Link copied!
Sign in / Sign up
59
Shares

लहान मुलांसाठी पराठ्याचे काही प्रकार


लहान मुलांच्या भाजी खाण्यामध्ये अनेक आवडी निवडी असतात. पण प्रत्येक प्रकारची भाजी त्यांच्या पोटात जाणे आवश्यक असतात यासाठी काही सोप्प्या आणि मुलांना आवडतील अश्या प्रकारे  प्रकारात या भाज्या घालून दिल्या की ते आवडीने खातात, म्हणूनच आम्ही काही  पराठ्याचे सांगणार आहोत 

दुधी भोपळ्याच्या किसाचा पराठा 

चांगला कोवळा दुधी बघून घ्या  तो दुधी किसून घ्या. त्या किसलेल्या दुधीमध्ये  जिरे पूड-हळद-तिखट-मीठ घाला. थोडा वेळ तसंच ठेवा. पाणी सुटल्यावर कणीक घाला. पराठे लाटून भाजा.आणि लोणचं किंवा चटणी बरोबर किंवा तुपाबरोबर खायला द्या.

गाजर-बीट पराठा गाजर 

गाजर  आणि बीट कुकरला वाफवून घ्या. २ गाजरं असतील तर १ बीट  अश्याप्रकारे गाजर आणि बीट घ्यावे. उकडलेले  गाजर आणि बीट गार झाल्यावर दोन्ही चांगले कुस्करा  करा. त्यात फक्त जिरेपूड आणि मीठ घाला. मोठ्यांसाठी हवे असल्यास मिरच्यांचे वाटण घालू शकता. कणीक घालून पीठ भिजवा. तूप लावून भाजा. 

कोबी पराठा 

कोबी बारीक किसून घ्या. त्यात तिखट-मीठ-हळद घाला. जरा वेळ तसंच ठेवा. नंतर त्यात हवी तितकी कणीक घाला. पीठ भिजवा. पराठे करा.

मुळ्याचा पराठा  

ही  बहुतेक मुलांची नावडती भाजी या भाजीचा पराठा कसा करायचा ते आपण पाहूया.  मुळा जाडसर किसून घ्या. मुळ्याला पाणी सुटले असले तर ते थोडे निथळून घ्या.पूर्ण पाणी काढू नका. या किसामध्ये  त्यतिखट-मीठ-धणे पूड-आमचूर किंवा लिंबाची पावडर घाला. बारीक कोथिंबीर घाला. दोन पोळ्या लाटून घ्या. एका पोळीवर हे सारण पसरा. दुसरी पोळी ठेवून कडा दाबून बंद करा. परत हलक्या हातानं थोडं लाटा. तूप लावून भाजा.

कोथिंबीर पराठा 

 चांगली कोथिंबीर धुवून घ्या. ती कोथिंबीर बारीक चिरा . त्यात तिखट, मीठ आणि जिरेपूड एकत्र करा. यात कणिक घाला, कणिक भिजवा आणि त्याचे पराठे करा. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon