Link copied!
Sign in / Sign up
66
Shares

लहान मुलांसाठी पौष्टिक खाऊ


लहान मुलांसाठी रोज काय करावे जे त्यांना आवडेल देखील आणि पौष्टिक देखील असेल हा प्रश्न नेहमी प्रत्येक आईला पडलेला असतो यांसाठी आम्ही लहान मुलांसाठी काही रेसिपी देणार आहोत ज्या पौष्टिक देखील आहेत आणि मुलांना आवडतील देखील 

१. कणकेचा शिरा

 १ वाटी कणीक असेल तर १ वाटी तूप आणि अर्धा ते पाऊण वाटी गूळ घ्या. साधारणपणे दुप्पट दूध घ्या. कणीक आधी कोरडी खमंग भाजा. न. भाजत आली की त्यात साजुक तूप घाला. परत चांगला खमंग वास येईपर्यंत भाजा. नंतर त्यात कोमट दूध घाला. नीट हलवून झाकण ठेवून वाफ येऊ द्या. वाफ आल्यावर त्यात किसलेला गूळ घाला. हलवून घ्या. गूळ विरघळला की गॅस बारीक करून झाकण ठेवा. एक वाफ आली की गॅस बंद करा. अतिशय सुंदर लुसलुशीत शिरा होतो. कणीक आधी कोरडी भाजलीत तर तूप कमी लागतं. 

२. दलियाची खीर 

 गव्हाचा रवा किंवा दलिया किराणा दुकानात मिळतो. तो धुवून २ तास भिजवून ठेवा. भिजला की त्यातलं पाणी तसंच ठेवून त्यात गूळ घाला. खोवलेलं ओलं खोबरं घाला. चिमूटभर मीठ घाला. कुकरला भांड्यात ठेवून, मंद आचेवर निदान २०-२५ मिनिटं शिजू द्या. दलिया फुलतो म्हणून पाणी भरपूर असू द्या. दलिया शिजल्यावर, जरा कोमट झाला की हँड मिक्सरनं जरासं फिरवून घ्या. थंड होऊ द्या. नंतर त्यात हवं तसं दूध घाला. दूध घातल्यावर उकळू नका कारण गुळामुळे दूध नासण्याची शक्यता असते. भिजवून शिजवलेला काजू तुकडा आणि थोडी जायफळ पूड घाला. थंड करून खायला द्या. आवडत असेल तर गरमच द्या.

३. पुदिना बटाटा रोल

 

साहित्य-पोळ्या ,२ मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे,पुदिना चटणी,चाट मसाला, मीठ

 पोळीवर चटणी लावावी. मध्यभागी भाज्यांचा १ भाग उभा ठेवावा. थोडे मीठ आणि चाट मसाला भुरभुरावा. रोल करून घ्यावा. तव्यावर थोडे तूप किंवा तेल घालून रोल हलकासा भाजून घ्यावा.

आवडत असल्यास इतर भाज्या कांदा टोमॅटो या भाज्या घालू शकता. 

टीप-यापैकी शिरा आणि खीर ल  वर्षेच्या मुलाला देखील देऊ शकता परंतु रोल हे ४ ते पाच वर्षेच्या  पुढील मुलांना द्या 


Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon