Link copied!
Sign in / Sign up
4
Shares

लहान मुलांमधील अतिसार (जुलाब)थांबवण्यासाठी घरगुती उपाय

काही छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घेतल्यास लहान मुलांना अतिसार किंवा जुलाब होणार नाहीत या गोष्टी कोणत्या ते आपण पाहणार आह

स्वच्छता 

अतिसार थांबण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तोंडात ज्या वस्तू घालतो, त्या सर्व वस्तू निर्जंतुक असणे आवश्यक आहे. त्यासाठी बाळाची सर्व खेळणी, अंथरून इ. सर्व गोष्टी सौम्य साबणाच्या पाण्यात टाका आणि स्वच्छ पाण्याने ते धुवून घ्या. त्यानंतरच ते बाळाच्या हातात द्या. तसेच तुमचं बाळ जिथं खेळतं तो भाग कसा आहे पाहा. शिवाय बाळं जिथं रांगतं, खेळतं त्या जागेवर शुज नेण्यास प्रतिबंध घाला. बाळ जिथे खेळत ती जागा निर्जंतुक करून बाळाच्या

डिहायड्रेशऩ टाळण्यासाठी

अतिसाराचा त्रास होत असल्याने बाळात झपाट्याने अशक्तपणा येतो आणि शरीरातील पाण्याचं प्रमाणही वेगानं घटतं. त्यासाठी एक लीटर पाण्यात सहा चमचे साखर आणि अर्धा चमचा मीठ टाकून केलेलं मिश्रण करून शक्य तितक्या वेळ बाळाला द्या. 

खेळणी निर्जंतुक करा 

अतिसार थांबण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तोंडात ज्या वस्तू घालतो, त्या सर्व वस्तू निर्जंतुक असणे आवश्यक आहे. त्यासाठी बाळाची सर्व खेळणी, अंथरून इ. सर्व गोष्टी सौम्य साबणाच्या पाण्यात टाका आणि स्वच्छ पाण्याने ते धुवून घ्या. त्यानंतरच ते बाळाच्या हातात द्या. तसेच तुमचं बाळ जिथं खेळतं तो भाग कसा आहे पाहा. शिवाय बाळं जिथं रांगतं, खेळतं त्या जागेवर शुज नेण्यास प्रतिबंध घाला. बाळ जिथे खेळत ती जागा निर्जंतुक करून बाळाच्या खेळण्यासाठी सुरक्षित करा. बाळाला जास्त खाऊ घालण्याचा प्रयत्न करू नका. अतिसार झालेल्या व्यक्तीला स्थायू पादर्थांपेक्षा द्रव पदार्थांची जास्त आवश्यकता असते. पण तुमचं बाळ जे काही खातंय किंवा पितंय ते हळूवारपणे करतंय याकडे लक्ष द्या. त्याने ते अन्न तसंच गिळता कामा नये.

 द्रवपदार्थ द्या

 बाळाला जास्त खाऊ घालण्याचा प्रयत्न करू नका. अतिसार झालेल्या व्यक्तीला स्थायू पादर्थांपेक्षा द्रव पदार्थांची जास्त आवश्यकता असते. पण तुमचं बाळ जे काही खातंय किंवा पितंय ते हळूवारपणे करतंय याकडे लक्ष द्या. त्याने ते अन्न तसंच गिळता कामा नये.आईचं दूध पिणाऱ्या बाळाला फक्त स्तनपानचं करावं. त्या दुधात संसर्गाला विरोध करणारे घटक असतात. तसेच त्या दुधात अतिसार शांबवण्यासाठी आवश्यक पोषक घटक असतात. त्यामुळे यावेळी बाळाला आईचे दूध देणे खूप आवश्यक असते. त्यामुळे यावेळी जर तुमचं बाळ सहा महिन्याखालील असेल, तर दुसरा कोणताही उपाय करू नका.

पोषक आणि हलका आहार

या काळात तुमचं बाळ अन्न पचवू शकत नाही. त्यामुळे बाळाला हलका आहार द्या, जो त्याला पचायलाही सोपा जाईल. सामान्यत: त्याला यावेळी  बाळाला साधी दालखिचडी द्यावी. आईचं दूध पिणाऱ्या बाळाला फक्त स्तनपानचं करावं. त्या दुधात संसर्गाला विरोध करणारे घटक असतात. तसेच त्या दुधात अतिसार शांबवण्यासाठी आवश्यक पोषक घटक असतात. त्यामुळे यावेळी बाळाला आईचे दूध देणे खूप आवश्यक असते. त्यामुळे यावेळी जर तुमचं बाळ सहा महिन्याखालील असेल, तर दुसरा कोणताही उपाय करू नका.

डॉक्टरांची मदत घ्या

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाळाला बालरोगतज्ञाकडे नेऊन योग्य ते निदान करून त्यानुसार उपचार करा. घरगुती उपाय निश्चितपणे उपयुक्त ठरतात. पण जर तुमचं बाळ जास्त काळ अतिसाराने त्रस्त असेल, तर त्याला डॉक्टरांकडे नेणं आवश्यक आहे.

पाणी 

अतिसार झाल्यावर बाळात झपाट्याने अशक्तपणा येतो आणि शरीरातील पाण्याचं प्रमाणही वेगानं घटतं. त्यामुळे अशावेळी बाळाचं शरीर हायड्रेट राहण्यासाठी प्रयत्न करा.

आराम 

सर्व इलाज करूनही बाळाचा अतिसाराचा त्रास थांबत नसेल, तर काळजी वाटमं साहजिक आहे. पण त्याचवेळी या काळात बाळासाठी झोप खूप अत्यावश्यक आहे हे विसरू नका. त्याचा चांगला आराम मिळू द्या. तसेच त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार करा.

 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon