Link copied!
Sign in / Sign up
3
Shares

लैंगिक संबंधातून पसरणारे संसर्ग आणि आजारांविषयी महत्वाची माहिती

 

आपल्याकडे खूप व्यक्तींना लैंगिक संसर्गाविषयी आणि लैंगिक आजाराविषयी काहीच माहिती नसते. त्यामुळे खूप अशा चुकीच्या व वाईट समजुतीवर विश्वास ठेवून स्वतःला व इतरांनाही त्रास करून घेतात. तेव्हा ह्या संसर्गाबद्दल जाणून घ्या.

जेव्हा आपल्याला लैंगिक संबंधातून पसरणारा एखादा आजार झाल्याचे समजते, तेव्हा आपल्याला धक्का बसतो. आपले आयुष्य पूर्णपणे थांबल्याचे आपल्याला वाटायला लागते. या आजारांविषयी असलेल्या गैरसमजांमुळे, बऱ्याच व्यक्ती ह्या गैरसमजामुळे आपले स्वतःचे जीवन खूप निराशेत घालतात. ह्या संसर्गाविषयी खूप माहिती नसल्याने असे होत असते. त्यासाठी ह्या संसर्गाविषयी जाणून घ्यायला हवेच.

ह्या मध्ये काही लैंगिक संसर्ग आणि काही लैंगिक आजार क्लॅमेडिया, जननेंद्रियांवरील नागीण (जनायटल हर्पिस), गनोरिया, हेपॅटिटिस बी, एचआयव्ही आणि सिफिलिस यांचा समावेश होतो. ह्याविषयी माहिती जाणून घेतल्यानंतर तुमच्या मनातील भीती नाहीशी होऊन जाईल. नाहीतर गैरसमजातच तुमचे दिवस नैराश्य मध्ये जातील.  

या आजारांविषयी आणि संसर्गाविषयी तुम्हाला माहिती नसलेल्या काही धक्कदायक गोष्टी

१) दक्षिण आफ्रिकेत अशी समजूत आहे की, जर तुम्हाला लैंगिक आजार किंवा संसर्ग असेल तर तुम्ही व्हर्जिन स्त्रीशी जर समागम केले तर सर्व लैंगिक आजार व संसर्ग बरे होऊन जातील. ही खूप चुकीची आणि घाणेरडी समजूत आहे. त्यामुळे आफ्रिकेत कमी वयाच्या मुलींना बलात्काराला आणि खूप त्रासाला सामोरे जावे लागते.

२) वीर्यस्खलनाच्या आधीच्या घटकांमध्येही हे घातक विषाणू असू शकतात. त्यामुळेही हे आजार पसरू शकतात.

३) लैंगिक संसर्गाविषयी काहींची अशी समजूत असते की, समागम करताना लिंग बाहेर काढून टाकले तर हे आजार होणार नाही.  

हे आजार असलेल्या व्यक्तीशी एकवेळाही असुरक्षित लैंगिक संबंध ठेवले, तरीही हा आजार तुम्हालाही होऊ शकतो.

४) काही असा तर्क लावतात की, ओरल समागमात कोणताच संसर्ग आणि आजार होणार नाही. पण अशा व्यक्तींशी ओरल समागमामुळे  तुम्हाला जननेंद्रियांवरील नागीण (जनायटल हर्पिस) होऊ शकतो.

५)  कंडोम तुम्हाला जननेंद्रियांवरील नागीणपासून कोणतेही संरक्षण देवू शकत नाही. कंडोममुळे केवळ लिंग झाकलेले असते. पण तुमच्या मांड्या उघड्या असतात. त्यामुळे तुम्हाला जनायटल हर्पिसचे लगेच इन्फेक्शन होऊ शकते.

६) हे आजार झालेल्या महिलेच्या बाळालाही हे आजार होण्याची शक्यता असते. या महिलांच्या बाळांना कमी वजन, न्युमोनिया, अंधत्व, डोळ्यांचे इन्फेक्शन आणि यकृताचे आजार होऊ शकतात.  

७) यातील काही आजार स्पर्शानेही होऊ शकतात. परस्पर हस्तमैथुनातून तुमच्यासाठी घातक असलेल्या बऱ्याच विषाणूंशी संपर्क येवू शकतो.  

८) या आजारांपैकी हेपॅटिटिस ए आणि हेपॅटिटिस बी साठी लसी उपलब्ध आहेत. त्यामुळे हे आजार बरे होऊ शकतात.

९)  सिफिलिस या आाजाराचे नाव हे एका मेंढपाळावरून ठेवण्यात आले आहे. त्या मेंढपाळाला अपोलो या देवाचा अपमान केल्याबद्दल एका त्रासदायक आजाराचा शाप मिळाला होता




Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon