प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलाचे नाव हे विशेष आणि खास असावे असे वाटत असते. तसेच त्या नावाला काहीतरी अर्थ देखील असावा अशी इच्छा असते. पण आयत्या वेळी सगळीच नावे साधी आणि तीच-तीच वाटायला लागतात किंवा जी नावे आवडत त्याचा माहिती नसतो, म्हणून आम्ही मुलांची काही खास आणि नवीन नावे सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हांला तुमच्या बाळाचे नाव ठरवताना नक्कीच मदत होईल आणि नवीन पर्याय मिळतील.
मुलांची नावे
१. अनिश
या नावाचा अर्थ सतत किंवा निरंतर असा होतो
२. अरव
या नावाचा अर्थ शांत किंवा शांतता असा होतो आणि या नावाची खासियत अशी आहे कि या नावाला ना कान आहे ना मात्र ना वेलांटी तीन अक्षरी नावात ३ अक्षरचं आहेत.
३. आश्लेष
हे एका नक्षत्राचे नाव आहे आणि जर तुम्ही हे नाव पक्के केले आणि मुलगी झाली तर तुम्ही तिचे नाव आश्लेषा असे देखील ठेवू शकता

४. अगस्त्य
या नावाचा अर्थ पर्वत असा देखील होतो तसेच हे एक शिवाचे आणि एका ऋषींचे नाव देखील आहे
५. अग्रज
या नावाचा अर्थ म्हणजे जेष्ठ असा होतो.
६. अर्णव
या नावाचा अर्थ समुद्र असा होतो.
७. अब्राम
या नावाचा अर्थ अब्राहमचे रूप असा होतो
८. कणाद
कणाद नावाचे एक ऋषी होऊन गेले
९. अनुज
अनुज म्हणजे कनिष्ठ किंवा मागून आलेला जर तुम्हांला तुमच्या दुसऱ्या मुलाचे नाव ठेवायचे असेल तर अनुज हे एकदम योग्य नाव आहे.
१०. इंद्रनील
इंद्रनील म्हणजे पाचूचे रत्न
११. निमिष
हे एक विष्णूचे नाव आहे. तसेच क्षण असा पण याचा अर्थ होतो.

१२. मिहीर
सूर्याला मिहीर असे देखील म्हणतात
१३. ईशान
हे शंकरचे एक नाव आहे तसचे याचा अर्थ दिशा असा देखील होतो.
१४. पलाश
पळसाला पलाश असे देखील म्हणतात
१५. चंद्रकेतू
याचा अर्थ चंद्राचा ध्वज असा देखील होतो.

१६. फाल्गुन
एक मराठी महिना
१७. विराट
हे आपल्या सगळ्यांचे आवडते नाव याचा अर्थ खुप मोठे अमर्याद
१८. साहिल
या नावाचा अर्थ किनारा हे कोणत्याही काळात ट्रेडिंग असणारे नाव आहे.

१९.शौनक
हे एका ऋषींचे नाव आहे
२०. शर्विल
हे फार विशेष असे नाव आहे आणि हे कृष्णाचे एक नाव आहे.
