Link copied!
Sign in / Sign up
0
Shares

चष्मा का लागतो ? आणि लहान मुलांना चष्मा लागल्यावर घ्यायची काळजी

मोबाईल फोन लॅपटॉप,कम्प्युटर अश्या गोष्टींच्या सततच्या वापरामुळे आजकाल सर्व वयोगटात दृष्टी संदर्भात अनेक समस्या निर्माण होत आहेत. तसेच लहान बाळांना देखील जन्मतःच असणारा दृष्टिदोष, सतत हातात फोन देणे किंवा  दृष्टीतल्या कमी व जास्त दोषामुळे चष्म्याचा नंबर लागतो.लहान बाळांना दृष्टीतल्या कमी व जास्त दोषामुळे चष्म्याचा नंबर लागतो. जगातील सगळ्या वस्तूंची प्रतिबिंब आपल्या रेटिनावर (नेत्रपटलावर) पडतात. रेटिनावर पडलेल्या प्रतिबिंबाचे संदेश   मेंदूपर्यंत पोहचतो  आणि आपल्याला दिसू लागते. डोळ्यांची फोकस करायची क्षमता कमी पडू लागल्यास किंवा अपुरी असल्यास, रेटिनावरील प्रतिबिंब धूसर दिसू लागते. कृत्रिमरित्या म्हणजेच चष्माच्या आधारे धूसर प्रतिमा स्पष्ट करण्यात येते. आणि याकरता चष्म्याची आवश्यकता लागते. 

लहान मुलांना चष्म्याची आवश्यकता आहे कसे ओळखावे. 

१. जर तुमचे मूल  कोणत्याही गोष्टी बघताना साधारण पद्धतीने न बघतात डोळे बारीक किंवा किलकिले करून पाहत असेल तर 

२. टीव्ही, कम्पुटर स्क्रीनच्या अगदी जवळ जाऊन पाहात असेल

३. कुठेही पाहताना मान विशिष्टप्रकारे वळून पाहात असल्यास

४. मूल तिरळे पाहात असल्यास

५. डोकेदुखीची तक्रार करत असल्यास

लहान मुलांसाठी चष्मा निवडताना ही काळजी घ्या. 

१. चष्मा घातल्यावर मुलाचा डोळा फेमच्या वर्तुळाच्या मध्यभागी असावा.

२. काचा शक्य तितक्या स्चच्छ असाव्यात.

३. वेळोवेळी नंबर तपासून पहावा. 

४. लहान मुलं चष्मा घालण्यास कंटाळा करतात. त्यांना गोड  बोलून चष्मा घातल्यावरचा आणि नंतरचा फरक समजवून सांगावा.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon