Link copied!
Sign in / Sign up
7
Shares

लहान मुलांच्या कानाला होणारे इंफेक्शन

लहान मुलांना विशेषतः ६ महिने ते २ वर्षे वयाच्या मुलांमध्ये सर्दीइतकाच सामान्यपणे दिसून येणारा त्रास म्हणजे कानाचे संक्रमण.असे संक्रमनापासून प्रतिबंध करण्यासाठी खूप कमी उपाय आहेत. खरे तर हा काही आजार नव्हे तर तुमच्या बाळाच्या वाढीतील एक टप्पा असतो. असे असले तरी आपल्या लहानग्याला वेदना होत असतांना बघणे कठीण असते. यासाठी बाळाच्या कानात संक्रमण झाले असतांना त्रास कमी होण्यासाठी काय करावे हे बघूया.

कारणे 

कानामध्ये संक्रमण होण्यासाठी विषाणू आणि जंतू कारणीभूत असतात. जेव्हा मुलांना एखादी ऍलर्जी किंवा सर्दी होते तेव्हा घशातून कानाच्या मधल्या भागात जाणाऱ्या नलिकेला आलेल्या सूजेमुळे कानात द्रव पदार्थ साचून राहतो ज्यामुळे या भागात जंतूंची वाढ होते आणि संक्रमण होते. यामुळेच जेव्हा जेव्हा सर्दी होते त्यानंतर कानात संक्रमण होते आणि या सोबतच ताप हि येऊ शकतो.

लहान मुलांच्या कानातील नलिका छोट्या आणि आडव्या पसरलेल्या असतात ज्यामुळे साचून राहिलेले द्रव निघून जाणे कठीण बनते.मूले मोठी झाल्यानंतर या मालिकांची लांबी तिपटीने वाढते आणि छोट्या बाळांमध्ये मोठ्या पेक्षा कानाच्या संक्रमणाचे प्रमाण खूप जास्त आहे.

लक्षणे

''माझा कान दुखतोय,हे संक्रमण असू शकते '', असे तुमचे छोटेसे बाळ तुम्हाला नेमकेपणाने बोलून सांगू शकत नाही,यासाठी बाळाच्या कानात संक्रमण झाले आहे हे दाखवणारी लक्षणे आणि संकेत तुम्ही लक्षात घेणे खूपच महत्वाचे ठरते.

१] सगळ्यात मोठा दिसून येणारे लक्षण म्हणजे बाळाच्या वागण्यात आणि मूड मध्ये होणारl बदल.तुमचे बाळ नेहमीपेक्षा जास्त चिडचिडे आणि रडके बनते आणि त्याला झोप हि लागत नाही.

२] तुमच्या बाळाला कानात वेदना होत असतील तर तो कान ओढू शकते पण कानात संक्रमण झाल्याचे पक्के लक्षण म्हणता येणार नाही.

३] कानात संक्रमण झाल्यानंतर भूकही मंदावते कारण गिळतांना वेदना झाल्यास बाळ खाणे टाळते.

४] कानामध्ये संक्रमण झाल्याचे सहजपणे दिसून येणारे लक्षण म्हणजे कानातून येणारा पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाचा द्राव.

५] बाळ नेहमी ज्या आवाजांना प्रतिसाद देते त्या आवाजाना प्रतिसाद देत नाही.

जर तुम्हाला वरीलपैकी सर्व किंवा काही लक्षणे बाळामध्ये दिसून येत असतील तर बाळाला लवकरात लवकर डॉक्टरांकडे घेऊन जा आणि आवश्यक उपचार करवून घ्या.

उपचार 

काही वेळेला कानातील हे संक्रमण थोड्या दिवसानंतर आपोआप बरे होते. पण डॉक्टरांना दाखवल्यास ते प्रतिजैविके(antibiotics)  देतील पण नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार, कानाचे संक्रमणाच्या प्रतिजैविकांचा दररोज वापर केल्यास या संक्रमनाला कारणीभूत असणारे जंतू या प्रतिजैविकांना जुमानत नाहीत. हाच त्रास परत झाल्यानंतर उपचार करणे कठीण होऊन बसते.कधी कधी विषाणूमुळे ही कानात संक्रमण होते आणि यासाठी प्रतिजैविकांचा उपयोग होत नाही.

उपचार

काही वेळेला कानातील हे संक्रमण थोड्या दिवसानंतर आपोआप बरे होते. पण डॉक्टरांना दाखवल्यास ते प्रतिजैविके देतील पण नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार, कानाचे संक्रमणाच्या प्रतिजैविकांचा दररोज वापर केल्यास या संक्रमनाला कारणीभूत असणारे जंतू या प्रतिजैविकांना जुमानत नाहीत. हाच त्रास परत झाल्यानंतर उपचार करणे कठीण होऊन बसते.कधी कधी विषाणूमुळे ही कानात संक्रमण होते आणि यासाठी प्रतिजैविकांचा उपयोग होत नाही. 

हे सर्व वाचून तुम्हाला लक्षात आलेच असेल कि,अगदीच आवश्यकता असेल तरच प्रतिजैविके घेण्याचा सल्ला देतात.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon