Link copied!
Sign in / Sign up
108
Shares

लहान मुलांसाठी सूपचे काही प्रकार


लहान मुलांना आवडतील आणि पौष्टिक देखील असतील अश्या काही सूपच्या रेसिपी आपण पाहणार आहोत.

गाजर-टोमॅटो सूप

साहित्य

१ टोमॅटो, २ गाजर, एकदम छोटा कांदा, १ छोटा बटाटा,मिरे साखर,

कृती

एक टोमॅटो, दोन गाजरे एक छोटा कांदा, एक छोटा बटाटा हे सगळे दीड कप पाणी घालून कुकरमध्ये शिजवून घ्या. गार झाल्यावर मिक्सरमधून काढा. मीठ घाला. उकळून मुलांना भरवा. थोड्या मोठ्या मुलांना, थोडी साय किंवा क्रिम घाला. आणि त्यांना खायला द्या. हे सूप साधारणतः दीड आणि दीड वर्षांपुढील मुलांना दयावे.

लाला भोपळा सूप

साहित्य

दोन वाटी लाल भोपळ्याचे तुकडे (साधारण २५० ग्रॅम) एक छोटा बटाटा,एक छोटं गाजर, १ लहान कांदा, मिरी

कृती

लाल भोपळा, गाजर, कांदा आणि बटाटा असं सगळं कुकर मध्ये वाफवून घ्या. गार झाल्यावर मिक्सर मधून काढा. थोडी साय किंवा दूध घाला. नंतर उकळून मुलांना भरवा.

पालक सूप

साहित्य

छोटी पालकाची जुडी, १ टोमॅटो, १ बेबी पोटॅटो, कांद्याची मोठी फोड, ३-४ मिरी दाणे

कृती

छोटी पालकाची जुडी, १ टोमॅटो, १ बेबी पोटॅटो, कांद्याची मोठी फोड, ३-४ मिरी दाणे हे सगळं कुकरमध्ये वाफवून घ्या. शिजल्यावर गार झाल्यावर मिक्सरमधून काढून बारीक करून घ्या.थोडेसे पाणी घालून उकळून घ्या. आणि आवडत असल्यास वरून थोडी साय किंवा लोणी घाला.

फ्लॉवरचे सूप

छोटा फ्लॉवरचा गड्डा साधारण (२०० ग्राम), एक गाजर

छोटा फ्लॉवरचा गड्डा घ्या साधारण (२०० ग्राम)आणि एक गाजर असे वाफवून घ्या. आणि गार झाल्यावर मिक्सर मधून काढून घ्या. त्यात थोडे पाणी आणी लोणी किंवा साय घालून उकळून मुलांना भरावा.

वरील सूपच्या कृती या साधारण दीड वर्षच्या किंवा त्यापुढील मुलांसाठी आहेत. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon