Link copied!
Sign in / Sign up
15
Shares

लसूणचे समागम आणि त्या व्यतिरिक्त होणारे फायदे

लसूण खूप जण खात नाहीत पण काहींना लसूण भाजीत टाकल्याशिवाय चव येत नाहीत. पण निसर्गाने प्रत्येक वनस्पती काहींना काही गोष्टीसाठी बनवलेली आहे. त्यामुळे त्या वनस्पतीचा आरोग्यासाठी स्वतःच्या वाढीसाठी काय फायदा आहे ते जाणून घ्यायला हवे. त्यासाठी आजच्या ब्लॉगमधून लसूणचे काय फायदे आहेत ते जाणून घेऊ.

१) अ, ब आणि क जीवनसत्त्वांसह आयोडीन, लोह, पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यासारखे अनेक पोषक तत्त्व एकत्र मिळतात.

२) रोज लसणाचे सेवन केल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते. हवामान बदलामुळे होणा-या सर्दी आणि खोकल्यावर लसूण टाकलेला चहा गुणकारी आहे.

३) लसूण हृदयाला ऑक्सिजन रॅडीकल्सच्या प्रभावापासून वाचवितो. तसेच सल्फरयुक्त गुण रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होऊ देत नाही. अ‍ॅण्टी क्लोनिंग गुणांमुळे रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गाठी तयार होत नाहीत.

४) लसणाचे तेल तळहात आणि तळपायाला लावल्यास डास जवळ येत नाहीत. तसेच त्वचाही नितळ होते.

लसणात अ‍ॅण्टिबॅक्टेरियल गुण आहेत. म्हणूनच तारुण्यपीटिकांची समस्या असल्यास लसणाचे सेवन अतिशय गुणकारी ठरते. तारुण्यपीटिकेवर लसणाची पाकळी लावून हलक्याने रगडल्यास लवकरच आराम मिळतो.

५) तळपायाच्या आजारांसाठी लसूण अतिशय उपयुक्त आहे. लसूण शरीरात इन्सुलीनचे प्रमाण वाढविते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे अतिशय उपयुक्त आहे.

६) लसणाचे सेवन कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित करते. लसणामुळे रक्ताचे शुद्धीकरण होतेच, शिवाय रक्त पातळ होते. त्यामुळे रक्ताच्या गाठी निर्माण होत नाहीत.

७) सरसूच्या तेलात लसणाच्या पाकळ्या टाकून उकळून घ्या. हे तेल कानात टाकल्यास कान दुखण्याचा त्रास कमी होतो.

८) थंडी किंवा बदलणा-या वातावरणात सर्वच वयोगटातील लोकांना कफ किंवा सर्दीचा त्रास होतो. लसणाचे नियमित सेवन केल्यास अशा आजारांपासून सहज मुक्तता होऊ शकते.

९) लसणात अ‍ॅण्टी इन्फ्लामेटरी गुण आहेत. ज्यामुळे अ‍ॅलर्जीला दूर पळविता येते. लसणातील अ‍ॅण्टी आर्थिटिक गुणांमुळे डायलीसल्फाईड आणि थियासेरेमोनोने यांचे संतुलन बनून राहते. लसणाचा रस प्यायल्यानेही अनेक फायदे आहेत.

१०) सिरोसियसच्या त्रासावर लसूण रामबाण उपाय आहे. लसणाचे तेल लावल्यास त्वचेला खूप आराम मिळतो आणि समस्या दूर होते.

११) लसणात डायली-सल्फाईड असते. त्यामुळे फेरोप्रोटीनचे प्रमाण वाढविते. याचा फायदा म्हणजे, आयर्न मेटाबॉलिझम सुधारण्यात मदत होते.

१२) नियमित लसूण सेवन केल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो. अ‍ॅसिडीटी आणि गॅसेसच्या त्रासापासूनही दिलासा मिळतो. हृदयाच्या विकारांसह तणावावरही लसूण नियंत्रण ठेवतो.

१३) गर्भवती महिलांनी नियमित लसणाचे सेवन केले पाहिजे. गर्भवती महिलांना उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर संपूर्ण गर्भावस्थेपर्यंत लसणाचे सेवन केले पाहिजे.

लसणाच्या सेवनामुळे व्हायरल, फंगल, यीस्ट आणि वर्म यांचा संसर्ग होत नाही. ताज्या लसणाच्या सेवनामुळे अन्नातून विषबाधा होण्याचा धोका कमी होतो.

१४) लसणाच्या सेवनाने केस गळणे बंद होते. लसणात अ‍ॅलिसिनचे प्रमाण भरपूर आहे. तसेच सल्फरही असते. लसणाची पेस्ट डोक्याला लावल्यास केस गळणे कमी होते

लसूण नियमित सेवन केल्यास दातांच्या दुखण्यामध्ये आराम मिळतो. दात दुखत असल्यास लसणाची पेस्ट करून दातांवर ठेवावी. लगेच आराम मिळेल. लसणात अ‍ॅण्टी बॅक्टेरियल तत्त्व असतता. त्याचा फायदा होतो.

शरीरात रक्ताची कमतरता असल्यास लसूण खूप फायदेशीर आहे. लसणात लोह असते. रक्त तयार होण्यास लोह आवश्यक असते. तसेच क जीवनसत्त्व असल्यामुळे स्कर्वी रोगापासूनही बचाव होतो.

१५) समागमात लसूण खूप उपयोगी ठरत असते. कारण लसूण तामसिक पदार्थ असल्याने ते शरीरात ऊर्जा निर्माण करते आणि समागमासाठी शक्तीही देते. आणि ह्यामुळे समागमाची इच्छाही वाढते. म्हणून खूप ब्रह्मचारी लसूण खात नाहीत.

लसूण एक नैसर्गिक पेस्टीसाईड म्हणूनही उपयोगी आहे. लसूण, मिनरल ऑईल, पाणी आणि लिक्विड सोप एकत्र करून नसíगक कीटकनाशक तयार केले जाऊ शकते.

लसणाच्या ५ पाकळ्या बारीक करून त्यात थोडे पाणी टाकावे. त्यात १० ग्रॅम मध मिसळावा. हे मिश्रण सकाळी आणि सायंकाळी सेवन करावे. यामुळे पांढरे केस काळे होतील.

   

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon