Link copied!
Sign in / Sign up
25
Shares

लाप्रोस्कोपी – तुम्हाला माहित असाव्यात या गोष्टी


भारतामध्ये बालमृत्यू दर कमी करण्यासाठी संशोधन चालू आहे. विशेषतः जन्माच्या वेळी दगावणाऱ्या बाळांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी हे संशोधन केले जात आहे. आजही अनेक गरोदर स्त्रियांना त्यांच्या गर्भात वाढणाऱ्या बाळाच्या आणि त्यांच्या स्वतः च्या शरीरात गर्भावस्थेदरम्यान घडणाऱ्या बदलांचे निरीक्षण करणाऱ्या छोट्या छोट्या शास्त्राक्रीयांबद्दल माहिती नसते.

लाप्रोस्कोपी ही सगळ्यात महत्त्वाची अशी छोटीशी शस्त्रक्रिया आहे ज्यामुळे प्रसुतीवेळी निर्माण होणाऱ्या गुंतागुंतीच्या स्थितिंची शक्यता आपल्याला कमी करता येते. तर या लाप्रोस्कोपीबद्दल जाणून घेऊया.

लाप्रोस्कोपी म्हणजे काय ?

लाप्रोस्कोपी ही एक लहानशी आणि थोडक्यात शस्त्रक्रिया असते. यात एक अतिशय पातळ नळी उटी पोटाला छेद देऊन आत सोडली जाते. याद्वारे आतमध्ये पेल्व्हिक भागात असलेले अवयव तसेच भृणाची अवस्था आणि त्याचा विकास ह्याची तपासणी केली जाते. गरोदर स्त्रीवर केल्या जाणाऱ्या लाप्रोस्कोपीला ‘गायनाकोलॉजिकल लाप्रोस्कोपी’ असे म्हणतात.

लाप्रोस्कोपी प्रक्रियेचा उपयोग कशासाठी होतो?

गर्भवती स्त्रीचे पोटातील अवयव तपासणे आणि सोबतच बाळाची वाढ बघणे याशिवाय लाप्रोस्कोपी प्रक्रियेचे इतर उपयोग देखील आहेत. याद्वारे खालील गोष्टी देखील तपासता येतात-

- इंडेमेट्रीओसीसचे (गर्भाशयाच्या वरच्या थरावर मेदपातळ वाढणे) निदान व उपचार.

- अस्थानिक गर्भधारणेचे निदान व उपचार.

- अंडाशयातील गाठी काढून टाकणे.

- फाय्ब्रोइड्स (स्त्रियांच्या प्रजनन संस्थेत निर्माण होणारे तंतुमय ट्यूमर) वरील उपचार करणे.

- कर्करोगाचा शोध घेणे आणि लसिका गाठी (लिम्फ नोड्स) काढून टाकणे.

लाप्रोस्कोपी सुरक्षित आहे का? याच्यातून बरे होण्यास किती कालावधी लागतो ?

लाप्रोस्कोपी च्या प्रक्रियेत सांगितल्याप्रमाणे पोटाला अतिशय छोटा छेद दिलं जातो. यातून पातळ नळी आत सोडली जाते. यामुळे ही शस्त्रक्रिया सुरक्षित आहे असे मानण्यास काहीच हरकत नाही. शरीराच्या आतील कोणत्याही अवयवाला शस्त्रक्रियेच्या वातावरणाचा स्पर्श सुद्धा होत नाही. त्यामुळे कोणतेही इन्फेक्शन होण्याच्या संधी सर्वात कमी असतात.

लाप्रोस्कोपी ही शस्त्रक्रिया लोकप्रिय होण्यामागचे कारण म्हणजे यात बरे होण्यासाठी लागणारा कालावधी खूप कमी असतो. सर्वाधिक स्त्रियांना लाप्रोस्कोपी होण्याच्या दिवशीच डिस्चार्ज दिला जातो. शस्त्रक्रियेनंतर काही अत्यल्प काळासाठी आवश्यक काळजी घ्यावी लागते ती तेवढीच.

शस्त्रक्रियेनंतर काय काळजी घ्यावी ?

लाप्रोस्कोपी झाल्यानंतर थोड्या काळासाठी काही किरकोळ काळजी घेणे आणि पथ्य पाळणे तुम्हाला करावे लागते.

- भरपूर पाणी प्या आणि शरीर हायड्रेटेड ठेवा.

- हलके अन्न घ्या. सहज पचन होणारे पदार्थ खा.

- अन्नपचन प्रक्रिया निट होण्यासाठी सफरचंदाचा ज्यूस, अद्रक, ब्रेड-बटर आणि सूप प्या.

- काही दिवसांसाठी संभोग करणे टाळा.

- तुमच्या शरीराला आराम मिळू दया. मानसिक आणि शारीरिक दोन्ही आराम गरजेचे आहेत.

.  साभार - श्रावणी कुलकर्णी 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

We have a great opportunity for you. You can EARN up to Rs 10,000/- every month right in the comfort of your own HOME. Sounds interesting? Fill in this form and we will call you.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon