Link copied!
Sign in / Sign up
6
Shares

मुलांमधील केसगळती: कारणे आणि उपाय


एका आईने आम्हाला विचारले की, माझ्या बाळाचे केस गळत आहेत तेव्हा काय करता येईल? जेव्हा प्रौढ लोकांचे केस गळतात, तेव्हा तो एक चिंतेचा विषय असतो; पण जेव्हा एका लहान मुलाचे केस गळणे चालू होते, तेव्हा सहसा आपण दुर्लक्ष करतो.  अशावेळी फक्त पालकच चिंतित होतील असे नव्हे; तर बाळाच्याही आत्मविश्वासावर त्याचा परिणाम होतो. म्हणून मुलांमधील केसगळती आणि त्यावरील उपाय यावरील पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत. 

१) केसगळतीची कारणे 

केसगळतीची अवैद्यकीय कारणे

* अर्भकांची केसगळती

सामान्यतः अर्भकामधील केसांची जागा हे टिकणारे केस घेतात; म्हणून जुन्या केसांची गळती होते. हे सहसा जन्मानंतर पहिल्या काही महिन्यांमध्ये होते.

* केस घासणे

तुमच्या बाळाला तीन ते सहा महिन्यांच्या दरम्यान एका विशिष्ट जागेवर टक्कल पडणे, हे एक सामान्य लक्षण आहे. हे पलंगावरील गादी व कारच्या सीटच्या घर्षणामुळे घडते; आणि एकदा तुमचे बाळ बसू लागले की, ते गळणारे केस परत यायला चालु होतात.

* केसांशी छेडछाड

तुमच्या बाळाच्या केसांना कठोरपणे हाताळणे, घाईघाईने केस विंचरणे, घट्ट पोनिटेलमध्ये किंवा पुंजक्यामध्ये केस बांधणे यांमुळे केसगळती होऊ शकते.

२) वैद्यकीय कारणे

* डोक्यावर होणारा त्वचारोग (टिनिया कॅपिटिस)

हा एक बुरशीजन्य संसर्ग आहे आणि सामान्यतः 'टाळूचा गजकर्ण' या नावाने ओळखला जातो. हा सहसा डोक्यावरील केस गळालेल्या खवलेयुक्त भागाने ओळखला जातो. या संसर्गामुळे केस टाळूच्या त्वचेजवळच तुटून जातात. पाहताना हे टाळूवर काळे डाग असल्यासारखे वाटते.

* एलोपेशिया एरियाटा

हा एक केसगळतीचा असंसर्गजन्य प्रकार असून, केसांच्या बीज कोशावर शरीराच्या रोगप्रतिकार प्रणालीच्या हल्ल्यामुळे हा रोग होतो. यामध्ये अचानकपणे डोक्यावर केसगळतीमुळे गोलाकार आणि अंडाकार आकाराचे सपाट भाग तयार होतात. परंतु टिनिया कॅपिटिस सारखे हे भाग खवलेयुक्त नसून, मुलायम असतात आणि केसही तुटलेले नसतात. याचे नंतर एलोपेशिया टोटॅलीस (टाळूवरचे सगळे केस उडून जाणे) किंवा एलोपेशिया युनिवर्सालीस (शरीरावरचे सगळे केस उडून जाणे) यामध्ये रूपांतर होऊ शकते.

* ट्रिकोटिलोमॅनिया

बाळाचे केस खेचणे, उपटणे, पिळणे वा रगडण्याने ही परिस्थिती उद्भवते. ही केसगळती ठराविक भागांमध्ये होते आणि वेगवेगळ्या लांबीच्या तुटलेल्या केसांनी ती ओळखता येते. चिंता किंवा तणावाने ही परिस्थिती आणखी बिघडू शकते.

* टेलोजन इफ्लूव्हियम

जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, शस्त्रक्रिया, भरपूर ताप येणे, डॉक्टरांनी लिहून दिलेले औषधोपचार घेणे यांसारख्या अचानक आणि भरपूर तणावाच्या घटनांमुळे केसांचे बीजकोश हे टेलोजन फेज (विश्रांतीची अवस्था) मध्ये पोहोचतात. ६ ते १६ आठवड्यांच्या दरम्यान केस प्रचंड प्रमाणात गळू लागतात आणि त्यामुळे आंशिक अथवा पूर्णतः टक्कल पडते. तथापि एकदा तणावग्रस्त परिस्थिती निवळली की, एका वर्षाच्या आत केस पूर्ववत उगवू लागतात.

३) पोषकद्रव्यांचा अभाव

विटामिन H किंवा बायोटिन, झिंक यांसारख्या पोषकद्रव्यांचा अभाव वा विटामिन A चे अतिसेवन यांमुळे केसगळती होऊ शकते.

* अंतःस्त्रावाची समस्या

केसगळतीचे आणखी एक कारण म्हणजे 'हायपोथायरॉइडिझम'. यामध्ये थायरॉइड ग्रंथी निष्क्रिय होतात आणि पुरेशा प्रमाणात या हार्मोन्स निर्माण करत नाहीत; जे चयापचय क्रिया नियंत्रित करण्यासाठी आवश्यक असतात.

* केसगळतीवर उपाय

* तेल

नारळाचे तेल, ऑलिव्ह तेल, जोजोबा यांसारखे वेगवेगळ्या प्रकारचे तेल केसांच्या वाढीमध्ये मदत करतात. केसांना वाढवण्यामध्ये प्रत्येक तेलाचा विशिष्ट परिणाम असतो. उदा. नारळाचे तेल कोंड्याचे प्रमाण घटवते आणि केस सरळ करते. ऑलिव्ह तेल केसांना मजबूत बनवते आणि केसगळती रोखते.

* स्वस्थ आहार

जर तुमचे बाळ निरोगी आहार घेत असेल; तर बहुतेक समस्या आपोआप निकाली निघतात. खरे पाहता, केसगळती रोखण्याकरता स्वस्थ आहारामध्ये भरपूर प्रथिने, सेंद्रीय भाज्या आणि फळे यांचा समावेश करा. केसगळती रोखण्यामागील प्रमुख जीवनसत्त्वे म्हणजे विटामिन A, C, E, झिंक आणि लोह होय.

* केसांची काळजी घेणे

बाळाला आंघोळीवेळी, नंतर केस सुकवताना आणि केसांना विंचरताना केसांची विशेष काळजी घेणे आणि घट्ट केसांचे चाप वा तत्सम वस्तू टाळणे- यामुळे आपण केसांची हानी आणि तुटणे टाळू शकतो.

* ऍप्पल साइडर विनेगर

हे शरीरातील अल्कलींचे प्रमाण भरून काढते आणि तुमच्या बाळाच्या शरीरातील द्रव्यांचे आदर्श प्रमाण नियंत्रित करण्यास मदत करते.

* बायोटिन

हा विटामिन बी च्या संमिश्रणाचा एक प्रकार असून हे केस त्वचा आणि नखांच्या वाढीला पोषण देतात. रोज बायोटिनचे सेवन करण्याने गेलेले केस परत येतात आणि शरीरातील पोषणद्रव्यांचे प्रमाण योग्य राहते.


Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon