Link copied!
Sign in / Sign up
4
Shares

लहान मुलांची प्रशंसा कशी आणि कधी करावी

लहान मुलांची प्रशंसा करणे योग्य आहे की नाही आणि कश्याप्रकारे करता यावर अवलंबून असते. तुम्ही मुलाची किती कशा प्रकारे करता याचा विचार केला पाहिजे. कशा प्रकारच्या प्रशंसेनं त्याला उत्तेजन मिळते कि त्यामुळे त्याच्यात गर्विष्ठपणा वाढतो किंवा मूल लाडावले जाते हे जाणून घेणे महत्वाचे असते. कश्याप्रकारे प्रशंसा केल्यामुळे काय परिणाम होतात आणि त्यानुसार कशी प्रशंसा करावी हे आपण जाणून घेणार आहोत.

१. योग्य प्रशांस

मुलाला योग्य पद्धतीनं त्याचे दोष लक्षात आणून दिले तर तो निराश होणार नाही उलट त्याला स्वतःमध्ये सुधारणा करण्याची प्रेरणा मिळेल. सोबतच तुम्ही नियमितपणे योग्य तेव्हा त्याची प्रशंसा केली तर त्याचे सकारात्मक परिणाम होतील.

२. प्रयत्नांची प्रशंसा करवी

एखाद्या गोष्टी मध्ये यश मिळालं नाही तर ते यश मिळवण्यासाठी मुलांनी केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा करावी “ते आपलं ध्येय गाठण्यासाठी मनापासून मेहनत करतात आणि जरी लगेच यश मिळालं नाही, तरी ती शिकण्यातील एक पायरी आहे असं ते त्याला समजवून सांगावे. त्यामुळे त्यांना उत्तजेन मिळेल

 

३. चांगुलपणाची आणि खरेपणाची प्रशंसा करावी.

लहान मुलांनी दाखवलेला चांगुलपणा केलेली मदत आणि त्यांच्या खरेपणाची नक्कीच प्रशंसा करावी त्यामुळे लहान मूल भविष्यात एक चांगली व्यक्ती बनण्यास उत्तजेन मिळेल.

४. अती प्रशंसा किंवा कौतुक करू नये

अनेक पालक आपल्या मुलांची उगाच छोट्या-छोट्या गोष्टीत तसेच चुकीच्या गोष्टीत देखील प्रशंसा करतात. त्यांना असं वाटतं, असं केल्यानं मुलांचा आत्मविश्वास वाढेल. परंतू तुम्ही जर एखाद्या वेळी प्रशंसा केली नाही तर त्यांना ते आवडणार नाही आणि त्यांचा आत्मविश्वास वाढायचा सोडून त्यांचा तुमच्याविषयी राग वाढेल.आणि उलट परिणाम होईल.

५. मुलांच्या चुकांची प्रशंसा करू नका

अनेक पालकांना लहान मुलांच्या चुकीच्या गोष्टीची प्रशंसा करण्याची सवय असते. जे चुकीचे आहे. उदा-मूल एखाद्या घरातील व्यक्तीला मारत आहे आणि ते कितीही विनोदी असेल तरी त्याची त्याबाबतीत प्रशंसा करू नये. एखाद्या प्राण्याची शेपटी खेचत असेल तर त्याला मारत असेल ते कितीही विनोदी असेल तरीही अश्या गोष्टीची प्रशंसा करू नये.

 

६. उद्धटपणा आणि खोटेपणाची प्रशंसा करू नये

लहान मुलांचा खोटेपणा लपवू नये आणि त्याची प्रशंसा तर बिलकूल करू नये अश्याने लहान मुलांना चुकीच्या गोष्टीची सवय लागण्याची शक्यता असते. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon