Link copied!
Sign in / Sign up
25
Shares

लवकर गरोदर होण्यासाठीचे हे सोप्पे उपाय तुम्हांला माहिती आहेत का ?

जर तुम्ही प्रेग्नन्सीचा विचार करत असाल, पण प्रेग्नन्सीसाठी कोणता काळ सर्वोत्तम असतो याविषयी तुमच्या मनात गोंधळ असले, तर काळजी करू नका. असा गोंधळ होणारे तुम्ही एकमेव नाहीत. सर्वांच्याच मनात त्यासंबंधी गोंधळ असतो. अशी लाखो जोडपी आहेत. ज्यांना प्रेग्नन्सीसाठी कोणती वेळ योग्य आहे याची जाणीव नसते. त्यामुळे ते खूप चिंतीत असतात. महिलांची प्रजनन प्रणाली ही खूप क्लिष्ठ असते. त्यामुळे त्यामुळे अनेक शिकलेले दाम्पत्यही याविषयी त्याविषयी जाणून घेण्यासाठी वडिलधाऱ्यांवर, मित्रमैत्रिणींवर तसेच इंटरनेटवर अवलंबून असतात.

गर्भाधारणा का अवघड आहे ?

आपली बदलत जाणारी जीवनप्रणाली त्यासाठी सर्वाधिक कारणीभूत आहे. आपल्यापैकी बरेच जण खूप दबावाखाली असतात. तसेच उशीरा होणारे विवाह, आहारातील वाईट सवयी, विवाहातील निराशा अशी अनेक कारणे त्यामागे असू शकतात.

गरोदर न राहण्यास कारणीभूत असणारी काही जैविक कारणे

पुरुषांमधील काही कारणे 

१. इरेक्टाईल डिसफंक्शन (ED)

२.  तीस वर्षापेक्षा जास्त वय

३.  माणसिक ताण

४.  STD

५. शुक्राणुंची संख्या आणि दर्जा

महिलांमधील काही कारणे 

१. अनियमित पाळी

२. PCOD

३.  पाळी न येणे

४. संप्रेरक असमतोल

५. तीस वर्षापेक्षा जास्त वय

६. थायरॉईड

गर्भपाताचा इतिहास

आता तुम्हाला गर्भधारणा न होण्यामागची कारण कळाली असतील. आता आम्ही तुम्हाला गर्भधारणा होण्यासाठीचे काही सोपे उपाय सांगणार आहोत.

१. ओव्हूलेशन नेमकं कधी होतं ?

सर्वसाधारणपणे एका तंदुरूस्त महिलेची तिच्या ओव्हूलेशऩच्या काळात सहजपणे गर्भधारणा होऊ शकते. मासिक पाळीची कालावधी हा साधारणपणे 28 दिवसांचा असतो. तर ओव्हूलेशऩ साधारणपणे १४ व्या दिवशी सुरू होते. अंडाशयाद्वारे सोडलेली अंडी फॅलोपीयन ट्यूबमध्ये जाते. आणि तिथे ते फलीत होते. गर्भाशयाच्या भिंतीवर त्याचे प्रत्यारोपण होते. आणि तुमच्या गर्भाशयात बाळाची वाढ सुरू होते.

२. ओव्हूलेशनच्या काळात प्रणय करणे वाढावा 

शारीरिक संबंधांनंतर पुरूषांचे शुक्राणू महिलांच्या शरीरात तीन दिवसांपर्यंत टिकून राहू शकतात. पण बिजांडाटा कालवधी मात्र फक्त १२ ते २४ तासांचाच असतो. त्यामुळे तुमची पाळी संपल्यानंतर शक्य होईल तेवढ्या लवकर प्रणय होणे आवश्यक आहे. या काळात शारीरिक संबंध ठेवल्यास गर्भधारणा होण्याची शक्यता सर्वाधिक असते.

३.  वेळ आणि पोझीशन

अनुभवी महिलांच्या मते प्रेग्नंट होण्यासाठी सेक्सदरम्यानची पोझीशन खूप महत्त्वाची असते. लाखो महिलांना या सल्ल्याचा फायदा झाला. त्यामुळे त्यासाठी सेक्स करताना वेगवेगळ्या पोझीशन ट्राय करण्यात काहीही चुकीच नाही.

४. लुब्रीकंट्सचा वापर करू नका

बरेच जण समागम  करताना वेगवेगळ्या लुब्रीकंटचा वापर करतात. पण त्यामुळे तुमच्या योनीचा नैसर्गिक pH कमी होतो. तसेच पुरूषांच्या शुक्राणुंची गतिशिलताही कमी होते.

या सर्वासोबतच तुम्ही नियमित व्यायम आणि ध्यान करणंही तेवढंच महत्त्वाच आहे. जर तुम्हीला प्रेग्नंट राहायचं असेल, तर धुम्रपान आणि मद्यपान सोडून द्या. 

Click here for the best in baby advice
What do you think?
100%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon