Link copied!
Sign in / Sign up
1
Shares

रात्री लवकर ही गोष्ट करा . . .

 आरोग्य चांगले राखण्यासाठी हायजिन आणि उत्तम आहार घेणे आवश्यक असते पण त्याचबरोबर तो आहार वेळेवर घ्यायला पाहिजे. आहार उत्तम घेण्यापेक्षा तो वेळेवर घेणे महत्वाचे आहे.  आणि  दिवसा तुम्ही कोणत्याही वेळेला खाल्लेले चालू शकेल पण रात्रीचे जेवण मात्र झोपण्याच्या आधी ३ ते ४ तास आधीच व्हायला हवे. त्यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहतेच पण चांगली झोप येण्यासही त्याचा उपयोग होतो. अशाप्रकारे जेवण्याच्या काही तास खाल्ल्यास खाल्लेल्या अन्नाचे पचन चांगल्या पद्धतीने होऊ शकते. याचा आपल्या संपूर्ण जीवनशैलीवर परिणाम होतो आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. त्यामुळे रात्री उशीरा जेवण करण्याची सवय आरोग्यासाठी निश्चितच घातक ठरु शकत

१) सध्या लवकरच वजन वाढून वाजते, कधी ते धोकादायक पातळीवर जाते हेही कळत नाही.  बैठी जीवनशैली, कामाचा ताण आणि इतर अनेक कारणे लठ्ठपणासाठी कारणीभूत ठरतात. पण रात्रीचे जेवण लवकर केल्यास लठ्ठपणाची समस्या कमी होण्यास नक्कीच मदत होऊ शकते. तसेच रात्रीचे जेवण केल्यावर शतपावली करणेही अतिशय महत्त्वाचे असते. त्यामुळे रात्रीच्या वेळीही तुम्ही पोटभर खाल्ले तरीही लवकर खाल्ल्याने वजन वाढणार नाही.

२) रात्री खूप जास्ती पोटभर खाल्ले तर दुसऱ्या दिवशी उठल्यावर तुम्ही नीट नाश्ता करु शकत नाही. हा नाश्ता नीट झाला नाही तर दिवसभर तुम्हाला अंगात ताकद नसल्यासारखे वाटत राहते. पण हेच जर तुम्ही रात्रीचे जेवण लवकर केले असेल तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी व्यवस्थित भूक लागते आणि त्यामुळे तुम्ही दिवसभर उत्साही राहू शकता.

३) तुम्ही रात्री लवकर जेवण केले तर ते अन्न पचण्यास पुरेसा वेळ मिळतो. त्यामुळे पोट गच्च न वाटता झोपण्याच्या वेळेला पोट काही प्रमाणात हलके झालेले असते. तसेच ज्यांना गॅसेसचा त्रास असतो तोही जेवणानंतर झोपेपर्यंत पुरेसा वेळ मिळाल्यास कमी होतो. पण रात्री उशीरा जेवल्यास रात्रीत अन्न नीट पचत नाही आणि ते आरोग्यासाठी चांगले नसते.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon