Link copied!
Sign in / Sign up
7
Shares

लहान मुलांमधील मेंदूचा दाह आणि सूज (मेंदूज्वर) encephalitis in children: गोरखपूर हॉस्पिटलमधील दुर्घटना


लहान मुलांना होणाऱ्या काही सामान्य आजारांसाठी परिणामकारक उपचार आहेत परंतु असे ही काही गुंतागुंतीचे आणि गंभीर आजार आहेत जे मुलांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरतात. काही दिवसांपूर्वी गोरखपूर मधील BRD दवाखान्यात केवळ तीनच दिवसांत ३० मुलांचा मृत्यू झाला. 

                                     गोरखपूर हॉस्पिटल 

शहरातील सर्वात मोठ्या सरकारी इस्पितळात काही वेळासाठी ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाल्याने हे मृत्यू ओढावले. ही घटना घडण्यापूर्वी आणि नंतरही लहान मुलांना सातत्याने स्वतःचे प्राण गमवावे लागत होते. प्रसारमाध्यमांनी ही घटना उचलून धरल्यानंतर या मृत्यूमागचे कारण AES म्हणजेच मेंदूचा तीव्र दाह आणि जपानी मेंदूदाह हा आजार असल्याचे निष्पन्न झाले.या आजारामुळे संपूर्ण देशभरात धोक्याची घंटा वाजली आहे.

मेंदूचा दाह म्हणजे काय :

मेंदूचा होणारा दाह आणि सूज म्हणजेच encephylitis या दाह किंवा जळजळीमुळे मेंदूला सूज येते ज्यामुळे मुलांच्या चेतासंस्थेत बदल होतो आणि मानसिक संभ्रम,मानसिक अवस्थेत बदल आणि अगदी आकडी किंवा झटकेही येऊ शकतात.

मेंदूदाहाला कोण जास्त बळी पडते :

                                                छायाचित्र - द हिंदू 

भारतात आणि परदेशात या आजाराच्या झालेल्या नोंदींवरून असे लक्षात आले आहे कि निरोगी प्रौढांच्या तुलनेत लहान मुले आणि वयस्क मेंदूदाहाला जास्त प्रमाणात बळी पडतात.खरे पाहता,कमजोर आणि अविकसित प्रतिकारक्षमता असणारे लोकांना हा आजार होऊ शकतो.

मेंदूदाहाची लक्षणे कोणती आहेत?

मेंदूदाह हा आजार मुळात निदान करण्यास आणि ओळखण्यासाठी कठीण असतो कारण या आजारात सुरुवातीला जाणवणारी लक्षणे अतिशय सामान्य असतात आणि याचे पक्के आणि अचूक निदान करण्याचा खात्रीशीर मार्ग म्हणजे मेंदूची बायोप्सी करणे पण या प्रक्रियेत संक्रमण पसरण्याचा धोका असतो. यासोबतच,मुलांमध्ये खालील लक्षणे दिसून आल्यास वेळीच सावध होण्याची गरज असते.

- ताप

- एन्सिफलोपॅथी म्हणजेच, मूल नेहमीपेक्षा जास्त पेंगुळलेले आणि झोपाळू बनणे

- मुलाच्या सामाजिक आणि सामान्य वागण्यात बदल होणे

- आकडी /झटके येणे

- संभ्रमावस्था आणि आभास होणे

- त्वचेवर पुरळ आणि प्रकाश सहन न होणे

- डोकेदुखी आणि शरीरातील काही भाग निकामी होणे

मेंदूदाह कसा होतो?

केवळ मेंदूला होणाऱ्या दाहामुळे हा आजार होतो असा चुकीचा समज आढळतो पण लहान मुलांमध्ये विषाणू आणि रोगप्रतिकार प्रणाली मध्ये झालेल्या संक्रमणामुळे ही हा आजार होतो. मेंदूदाह होण्याची इतर कारणे:

- डास चावणे

- मूल इतर कुठल्या आजाराने ग्रस्त असणे

- स्वयंप्रतिकारक रोग असणे

- सध्या अस्तित्वात नसणाऱ्या विषाणूला प्रतिकार संस्था अवरोध करत असल्यास

मेंदूदाहाचा प्रतिबंध आणि उपचार :

मुलाचे एकूणच आरोग्य आणि वय यावर मुख्यतः उपचार अवलंबून असतात तसेच मेंदूदाहाची तीव्रता ही लक्षात घेणे महत्वाचे ठरते.बरेचदा, योग्य निरीक्षणासाठी आणि नियंत्रित वातावरणासाठी मुलास रुग्णालयात दाखल करावे लागते.हा आजार बारा होण्यासाठी कोणताही घरगुती उपचार नाही यामुळे तातडीने डॉक्टरांना दाखवणे गरजेचे असते.

मेंदूदाहाच्या प्रतिबंधासाठी मुलांनी लांब बाह्यांचे कपडे घालणे,जास्त डास असल्यास बाहेर न जाणे, वेळेवर प्रतिबंधक लसी टोचून घेणे आणि स्वस्थ, आरोग्यपूर्ण वातावरणात राहणे आवश्यक आहे.

मेंदूज्वराचे संक्रमण मुलासाठी जीवघेणे ठरू शकते हे लक्षात ठेवा आणि या आजाराची लक्षणे दिसताच डॉक्टरांना दाखवण्यास अजिबात उशीर लावू नका. 

      छायाचित्र साभार - द हिंदू, इंडिया टुडे आणि live mint  

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

Recently, we launched a baby-safe, natural and toxin-free floor cleaner. Recommended by moms and doctors all over India, this floor-cleaner liquid gets rid of germs and stains without adding harmful toxins to the floor. Click here to buy it and let us know if you liked it.

Stay tuned for our future product launches - we plan to launch a range of homecare products that will keep your little explorer healthy, safe and happy!

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
100%
What?
scroll up icon