Link copied!
Sign in / Sign up
129
Shares

लहान मुलांच्या अंगावरील लव काढण्यासाठी घरगुती उपाय

बाळ झाल्यानंतर ते गोंडस पिल्लू घरात आनंद आणते. जेव्हा बाळ आपण हातात घेतो तेव्हा ते कसे दिसते याची उत्सुकता निश्चितच असते. टीव्हीत दाखवतात त्याप्रमाणे प्रत्येक बाळाची त्वचा काही नितळ, मुलायम नसते. बाळाची त्वचा कोरडी असते आणि त्यावर लव म्हणजे केसही असतात. काहींना कमी तर काहींना जास्त प्रमाणात लव असते. जास्त म्हणजे काही बाळांच्या कपाळावर, कानावर, चेहरा, हात, पाय, पाठ यांच्यावर खूप जास्त लव असते. अगदी केसाळ प्राणी दिसावे इतकी. त्यामुळे जाहिरातीत दाखवल्याप्रमाणे फक्त डोक्यावर केस असणारे बाळ नसून सगळ्या अंगावर लव असणारे बाळ असते. त्यामुळे आईवडिलांना अर्थातच टेन्शन येऊ शकते.

बहुतांश बाळांच्या अंगावर केस असणे हे अगदी नैसर्गिक आहे. मुदतपुर्व प्रसुती झाली असल्याच ही लव असण्याचे प्रमाण अधिक असते. काही महिन्यांतच बाळाच्या अंगावरील ही लव आपोआप निघून जाते. मुख्य म्हणजे बाळाच्या अंगावरील ही दाट लव बाळ गर्भाशयात असताना त्याचे संरक्षक कवच असल्यासारखे काम करते. गर्भजलामुळे बाळाच्या त्वचेला कोणतेही नुकसान होऊ नये म्हणून ही लव संरक्षक ठरते. या केसाबरोबर मुलांच्या त्वचेवर मेणासारखा थर असतो जो त्वचेला उबदार आणि मऊ ठेवण्यास मदत करतो. त्यामुळे बाळाच्या अंगावर जरी जास्त प्रमाणात लव असली तरीही ती बाळाच्या फायद्यासाठीच आहे हे लक्षात असू द्या. बाळाच्या अंगावरील लव काही कालावधी नंतर कमी होतेच मात्र काही घरगुती उपाय त्यासाठी करता येतात.

घरगुती उपाय

काही पारंपरिक पद्धती यासाठी उपयुक्त ठरतात.

१.  बाळाला तीळ, नारळ किंवा ऑलिव्ह पैकी कोणत्याही तेलाने चोळून मालिश करावी. दिवसातून दोनदा तेलमालिश करावी. (उन्हाळ्यात तिळाचे तेल कमी प्रमाणात वापरा)

२.  बाळाच्या अंगाला बेसनपीठ, हळद आणि दुधाची साय एकत्र करून त्याने अंघोळीपुर्वी चोळावे. त्यामुळे लव कमी होण्यास मदत होते

३. गव्हाचे पीठ आणि बेसन पीठ एकत्र करून त्याने बाळाच्या अंगावरील केसाची मुळे मऊ होतात आणि मग ते केस निघून जातात.

४. डाळींचे भरड पीठ, बदाम पावडर हे सर्व दुधात मिसळून लावल्यानेही फायदा होतो.

अर्थात या मसाजमुळे त्वचेवरची लव निघून जाते शिवाय बाळाच्या आरोग्यास फायदा होतो आणि बाळाला प्रेमाचा स्पर्श हवासा असतो.

५ चंदन पावडर, दूध आणि हळद पावडर यांची एकत्रित पेस्ट करावी. ती बाळाच्या त्वचेला लावावी. सुकत आल्यावर हळुवार हाताने काढून टाकावी. बाळाच्या अंघोळीच्या आधी हे करु शकता. बाळाच्या जन्मानंतर काही आठवडे हा उपाय करु शकता.

 

बाळाच्या अंगावर लव असणे ही नैसर्गिक गोष्ट आहे ती काही आठवड्यात निघूनही जाते. सहा महिन्यांपर्यंत जर ही लव गेली नाही किंवा ती अधिक दाट झाली तर मात्र वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे . काही वेळा वैद्यकीय कारणांमुळे बाळाच्या त्वचेवर अतिप्रमाणात लव असू शकते. एखाद्या बाळामध्ये संप्रेरकांच्या असंतुलनाची समस्या म्हणजेच ‘कन्जेन्शिअल अ‍ॅड्रेनल हायपरप्लासियाङ्क असू शकते. अशा वेळी शरीरात कॉर्टिसोल कमी प्रमाणात आणि पुरुष संप्रेरक अल्डोस्टेरॉन अधिक प्रमाणात स्रवते. पुरुष संप्रेरके अधिक स्रवत असल्यास लव जास्त प्रमाणात दिसते.

बाळांच्या अंगावर लव असणे ही सर्वसाधारण आणि नैसर्गिक गोष्ट आहे. पालकांनी त्याचा फारसा ताण घेऊ नये.

हॅलो मॉम्स... आम्ही तुमच्यासाठी एक खुशखबर घेऊन घेऊन आलो आहोत.

Tinystep ने तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी नैसर्गिक घटक असलेले फ्लोर क्लिनर लॉन्च केले आहे. जे तुम्हांला आणि तुमच्या बाळाला जंतूंपासून आणि हानिकारक केमीकल्स पासून दूर ठेवेल. चला तर मग जंतूंना आणि हानिकारक केमिकल्सला नाही म्हणूया... हे फ्लोर क्लिनर वापरून बघा आणि तुमची प्रतिक्रिया आम्हांला कळवा. तुम्ही हे फ्लोर क्लिनर इथे ऑर्डर करू शकता

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon