Link copied!
Sign in / Sign up
63
Shares

ही लक्षणे दर्शवतात तुम्हांला लेबर पेन्स (प्रसूती कळा)सुरु झाल्या आहेत

जर ह्यापैकी कोणतेही लक्षण तुम्हाला गरोदरपणाच्या शेवटच्या महिन्यात दिसले तर त्वरित डॉक्टरांना किंवा हॉस्पिटलला जाण्याची स्वतःच तयारी करून घ्यायची. तुमच्या वेदना आता सुखात बदलणार असतात.

१) क्रैम्प्स

क्रैम्प्स प्रसूतीच्या वेदनांचे पहिले लक्षण आहे. पोटात कळ आणि खूप वेदना होत असतील तर त्वरित हॉस्पिटलला पोहोचावे लागेल. आणि हे दुखणे, वेदना हे जसे तुम्हाला मासिक पाळीच्या वेळी येते तसेच राहील. हा त्रास थोड्या - थोड्या वेळात उठत असतो. आणि खूप वाढत जातो.

२) पुन्हा - पुन्हा बाथरूमला जावे लागत असेल

गरोदरपणाच्या शेवटच्या महिन्यात जर तुम्हाला पुन्हा- पुन्हा बाथरूमला जावे लागत असेल तर लवकरच डिलिव्हरी होऊ शकते. आणि हे ह्यामुळे होते की, गर्भाचे वजन खालच्या बाजूला खूप पडायला लागल्यामुळे दबाव पडतो मूत्राशयावर. म्हणून अशा वेळी कुणाची तरी मदत घ्यावी.

३) जर योनीमधून रक्त किंवा भुऱ्या रंगाचा द्राव निघत असेल तर त्वरित हॉस्पिटलला जावे कारण ते जर जास्तच झाले तर काहीही होऊ शकते.

४) पाण्याची थैली फाटणे

बाळ गर्भात आईच्या उदरात एका सुरक्षित थैलीत राहत असतो. आणि ज्यावेळी स्त्री प्रसूत होत असते त्यावेळी ही थैली फुटत असते. आणि योनी मधून ऍम्नीऑटिक द्रव योनीतुन बाहेर पडायला लागते. आणि ह्या थैलीच्या फाटण्यामुळे समजते की, बाळ गर्भातून बाहेर निघायला तयार आहे.

 

५) संकुचन

ज्यावेळी थोड्या - थोड्या वेळात गर्भात स्नायू ताणले जाऊन दबाव आणि खेचल्यासारखे वाटत असते. आणि ही संकुचन ची स्थिती असते. आणि हेच जर खूप जोराने आणि त्रासदायक होत असेल तर हे लेबर पेन चे संकेत असू शकता. आणि ह्या वेळेस तुम्ही रिस्क न घेता डॉक्टरांना भेटा किंवा हॉस्पिटलला जा .

६) बाळाची हालचाल

७ ते ८ महिने आल्यावर गर्भात बाळाची हालचाल खूप वेगात व्हायला लागते. आणि ज्यावेळी बाळाचा जन्म जवळ येतो. त्याचवेळेस बाळाची हालचाल हळूहळू होऊन जाते. म्हणून जर ९ व्या महिन्यात बाळाची हालचाल कमी झालीच तर डॉक्टरांना विचारून घ्या. कदाचित अशावेळी तुम्हाला सिझेरियन प्रसूतीची गरज भासू शकते.

८) तीव्र कंबर दुखी

गरोदरपणाच्या शेवटच्या दिवशी जर खूप तीव्र कंबर दुखी होत असेल आणि जस जशी डिलिव्हरीची तारीख जवळ येते तशी कंबर दुखी होत असेल तर समजून घ्यावे. ह्या सर्व वेदना डिलिव्हरीसाठीच होत आहेत.

९) पोटात खूप दुखणे आणि ताप

काही स्त्रियांना पॉट दुखण्याबरोबर तीव्र तापही येऊन जातो. आणि डोकेदुखी व सर्दीही होऊ शकते. आणि काहीवेळा लेबर पेन सोबत डायरिया सुद्धा होऊ शकतो.

तेव्हा अशी लक्षणे आढल्यावर त्वरित निर्णय घ्या. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

We have a great opportunity for you. You can EARN up to Rs 10,000/- every month right in the comfort of your own HOME. Sounds interesting? Fill in this form and we will call you.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon