षात काय काही महिन्यात एकमेकांचं एकमेकांशी पटेनासे होते. यात लिव्ह इन मधली नाती देखील आलीच. हल्ली नाती टिकवणे म्हणजे ओझे वाटायला लागले आहे. पण ही समस्या का निर्माण होत आहे याची करणे जाणून घेणे आणि त्यावर उपाय करणे आवश्यक झाले आहे. याची काही कारणे आणि त्यावर काही उपाय आम्ही तुम्हांला सांगणार आहोत.

१. बदलेली विचारसरणी

जर एकमेकांचे विचार पटत असतील तरच बरोबर राहावे. स्वभावातील एखादी गोष्ट पटली नाही वेगळे व्हा. एखादी गोष्टी पटली नाही. दोघांमधे उच्चशिक्षित आहे मी आर्थिकदृष्टया स्वतंत्र आहे मी या गोष्टी का सहन करू. अश्या प्रकारची विचारसरणी हल्ली वाढत आहे.

२. जीवनपद्धती

आजकाल प्रत्येकजण खूप करियरमधील स्पर्धेमुळे कामामध्ये खूप व्यस्त असतात. त्यामध्येच अजून व्यस्त करायला सोशल मीडियाचे आकर्षण आहेच. तसेच एकमेकांबद्दलच्या अपेक्षा वाढत चालल्या आहेत आणि तसेच बदलत चालल्या आहेत. प्रत्येकाला आपली बाजू योग्य वाटते, त्यामुळे स्वतःमध्ये बदल करण्याची कोणी इच्छा दाखवत नाही. नाते टिकले काय नाही टिकले काय आपण इतर गोष्टींच्या आधारे आयुष्य जगू शकतो ही भावना वाढत आहे.

 

३. संवादातील कमतरता

हल्ली पती-पत्नींचे एकमेकांबरोबरचे संवादच कमी झाले आहेत.ज्यावेळी वेळ मिळेल त्यावेळी सतत फोनमध्ये नाहीतर लॅपटॉप मध्ये किंवा टीव्हीमध्ये लक्ष असणे. यामुळे पत्नी-पत्नीमध्ये कफक्त व्यावहारिक बोलणे होते. एकमेकांशी गप्प मारायला, बोलायला दोघांना वेळच नसतो. त्यामुळे एकमेकांच्या समस्या,एकमेकांची दुखणी याकडे लक्ष दिले जात नाही. थोडक्यात एकमेकांकडे दुर्लक्ष होते.

४. दोघांचा अहंकार

पती-पत्नी हे दोघे आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याने तसेच उच्चशिक्षित असल्याने मी स्वतंत्र आहे मी का माघार घेऊ असा विचार दोघे करतात आणि नात्यामध्ये समस्या निर्माण होतात.

५. सवयी आणि स्वभाव

आपल्या जोडीदाराबाबत सतत संशय घेण्याची सवय असणे, अतिप्रमाणात मद्यपान आणि धुम्रपान शारीरिक व मानसिक आजार यामुळे नाते टिकवण्यात समस्या निर्माण होतात.

उपाय

१. एकमेकांशी संवाद साधा

एकमेकांना वेळ द्या, एकमेकांचे कौतुक करा, न पटलेल्या गोष्टी योग्यवेळी बोलून त्या तिथल्या तिथे सौन द्याव्यात त्याची मनात अढी ठेऊ नये.

२. एकमेकांमधील स्पर्धा टाळा

तू असे केले तरच मी असे करणार. मी याच्या /किंवा हिच्या पुढे कशी जाईन. तू असे केलेस मी आता असे करेन अशी स्पर्धा पती-पत्नीच्या नात्यामध्ये स्पर्धा नसावी. त्यापेक्षा एकमेकांना उत्तजेन द्यावे. एकमेकांच्या यशाच्या आनंदात सहभागी व्हावे.

३. एकमेकांना आहे तसे स्वीकारणे आवश्यक आहे.

प्रत्येक व्यक्तींमध्ये काही-ना काही दोष असतात.जरी ठरवून केलेले लग्न असो किंवा प्रेमविवाह प्रत्येक व्यक्ती परिस्थितीनुसार बदलत असते. त्यामुळे आपल्या जोडीदाराला आहे तसे त्याचा गुणदोषांसकट स्वीकारणे गरजेचे किरकोळ मतभेद व दोषांकडे दुर्लक्ष करून जोडीदाराला न बदलता कसे स्वीकारता येईल याचा प्रयन्त करावा.

४. अहंकार

मीच का हे करू मीच बदलायचे हा अहंकार न ठेवता नातेसंबंध सुधारण्यासाठी प्रयन्त करावे

५. तडजोडीची तयारी

नाते टिकवायचे असेल तर तडजोडीची तयारी असणे आवश्यक असते.वाद न वाढवता तडजोडीची भूमिका स्वीकारली तर हे वाद टोकाला जात नाहीत आणि नाते टिकते. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon