Link copied!
Sign in / Sign up
6
Shares

लॅपटॉप वापरताय हे नक्की वाचा

मोबाईल फोन प्रमाणे लॅपटॉपचा वापर देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे आणि हा वापर अनिवार्य झाला आहे. त्यामुळे वापरणं टाळणे शक्य नसल्यामुळे वापरतांना काही काळजी घेणे गरजेचे असते. 

चार्जिंग सुरु असताना काम करणे टाळा.

लॅपटॉपवर चार्जिंग सुरु असताना काम करणे धोकादायक ठरू शकते. यात शॉक लागणे किंवा छोटा स्फोट होणे अश्या गोष्टी घडू शकतात. तसेच ते शरीरास अपायकारक  ठरू शकते.

जास्त वेळ मांडीवर घेणे टाळा.

लॅपटॉप हा मांडीवर घेऊन काम करण्यासाठी जरी असला तरी त्याच्या खालच्या भागाचा थेट संबंध पायाशी किंवा शरीराशी आल्यास चटका बसणे भजने अश्या शाररिक इजा होऊ शकतात. तसेच  पुरुषांच्या बाबतीत शुक्राणूंचा काउंट कमी करण्यास कारणीभूत ठरू शकते. 

लॅपटॉपची आणि बसण्याची स्थिती 

 बराच वेळ  लॅपटॉप वर काम करणाऱ्यानी  बसण्याची पद्धत आणि लॅपटॉपची स्थिती याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.अन्यथा पाठीदुखी आणि मानदुखी मागे लागू शकते. खुर्चीवर बसताना उशी घेणे, खुर्ची टेबल जवळ ठेऊन ९० अंशात हात येतील अशा पद्धतीने ताठ बसून काम करणे योग्य ठरते.

पुरेश्या उजेडात काम करा 

लॅपटॉपमधून निघणारा प्रकाश जास्त वेळ थेट डोळ्यावर पडल्यास डोळ्यांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे लॅपटॉपचा वापर करताना पुरेश्या उजेडात करावा.

ग्लेअरचा चष्मा वापरा 

डेस्कटॉप लॅपटॉप वर सतत काम करणार्यांनी विशिष्ठ ज्यांना नंबरचा चष्मा नाही त्यांनी कॉम्पुटर, लॅपटॉप वर काम करताना त्याच्या किरणांपासून आणि उजेडापासून डोळ्यांना त्रास होऊ नये या करता विशिष्ठ चष्मे मिळतात ते वापरावे तसेच नंबर असणाऱ्यांनी त्यांचा चष्मा बनवताना त्याला कोटींग करून घ्यावे. 

गरोदर असताना 

गरोदर असताना लॅपटॉप वापरात असाल  तर शरीरापासून आणि विशेषतः पोट पासून त्याचा संपर्क जितका कमी येईल तितका पर्यंत करावा.

 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon