Link copied!
Sign in / Sign up
139
Shares

लहान मुलांसाठी पौष्टीक खिचडीचे ३ प्रकार

लहान मुलांसाठी विविध प्रकारे बनवलेली खिचडी हा चविष्ट आणि पौष्टिक आहार ठरू शकतो.अश्याच ३ प्रकारच्या खिचडीची कृती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

१)मुगाचा डाळीची खिचडी (साधी)

साहित्य:

२/३ कप तांदूळ

१/३ कप मुगाची डाळ

लसूण (चवीपुरता /आवश्यक वाटल्यास )

हिंग

साजूक तूप (शक्यतो गाईचे साजूक)

कृती:

१) तांदूळ आणि डाळ पाण्याने चांगल्या प्रकारे धुवून घ्या आणि अर्धा  तास पाण्यात भिजवून ठेवा.

२)अर्ध्या तासानंतर डाळ आणि तांदूळ दोन्ही मधलं सगळं पाणी काढून टाका

३) कुकर मध्ये तांदूळ,डाळ ठेचलेले लसूण आणि हिंग टाकून त्यात तीन कप पाणी घाला

४) गॅसवर तीन शिट्या होईपर्यंत खिचडी शिजू द्या (१ शिटी मोठा गॅस असताना आणि नंतरच्या २ शिट्यांना गॅस थोडा बारीक करा). लहान मुलांसाठी खिचडी करताना थोडी पातळसर करावी.

५) नंतर कुकरची वाफ गेल्यावर खिचडी मध्ये तूप घालून मुलांना भरावा

२) भाज्यांची खिचडी

साहित्य:

२/३ कप तांदूळ

१/३ तुरीची किंवा मुगाची डाळ

१ कांदा

१ टॉमेटो

छोटा अर्धा चमचा जिरे किंवा जिरे पावडर (फोडणीपुरती)

हळद (फोडणीपुरती)

कृती:

१)  तांदूळ आणि डाळ पाण्याने चांगल्या प्रकारे धुवून घ्या आणि अर्धा तास पाण्यात भिजवून ठेवा.

२) अर्ध्या तासानंतर डाळ आणि तांदूळ दोन्ही मधलं सगळं पाणी काढून टाका.

३) कुकर गॅसवर ठेऊन त्यात तूप टाकवं,तूप गरम झाल्यावर त्यात जिरा पावडर किंवा जिरे टाका जिरे तड-तडे पर्यंत वाट पहा. नंतर बारीक केलेला  कांदा टाका, तो थोडा परता.

४) त्यानंतर कापून बारीक केलेला टोमॅटो आणि इतर भाज्या टाका आणि वरतून थोडीशी हळद घाला.

५) नंतर धुतलेले डाळ तांदूळ त्यात घालून मोठ्या चमच्याने(डावाने)  त्या भाज्या आणि डाळ, तांदूळ नीट एकत्र करून घ्या.

६) आता कुकर मध्ये ३ काप पाणी घाला आणि झाकण बंद करून ३ शिट्या होऊ द्या (१ शिट्टी मोठा गॅस असताना आणि बाकी २ माध्यम गॅस असताना ) खिचडी पातळसर होऊ द्यावी

७) कुकरची वाफ गेल्यानंतर खिचडीकाढून त्यातलं भाज्या नीट कुस्करून त्यात तूप घालून ती खिचडी मुलांना भरवावी.

३.दलियाची खिचडी  

साहित्य:

२/३ कप तांदूळ

१/३ तुरीची किंवा मुगाची डाळ

१ कांदा

१ टॉमेटो

छोटा अर्धा चमचा जिरे किंवा जिरे पावडर (फोडणीपुरती)

हळद (फोडणीपुरती)

 कृती:

१) दलिया  आणि डाळ पाण्याने चांगल्या प्रकारे धुवून घ्या आणि अर्धा तास पाण्यात भिजवून ठेवा.

२) नंतर सगळं पाणी काढून टाका

३) कुकर गॅस वर ठेऊन त्यात तूप टाका, तूप गरम झाल्यावर त्यात जिरा पावडर किंवा जिरे टाका जिरे  तड-तडे पर्यंत वाट पहा

४) नंतर त्यात बारीक कापलेले कांदा आणि आलं-लसूण पेस्ट टाका आणि चांगला एकत्र करून घ्या

५) आता त्यात कापून बारीक केलेल्या भाज्या टाका त्या नीट एकत्र करून घ्या.

६)आता दलिया आणि मुगाची डाळ कुकरमध्ये टाका

७) त्यात ४ कप पाणी घाला

८) ४ शिट्या होऊ द्या

९) कुकरची वाफ गेल्यावर तूप घालून हि दलिया खिचडी मुलांना भरावा

Click here for the best in baby advice
What do you think?
50%
Wow!
50%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon