Link copied!
Sign in / Sign up
6
Shares

लहान मुलांसाठी उन्हाळ्यातील रेसिपी

उन्हाळा सुरु झाला की भूक लागते ती काहीतरी चटपटीत खाण्याची. वास्तविक उन्हाळ्यात फार तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाऊच नयेत पण लहान काय मोठे काय सर्वांनाच भूक फारशी लागत नाही आणि काहीतरी वेगळे खायचे असते. अशा वेळी प्रश्न पडतो की वेगळे काय द्यायचे जे पौष्टीक असेल. मुलांची जर खाण्याची रड असेल तर हा प्रश्न अधिक बिकट होतो कारण सुट्टी असल्यामुळे मुले दिवसभर घरी उच्छाद आणतात आणि त्यांना सतत काहीतरी खायला हवे असते ते पण वेगळे काहीतरी. नेहमीची पोळी, भाजी, उपमा, शिरा, पोहे या गोष्टी त्यांना नकोश्यात असतात.

बरे ही घरात खेळतात त्याहून जास्त काळ उन्हात खेळत असतात. आधीच उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण कमीच होते त्यात सतत खेळून मुले थकतात आणि त्यांचा शक्तीपात होतो जणू. मुलांची शाळा असली की वेळच्या वेळी खाणे पिणे होते पण सुट्टी असली की सगळेच वेगळे होते. पण सुट्टीतही मुलांचे खाण्यापिण्याच्या वेळा बदलू नयेत याकडे लक्ष द्यायला हवे. त्याचबरोबर मुलांनी योग्य प्रमाणात पौष्टीक पदार्थ खावेत याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे.

मुलांसाठी उन्हाळ्याच्या खास रेसिपी-

दुधाचे पदार्थ-

उन्हाळ्यात मुलांना दूध प्यायला नको असेल तर त्यातही प्रयोग करता येतील. आंबा उन्हाळ्यात आपल्याकडे मिळतोच. मग करा त्याचा मिल्कशेक आणि द्या मुलांना. त्याशिवाय लस्सी, ताक हेदेखील देऊ शकता.

मिल्कशेक-

एक कप गार दूध, १ आंब्याचा गर, साखर, हवा असल्यासा बर्फ (२-३ खडे)

दूध आणि आंब्याचा गर मिक्सरमधून फिरवा. त्यात आवडीप्रमाणे साखर घाला. पुन्हा फिरवून घ्या. आता उंच ग्लास मध्ये काढा. शक्यतो बर्फ टाळा पण हवा असल्यास एखादा खडा टाका. किंवा मिल्कशेक झाल्यानंतर तो थोडावेळ फ्रीजमध्ये गार करून मुलांना द्या.

आंब्याची स्मुदी-

साहित्य-

आंब्याच्या फोडी, दही, थोडंसं क्रीम किंवा साय, आणि साखर चवीनुसार

कृती-

आंब्यांच्या फोडींसह सर्व साहित्य मिक्सरमधून फिरवा. हे मिश्रण घट्टसर होईल. आता काचेच्या ग्लासमध्ये हे मिश्रण काढून त्यावर आंब्यांच्या फोडी घाला आणि मध, फेटलेले क्रीम किंवा साय घाला.

अशाच प्रकारे केळ, स्ट्रॉबेरी, चिकू यांची स्मूदी करता येईल.

 

ओटमिल-

ओटमील हे पोटभरीचा आहार आहे. त्यासाठी २ कप ओटस घ्यावे(रोल्ड ओटस इन्स्टंट नको). २ कप दूध, आवडत असल्यास व्हॅनिला इसेन्स. हे सर्व एका बाऊलमध्ये घालून फ्रीज मध्ये रात्रभर ठेवा. सकाळी बाहेर काढून त्यात चवीसाठी साखर किंवा मध घाला. त्यानंतर बाऊल मध्ये एक स्कूप वाढा त्यावर मोसमी फळांचे तुकडे घाला. थोड्या सुक्यामेव्याचे तुकडे घाला. वरून थोडे मध किंवा मेपल किंवा चॉकलेट सिरप घाला.

चिकन

मुलांना चटपटीत खायला आवडतेच मग चिकन खाणाऱ्या मुलांसाठी एक मस्त रेसिपी करू शकतो. त्यासाठी अर्धा इंच जाडीचे तीन चिकन ब्रेस्टचे तुकडे घ्यावेत. त्याला मीठ चोळावे. एका डिशमध्ये ठेवून हे तुकडे शॅलो फ्राय करावे. आता २ अंडे फेसून घ्यावे, किसलेले चीज आणि ऑरगॅनो, बेसिल हे सर्व एकत्र करावे. हाताने कॉर्नफ्लेक्स कुस्करून घ्यावे. अंड्याच्या मिश्रणात चिकन बुडवून कॉर्नफ्लेक्समध्ये घोळवावे आणि एका कढईत तेलावर चिकन फ्राय करून घ्यावे. चिकन तयार आहे.

पनीर रोटी रोल्स

पनीरचे लांबसडक तुकडे, लसूण बारीक चिरून, मीठ, थोडे तिखट. कढईत तेल टाकून लसूण टाका त्यावर पनीरचे तुकडे टाका. चवीप्रमाणे मीठ आणि तिखट टाकून परतवा. वाफेवर शिजवा. थोडी कोqथबीर भुरभुरवा. आत पोळीवर पनीरचे हे लांबसडक तुकडे ठेवा आणि त्याचा रोल करून खायला द्या.

सोया टिक्की-

बटाट्याची टिक्की तर आपण खातोच मात्र सोया टिक्की हा अधिक पौष्टिक पदार्थ मुलांसाठी आपण करू शकतो. त्यासाठी सोयाबीनचा चुरा, उकडलेले बटाटे, मटार दाणे, मीठ, हिरवी मिरचीचे तुकडे लागतील. हे सर्व साहित्य एकत्र करा. आता या मिश्रणाचे छोटे छोटे चपटे गोळे बनवून तेलात फ्राय करा किंवा तळून घ्या. सॉस किंवा पुदीना कोथिंबीरीच्या चटणीबरोबर खायला द्या.

सँडविच-

मुलांना सतत एकच पदार्थ किंवा एकाच प्रकारचा पदार्थ नको असतो. सँडवीचही सतत जॅम, लोणी किंवा सॉसचे नको असते. मग विविध भाज्यांचा वापर करावा. त्यासाठी तीन थरांचे सँडवीच करावे. पहिल्या ब्रेडवर लोणी लावून त्यावर टोमॅटो ठेवा. मग दुसरा ब्रेड ठेवा त्यावर पुदीना चटणी लावून त्यावर काकडी ठेवा. तिसऱ्या ब्रेडला सॉस लावून त्याच बाजूने काकडीवर ठेवा. तिरंगी सँडवीच तयार होईल.

दुसऱ्या प्रकारे सँडवीच करता येईल. त्यासाठी ब्रेडच्या आठ स्लाईस घ्याव्यात. त्याच्या कडा काढून टाकाव्या. कुकी कटरने ब्रेड हव्या त्या आकारात ब्रेड कापून घ्यावा आणि मग ब्रेडला वेगवेगळे जॅम, चॉकलेट स्प्रेड, चीज स्प्रेड लावू शकता.

मिनी बर्गर

बर्गर हा तर हल्लीच्या मुलांचा आवडता पदार्थ आहे. पण तो बाहेर जाऊन खाण्यापेक्षा घरी केला तर नक्कीच मुलांना आनंद होईल. त्यासाठी लागले मिनी बन, टोमॅटो, कांदा आणि पनीरची टिक्की. किंवा फ्राय केले पनीर. आता बर्गर बन मध्ये कापून घ्या. एका बाजूला सॉस आणि एका बाजूला पुदीन्याची चटणी लावा. एका बाजूच्या ब्रेडवर टोमॅटो कांदा ठेवा त्यावर पनीर ठेवा. पुन्हा त्यावर कांदा, टोमॅटो घाला. असल्यास चीज खिसून घाला. घरात मस्टर्ड सॉस असेल तर तेही लावावे.

फ्रूट कबाब

घरात मोसमी फळे असतात. त्यातील अननस, नाश्पती, आंबा, स्ट्रॉबेरी, किवी, द्राक्षे घ्या. सर्व फळांचे स्ट्रॉबेरी सोडून साधारण चौकोनी तुकडे करून घ्या. आता एका काडीला हे सर्व तुकडे आणि स्ट्रॉबेरी लावा. फ्रीजमध्ये ठेवून थोडी गार करून मुलांना खायला द्या.

मिनी इडली

इडली हा प्रकार तर मुलांना अत्यंत प्रिय असतो. लहान साच्यात इडली करून घ्या. कढईत तेल घालून त्यात गाजर, मटार, कांदा आणि टोमॅटो कापून त्यात घाला आणि एक वाफ काढा. त्यात इडली खालून परतून घ्या. झाकण घालू नका. पुदीन्याची चटणी किंवा सॉसबरोबर खावी. यासाठी सकाळी केलेली इडली संध्याकाळी वापरली तर जास्त चांगली लागते.

दही वडा

यासाठी उडीद डाळ पाच सहा तास भिजत घालावी. तसेच थोडी चणा डाळही भिजत घालावी. नंतर दोन्ही डाळी एकत्र वाटून घ्याव्यात. वाटतानाच मीठ घालावे. मिश्रण भांड्यात काढून घ्यावे. त्यास थोडे आले वाटून घालावे. तसेच ओल्या खोबऱ्याचे बारीक तुकडेही घालावेत. आता ह्या मिश्रणाचे गोल वडे करून घ्यावेत. गरम वडे कोमट पाण्यात घालून हातांच्या तळव्यात दाबून पाणी काढून टाकावे. असे सर्व वडे करून घ्यावेत. गोडसर दही फेटून त्यात साखर, मीठ टाकावे मिसळून घ्यावे. खूप घट्ट असेल तर थोडे पाणी घालून पळीने वाढता येईल इतपत करावे. आता पाण्यातून काढलेले वडे या दह्यात घालावे. वाढताना दोन वडे त्यावर दही, चाट मसाला, तिखट भुरभुरावे. हवी असल्यास कोथिंबीर टाकावी.

या काही वेगळ्या रेसिपी मुलांना करून दिल्या तर मुले न कंटाळता खातील. त्यामुळे उन्हाळ्यातही त्यांची उर्जा टिकून राहाण्यास मदत होईल. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon