Link copied!
Sign in / Sign up
27
Shares

लहान मुलांमधील उवांची समस्या.

उवा आणि लिखा केसांच्या स्वछ्तेबाबत आणि आरोग्याबाबत विचार करता लहान मुलांमध्ये आदळणारी एक समस्या म्हणजे केसात उवा होणे. या उवा प्रामुख्याने संगतीतूनच पसरतात. या उवा एका मुलाकडून दुसऱ्या मुलांकडे संपर्कातून पसरतात आणि मुलांसाठी समस्या निर्माण करतात. तुमचे बाळ ६ महिन्याचे असेल तरीही ह्याची लागण त्यांना होऊ शकते. कितीही स्वच्छता आणि काळजी घेतली तरीही संपर्कामुळे उवांची समस्या उद्भवतेच.

ह्या उवा कशा असतात ?

ह्या उवा छोट्या छोट्या किड्यांच्या स्वरुपात असतात. त्यांना उडता येत नाही. एकमेकांच्या शारीरिक संपर्कात आल्यास किंवा ज्यांच्या डोक्यात उवा आहेत त्यांचा कंगवा वापरल्यास ह्याची लागण होऊ शकते.उवा रक्त शोषण्याचे काम दर ४-५ तासाला करतात. यामुळे डोक्यात खाज येते आणि टाळूला त्रास होतो.या उवांचा सर्वात वाईट गुण असा की त्यांच्या ३० दिवसाच्या आयुष्यात त्या जवळपास १८० अंडी देतात. या अंड्याना ‘लिखा’ म्हणतात. तर विचार करा जर तुमच्या मुलाच्या डोक्यात खूप प्रमाणात उवा असतील तर लिखा किती प्रमाणात असतील !

डोक्यात उवा असण्याची लक्षणे.

जर तुमचे मुल वारंवार डोके खाजवत असेल, खास करून कानामागे आणि मागच्या बाजूला मानेच्या वर तर हे डोक्यात उवा असण्याचे लक्षण आहे. त्यांच्या टाळूचे नीट निरीक्षण करा. केसांच्या मुळाशी लिखा असू शकतात. ह्या लिखा उघड्या डोळ्यांना दिसू शकतात. छोट्याश्या आकाराच्या बारीक काळ्या उवा आणि पांढरट रंगाच्या लिखा तुम्हाला दिसतील. याच सतत खाज येण्याचे कारण असतात.

तुम्हाला जर या उवा मुलांच्या डोक्यात आढळल्यास कुटुंबातील इतर लोकांचीही तपासणी करा. संपर्कात आल्याने ह्या उवा इतरांच्या डोक्यात देखील होऊ शकतात.

उवांच्या समस्येवर उपचार.

डोक्यात झालेल्या उवांवर उपचार करणे अवघड काम नाही. तुम्हाला केवळ थोडासा धीर धरावा लागेल. खाली काही टिप्स दिलेल्या आहेत त्यांचा वापर करून तुम्ही उवांवर उपचार करू शकता.

१ .उवांसाठी खास बनवलेले ‘अॅन्टी लीस’ शाम्पू बाजारात मिळतात. त्यांचा वापर तुम्ही करू शकतात. यापैअजून एक पद्धत म्हणजे या उवा हाताने काढणे. खास करून लिखा. यांना हाताने काढा किंवा कंगवयाची मदत घेऊन काढा आणि त्या परत येणार नाहीत याची काळजी घ्या.

२. यात अनुभवी व्यक्तीची मदत आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.

३.  केस काढण्याचा कंगवा घ्या. त्याला पाण्यात ओला करून डोक्यावरून फिरवा. याबाबतीत योग्य ती काळजी घ्या.

४.  सर्व वैयक्तिक वस्तू गरम पाण्यात एकदा धुवून काढा आणि सोबत कडक उन्हात वाळवा. वाळलेल्या वस्तू प्लास्टिकच्या बागेत – बंद करून ठेवा. टाळूच्या बाहेर उवा २४ तासापेक्षा जास्त काळ जिवंत राहू शकत नाहीत. पणलिखा म्हणजेच त्यांची अंडी १० दिवसापर्यंत राहतात.

५. कोणताही पेट शाम्पू किंवा केरोसीन वापरू नका. त्याचे परिणाम विपरीत होऊ शकतात.

६.  सोफा किंवा गाडीवर पडलेल्या उवा-लीखांची सफाई करण्यासाठी ‘व्ह्याक्युम क्लीनर’ चा वापर करा.

७. महत्त्वाची टीप- मुठभर कडुलिंबाची पाने आणि तुळशीची पाने पाण्यात उकळून घ्या. ह्या पाण्याचे नियमितपणे मुलांचे केस धुतल्यास कोंडा आणि उवा नाहीश्या होतात.

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमच्या मुलांना शिकवणे म्हणजे वैयक्तिक स्वच्छता. स्वत:च्या वैयक्तिक वस्तू इतरांना वापरू न देण्याचे महत्व त्यांना समजावून सांगा, जसे, टोवेल आणि कंगवा. त्यांच्या कोणत्याही मित्र- मैत्रिणींना डोक्यात उवा झाल्या असतील त्यांपासून तुमच्या पाल्याला दूरच ठेवा.! 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon