Link copied!
Sign in / Sign up
5
Shares

मुलांमध्ये लहानपणापासूनच कसा जागवाल आत्मसन्मान आणि इतर स्वभाव वैशिष्ट्ये


अगदी लहान वयापासूनच मुलांमध्ये काही स्वभावविशेष पेरणे आणि विकसित क़रणे फार महत्त्वाचे आहे. आत्मसन्मान आणि स्थितीस्थापकता किंवा लवचिकता हे व्यक्तिमत्वातील स्वभावविशेष आहेत. मोठेपणी आपली मुले कशी वाढलीत हे या दोन गुणविशेषातून दिसून येईल.

आपल्या मुलांचे पालनपोषण करताना काही मूल्यांचा मजबूत पाया असला पाहिजे आणि त्या मूल्यांची संपूर्ण जाण मुलांना असली पाहिजे ह्याकडे अधिक काटेकोरपणे जास्त लक्ष देत असल्याची खात्री असली पाहिजे.

आत्मसन्मान हा व्यक्तीचा स्वतःचे मूल्य जोखण्यासाठीचे अत्यंत महत्त्वाचे मूल्य आहे. म्हणूनच मुलांमध्ये आत्मसन्मान आणि स्थितीस्थापकता ही मूल्य कशी विकसित करता येतील याच्यासाठीचे काही मार्ग पाहूया.

१. काळजी घेण्याची मानसिकता तयार करा.

काळजीवाहू आणि प्रेमळ कुटुंब हे एकत्र राहण्याच्या आणि एकमेकांची काळजी घेण्याची शिकवण मुलांना मिळत असते. दुसऱ्यांना कसे वागवले जावे वा जाते हे देखील मुलांना शिकायला मिळते. तसेच कोणत्याही प्रकारचा वाईट वर्तणूक ओळखण्यास मदत होते. त्यामुळे त्यांच्यात आत्मसन्माम जागृत होण्यास मदत होते. मुलांमध्ये काळजी घेण्याचा गुण रुजवणे आवश्यकता असते. यामुळे बऱ्या वाईट काळात एकमेकांना मदत करण्याची मूल्ये रुजवली जातात.

२. मुलांचे कौतुक करा,आणि आदराने वागवा.

अगदी लहानात  लहान यशासाठीही मुलांचे कौतुक करण्यास विसरू नका त्यामुळे त्यांना आदर दिल्याची आणि त्यांना किंमत दिल्यासारखे वाटते. पालकांनीही मुलांशी विनयाने बोलले पाहिजे. कारण लक्षात ठेवा आपण जे पे़रणार तेच उगवणार आहे.

३ सकारात्मक आदर्श व्हा

पालक हे मुलांचे पहिले आदर्श असतात जे त्यांना सतत पहायला मिळतात आणि त्यामुळे मुलांच्या मनावर मोठ्या माणसांचे सकारात्मक प्रतिमा निर्माण केली पाहिजे जेणेकरून भविष्यातील अनेक बदलांना सामोरे जाण्यासाठीची स्थितीस्थापकता मुलांमध्ये येऊ शकते. पालक असणारी जोडपी परिस्थिती कशी हाताळतात, आर्थिक गणिते कशी मांडतात, त्यांचे एकमेकांबरोबरची वर्तणूक आणि समाजात इतरांसमवेतची वर्तणूक यासर्वांतून मूल अनेक गोष्टी शिकत असते. त्यामुळे आपल्या भावनांवर ताबा ठेवा.

४. इतर मुलांमध्ये मिसळू द्या.

मुलांमध्ये आत्मसन्मान आणि स्थितीस्थापकता हे दोन्ही महत्त्वाचे गुण येण्यासाठी ही खूपच महत्त्वाची कृती आहे. समाजात संवाद साधल्यामुळे मुलांना अनोखळी लोकांशी संवाद साधणे सोप्पे जाईल आणि त्यामुळे त्यांच्यातील आत्मविश्वास वाढेल आणि नंतर त्यातून स्वाभिमान किंवा आत्मसन्मान जागृत होईल. एखाद्या संकटकाळी समाजात मिसळल्यास मदतीची गरज असेल तेव्हा मदतीचा हात देण्याचे संस्कारही मुलांवर होतील आणि त्याच वेळी इतरांना मदत करण्याचे मूल्यही रुजेल.

५.विचारकौशल्यांचा विकास

बहुतेक मुले ही भावनाशील असतात त्यामुळेच या वयात मागचा पुढचा विचार न करता थेट कृती करण्यावर भर देताना दिसतात. मात्र कृती करण्यापुर्वी सारासार विचार करण्याची सवय मुलांमध्ये बिंबवल्यास किंवा बाणवली पाहिजे आणि मग कालांतराने त्यांच्यातील तो बदल आपल्याही लक्षात येतो. त्यामुळे मुलांमध्ये योग्य विचारांती कृती करण्याचा अधिक आत्मविश्वास निर्माण होईल आणि त्यांच्याकडे कोणत्याही परिस्थितीवर मार्ग काढण्याची वृत्ती किंवा तयारी निर्माण होईल.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon