Link copied!
Sign in / Sign up
5
Shares

हे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची

लहान मुलं निरागसपणे अव्याहत आनंद आणि प्रेम देत असतात, त्यांच्या सानिध्यात वेळ कसा जातो हे काळात देखील नाही पण ती जसं-जशी मोठी व्हायला लागतात तशी ती मजेशीर आणि गोंधळात टाकणारे प्रश्न विचारत असतात. त्यांना कोणता प्रश्न पडेल हे सांगता येत नाही आणि ते इतक्या निरागस चेहऱ्याने असे प्रश्न विचारात कि त्याला हसावे,चिडावे काय करावे किंवा त्याला उत्तर कसे दयावे हे समजत नाही…. आम्ही आज लहान मुलं हमखास विचारत असलेल्या प्रशांपैकी काही प्रश्न नक्की विचारात आणि त्याची उतारे कशी द्यायची याची साधारण माहिती देणारा आहोत.

१. आमच्या दोघांपैकी तुमचं लाडकं कोण आहे

तुमच्या मुलांनी हा प्रश्न तुम्हांला  नक्कीच विचारला असणारा आहे. काळजी करू नका  बहुतेक मुले हा प्रश्न आपल्या पालकांना नक्की विचारतात. आत्ता नसेल विचारला तर लवकरच विचारतील

या प्रश्नाला काय उत्तर द्याल - पालक म्हणून तुम्हांला  दोन्ही मुले सारखीच आवडतात  असे त्यांना सांगा. तुमचं दोघांवर सारखंच  प्रेम आहे असे सांगा आणि जर हा प्रश्न विचारणार मस्तीखोर असेल तर त्याला तुझ्यापेक्षा तुझी बहीण किंवा भाऊ आवडतं  सांगा पण तुम्ही गंम्मत आहात हे त्यांना कळू द्या अन्यथा त्याच्या मनात भावंडाविषयी राग निर्माण होऊ शकतो.....पण जर तुम्हांला  एकच मूल असेल आणि हा प्रश्न मुलाने बाबा आणि त्याच्या बाबत किंवा आई आणि त्याच्या बाबत विचारला तर तुम्हीच ठरावा  काय उत्तर द्यायचे ते

२. तुम्ही मला सोडून कामावर का जाता ”

हा खरंच खूप मनाला  घरं पडणारा प्रश्न आहे , या प्रश्नामुळे होणाऱ्या त्रास इतका त्रासदायक प्रश्न कोणता नाही . त्यांचा या प्रश्नाला कितीही वाईट वाटत असले तरी दुर्लक्ष करू नका.

या प्रश्नाला काय उत्तर द्याल- त्यांना सांगा  तुला मिळणार खाऊ-खेळणी हि आई-बाबा कामावर जातात म्हणून मिळतात. हे उत्तर दिल्यानंतर त्यांना गंभीर करू नका त्यांना काहीतरी मजेशीर सांगा. तसेच त्यांच्या बरोबर जास्तीत-जास्त वेळ घालवण्याचा प्रयन्त करा.

३.“तू माझ्या बहिणीला/भावाला का खाल्ले ?”

हा एक प्रश्न सर्वच मुले विचारातात.. दुसऱ्यांदा  अशी होणाऱ्या प्रत्येक स्त्रीने आपल्या पहिल्या मुलाच्या या प्रश्नाला नेहमी तयार असावे.

याचे उत्तर काय द्याल : हा प्रश्न मुलाचे वय आणि विचारतानाची परिस्थिती बघून उत्तर द्यावे..मूळ खेळात-खेळता विचारात असेल तर काहीतरी गंमतीशीर उत्तर द्यावे जर मूल  थोडं कळत्या वयाचे असेल तर त्याला सांगावे तू पण असाच आलास आणि तुला खेळायला बहीण किंवा भाऊ हवा म्हणून तुझ्यासाठी भावंडं आणणार आहोत. एवढे उत्तर साधारण पुरे होते

४. मला खरंच डॉक्टरांकडे  नेणार आहे का ?

बरीच मुलं  कशाला घाबरत असतील ते ते म्हणजे डॉक्टर आणि इंजेक्शन .. एकदा  कधीतरी बोललेले ते डोक्यात ठेवतात आणि डॉक्टरांविषयी भीती मनात ठेवतात. आणि औषधे आणि इंजेक्शनला घाबरत आजारी असताना डॉक्टरांकडे जाणे टाळतात.

या प्रश्नाला काय उत्तर द्याल: खरंतर तुम्ही मुलांना डॉक्टरांचा धाक दाखवू नका उलट डॉक्टर त्यांचा सुपर हिरो बनवा आणि ते आजारापासून लढायला कसे मदत करतात हे त्यांना सागा इंजेक्शनं  हे आजारांपासून लढायला देण्यात येते हे त्यांना समजावून सांगा

५. तो माणूस जाडा का आहे ?”

लहान मुलांना आपण काय बोलत आहोत याचे कधी-कधी-भान नसते आणि ते निरागपणे काहीही विचारतात. त्यांना काही कुणाला दुखवायचे नसते पण काही वेगेळे दिसले कि त्याबाबत कुतूहल त्यांना स्वस्थ बसू देत नाही.

अश्यावेळी काय कराल - हि परिस्थीती तुम्हांला  सगळ्यांसमोर थोडं खजील करणारी असते पण अश्यावेळी त्यांच्या अंगावर ना ओरडत त्यांना सात बसायला सांगा आणि नंतर त्यांच्या प्रश्नाचे उत्तर द्या.. माणूस जाड का होतो तो जाड का दिसतो याबाबत सर्व माहिती समजवून सांगा

६. हे असं का आहे ? हे काय आहे ? हे असं  का आहे

लहान वयांत मुलांना  प्रेत्यक गोष्टी बाबत का कसे आणि काय असे प्रश्न पडतात त्यांना त्यांचे हे प्रश्न जरी वैताग देणारे असले तरी त्याच्यावर न चिडता तुम्हांला जमेल ताई उत्तर देण्याचा प्रयन्त करा त्याच्यातील कुतूहल कायम ठेवा त्याचा उपयोग त्यांना पुढील आयुश्यात अभ्यास करताना होईल.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon