Link copied!
Sign in / Sign up
178
Shares

लहान मुलांच्या प्रतिकारक्षमतेच्या(इम्युनिटी) प्रतिकारशक्ती वाढीसाठी हे करा

ऋतुमानाच्या बदलाचा सर्वाधिक त्रास कोणाला होत असेल तर तो लहान मुलांना त्यातही १ वर्ष ते ५ वर्ष वयाच्या मुलांना त्याचा अधिक त्रास होतो. ऋतु बदलला की सर्दी, खोकला, ताप ह्या गोष्टी अगदी निमित्ताला कारणच शोधत असतात. अनेकदा मुले सतत सर्दी किंवा खोकल्याने आजारी पडतात आणि मग डॉक्टर सांगतात की मुलांनी इम्युनिटी अर्थात प्रतिकारशक्ती वाढली पाहिजे.

प्रतिकारशक्ती म्हणजे काय

प्रतिकारशक्ती म्हणजे कोणत्याही संसर्गाशी लढणे आणि त्यातून आजाराला प्रतिबंध करण्यासाठीची शरीराची जीवशास्त्रीय रचना, प्रक्रिया आणि अवयवांची क्षमता. कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून शरीराचा बचाव करणे हे प्रतिकार क्षमतेचे मुख्य कार्य असते. प्रतिकार क्षमतेमुळे शरीरावर बसणारे लाखो सूक्ष्मजीव (ज्यामध्ये जीवाणू, विषाणू, परजीवी, बुरशी) ओळखून नष्ट होतात. प्रतिकार शक्ती वाढवणे हे रोगांच्या प्रतिकारासाठी सर्वात महत्त्वाचे असते त्यामुळे सर्दी, खोकला किंवा फ्लू होण्याचे प्रमाण कमी होते.

मुलांची प्रतिकार शक्ती

मुलांमध्ये प्रतिकार शक्ती वाढवणे याचा अर्थ फक्त त्यांचे वजन वाढणे असा नक्कीच नसतो. मुळातच आपल्याकडे हेल्दी बेबी ही चुकीची संकल्पना रुजली आहे. त्यामुळे बाळ गुटगुटीत कसे होईल याकडे लक्ष दिले जाते. जसे खूप बारीक किंवा खूप गुटगुटीत बाळ म्हणजे त्याची प्रतिकारशक्ती चांगली हे गैरसमज आहेत. त्यामुळे प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी इतर काही प्रयत्न जरुर करावे लागतात. काही नैसर्गिक उपायांनी ती आपण नक्कीच वाढवू शकतो.

कशी वाढवावी मुलांची प्रतिकारशक्ती

मुलांना सर्वसाधारणपणे घनआहाराची सुरुवात केली जाते ती सहा महिन्यांपासून आणि एक वर्षाच्या बाळाने ताटातले सर्व पदार्थ खाल्ले पाहिजेत असे तज्ज्ञ आवर्जून सांगतात. मात्र त्या आधीच्या काळात बाळ आईच्या दुधावर अर्थात स्तनपानावरच असते. त्यामुळे या काळात बाळाची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काही पूरक औषधांचा आधार नक्की घेऊ शकता. जेणेकरून मुलांना ओमेगा ३, ए, सी, डी आणि ई जीवनसत्त्व मिळतील. मग जेव्हा मूल खाऊ लागेल तेव्हा त्याला आहारातून असे पदार्थ द्यावेत ज्यामुळे त्याची प्रतिकारशक्ती वाढेल. झिंक हा प्रतिकारशक्ती वाढवण्यातील महत्त्वाचा घटक असतो.

हिरव्या भाज्या

कोबी, फ्लॉवर, पालक, ब्रोकोली, मेथी या भाज्यांचे सेवन केल्यास संसर्गाशी दोन हात करता येतात. अनेक पोषक घटक, अँटीऑक्सीडंट जसे बीटा कॅरोटीन आणि इतर जीवनसत्त्व ही प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत करतात. तसेच रंगीत भोपळी मिरच्या यांच्यामध्ये सी जीवनसत्त्वाचे प्रमाण अधिक असते त्यामुळे सर्दी खोकला यांच्याशी लढणे सोपे होते. हिरवा वाटाणा किंवा मटार मध्ये अँटीऑक्सिडंटस जसे फ्लॅवोनॉईडस्, कॅरोटेनॉईडस्, फेनोलिक अ‍ॅसिड आणि पॉलीफिनॉल असते.

कंदमुळे

रताळे, गाजर आणि बटाटा यांच्यामुळे प्रतिकारशक्ती सुधारते तसेच श्वसनसंस्थाही निकोप होण्यास मदत होते.

फळे

ज्या फळांमध्ये भाज्यांमध्ये ए आणि सी जीवनसत्व, मॅगनीज, मॅग्नेशिअम आणि फोलेट असते त्या सर्व भाज्या फळे मुलांना द्यावीत. उदा. भोपळा, अ‍ॅप्रिकॉट, संत्रे, मोसंबी, तसेच विविध बेरी वर्गाती स्ट्रॉबेरी, रासबेरी, ब्लुबेरी, क्रॅनबेरी इत्यादी भाज्यांमध्ये फायटोकेमिकल्स आणि फ्लॅवेनॉईडस असतात तसेच अँटीऑक्सीडंटचे प्रमाण अधिक असते त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते.

     डाळी

डाळींमध्ये प्रथिनांचे प्रमाण भरपूर असते त्यामुळे शरीरातील फोलेट आणि पोटॅशिअम वाढवण्यास मदत होते.

मोडाची धान्ये

कडधान्यांमध्ये आरोग्यदायी घटक असतात पण त्यांना मोड आणले तर त्याचे अधिक फायदे होतात. मोड आणल्यास कडधान्यातील पोषक घटकांचे प्रमाण वाढते तसेच शरीरात हे घटक शोषणेही सोपे जाते.

सुकामेवा

बदाम, अक्रोड, भोपळ्याच्या बिया, जवस, सूर्यफुलाच्या बिया ह्या सर्वांमध्ये ई जीवनसत्त्वाचे प्रमाण भरपूर असते. अँटी ऑक्सिडंट आणि प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी हे उपयुक्त असते.

दही

दह्यामध्ये पचनास योग्य असे प्रोबायोटिक्स असते. त्यामुळे प्रतिकार क्षमता वाढते आणि अनेक सूक्ष्मजीवांविरोधात लढण्यासाठी शरीराला मदत मिळते.

हळद

हा घटक तर प्रत्येक स्वयंपाकघरात असतोच. ती अँटीसेप्टिक असते. तसेच दाह कमी करण्याची क्षमता तिच्यात असते. हळद काही सूक्ष्मजीवांचा मुकाबला करु शकते.

मध-

मधामध्ये सूक्षजीवविरोधी गुणधर्म असतात. घसा खवखवत असेल तेव्हा मध चाटल्याने घशाला आराम मिळतो. अर्थात मधाचा वापर हा बाळ एक वर्षांचे झाल्यानंतरच करावा.

त्या व्यतिरिक्तही काही छोट्या छोट्या गोष्टी बाळाची प्रतिकारक्षमता वाढवण्यास मदत करतात.

शुद्ध मोकळी हवा 

मुलांना शुद्ध मोकळी हवा आणि सूर्यप्रकाश मिळणे गरजेचे आहे. मुलांच्या प्रतिकार क्षमतेच्या वाढीसाठी डी जीवनसत्व खूप महत्त्वाचे असते. ते केवळ सूर्यप्रकाशातूनच मिळते. त्यामुळे कोणत्याही ऋतुत लहान बाळांना वीस मिनिटे उन्हात घेऊन जाणे अत्यंत गरजेचे आहे. ताजी हवा फुफ्फुसात जाते आणि बाहेरच्या हवेत गेल्याने मुलांना ताजेतवाने वाटते.

दुपट्यात गुंडाळावे 

बाळाला उबदार दुपट्यात गुंडाळावे जेणेकरून शरीर गार पडणार नाही आणि जीवाणू किंवा विषाणू शरीरात प्रवेश क़रणार नाहीत.

शरीरातील पाण्याचे प्रमाण

उन्हाळ्यासारख्या ऋतुमध्ये हवेतील उष्णतेमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी पाणी खूप मदत करते. त्यामुळे आजाराशी लढण्यासाठी पाणी खूप महत्त्वाचे आहे. मुलांना इतर सरबते देखील पाण्याऐवजी अधूनमधून दिली जाऊ शकतात.

हातांची स्वच्छता

मुले शाळेत किंवा डे केअर ला जाऊ लागली की त्यांचे खेळ वाढतात. इकडे तिकडे हात लावणे होतेच. त्यामुळे मुलांचे हात पाय बाहेरुन आल्यावर, जेवणाआधी धुणे फार महत्त्वाचे आहे.

झोपेचा वेळ

मुलांची झोप कमी झाल्यासही ते लवकर आजारी पडू शकतात. त्यामुळे पुरेशी झोप होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. रांगत्या मुलांना १२-१३ तास तर पूर्वप्राथमिक वर्गांमध्ये जाणाèया मुलांना किमान १०तास झोपेची आवश्यक असते. मुलांना दिवसभरात जास्त झोप मिळत नसेल तर रात्री त्यांना लवकर झोपवावे.

व्यायाम

प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हा उत्तम उपाय आहे. मुलांना व्यायामाची आवड निर्माण होऊन सवय लावण्यासाठी घरातल्या मोठ्या व्यक्तींनी त्यांच्याबरोबर व्यायाम करावा. तसेच मुलांना मैदानी खेळांची आवड निर्माण करावी.

काही अन्नपदार्थ आणि जीवनशैलीच्या चांगल्या सवयी यामुळे नैसर्गिकपणे मुलांची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. त्यासाठी वेगळे काही प्रयत्न करावे लागत नाहीत.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
67%
Wow!
33%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon