Link copied!
Sign in / Sign up
3
Shares

लहान मुलांची मनातील भीती आणि त्यावर उपाय

 

भीती प्रत्येक व्यक्तीला वाटत असते. फक्त व्यक्तीच्या व्यक्तिमत्वानुसार ती बदलत असते. मग त्या ठिकाणी लहान बाळ तर घाबरनारच ना ! पण लहान बाळाच्या भीतीच्या कल्पना तुम्ही लहानपणीच सुधारायला हव्यात. नाहीतर बालकांची लहानपणीची भीती मोठा झाल्यावरही जात नाही. उदा. बऱ्याचदा बाळ लहान असताना जर तो घराबाहेर किंवा नको त्या ठिकाणी जात असेल, तर लगेच आपण सांगतो, ‘ अरे तिथे जाऊ नको तिथे भूत आहे, चेटकीण आहे. असे सांगून तुमचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न करतात. पण यामुळे त्याच्या डोक्यात लहानपणापासून भुताबद्धल शंका राहून जाते. त्याचबरोबर  त्याच्या खुलणाऱ्या व्यक्तित्वाला तुम्ही भीतीच्या नावाखाली दाबून टाकता. तेव्हा खाली दिलेल्या ज्याही गोष्टीबद्धल बाळाला भय वाटत असेल, तेव्हा त्याच्याबद्धल सांगून तो भयाचा गैरसमज कायमचा दूर करा. आणि कठीण प्रसंगाचा धाडसाने सामना करेन.   

१) अंधार

अंधाराला खूप मुले घाबरून जातात. आणि ही सामान्यपणे वाटणारी भीती आहे. तेव्हा यासाठी आपल्या घरात मुलांना मेणबत्ती किंवा दिवा लावायला सांगायचा. आणि रात्री लाईट लावून ठेवायचा म्हणजे तो आरामशीर बाथरूमला जाऊ जाऊ शकेन. रात्री त्याला/ तिला बाहेर घेऊन जाऊन रात्रीच्या निसर्गाच्या गमती-जमती दाखवायच्या म्हणजे त्यांना अंधाराची भीती न वाटता कुतूहल वाटेल. आणि त्यांच्या कुतूहलाचा प्रश्नांना उत्तरे द्यायलाही मिळेल.

२) पाऊस आणि वादळ  

आपल्या मुलांना पावसात भिजू द्यायचे नाही. असा ठाम निश्चय सोडून त्यांना पाऊसाचा आनंद घेऊ द्या. त्यामुळे ती निसर्गाच्या जवळ जातील. वाटल्यास त्यांच्यासोबत तुम्हीही पाऊसाचा आनंद घ्या. जर तुम्ही समुद्र किनारी असाल तर त्याला त्याविषयी कल्पना देत रहा. की, वादळ काय असते, भरती-आहोटी काय असते.

३) वाईट स्वप्न

बऱ्याच लहान मुलांना रात्री रडण्याची सवय असते. त्याला कारण स्वप्नही होऊ शकते कारण त्यांनी काहीतरी पाहिले आणि झोप मोडली, मग ते रडायला लागतात. काहीवेळा मुले ही स्वप्नांतल्या गोष्टी बोलतात आणि तुम्हाला त्याचे आश्चर्यही वाटते. यासाठी जास्तच समस्या असेल तर डॉक्टरांशी बोलावे. काही मुले रात्री झोपेत बडबड करतात. पण जसजसे वय वाढते तसे ह्या समस्या कमी होतात. वाटल्यास त्यांना तुमच्या जवळ घेऊन झोपवा म्हणजे त्यांना सुरक्षित वाटेल.

४) अनोळखी लोक

ही भीती वाटायला हवीच. आणि हा सुरक्षात्मक उपायही आहे. पण याचा अर्थ असा नाही की, मुलांनी कोणाकडे जायचेच नाही. पण त्याअगोदर मुलांना चांगला स्पर्श व वाईट स्पर्श याविषयी सांगायला हवे. ही गोष्ट खूप महत्वाचे आहे. त्याबद्धल लाज बाळगू नका. त्यांना याविषयी सांगा.

५) आई- वडिलांपासून दूर राहणे

आई - वडील कोणत्यातरी कामासाठी बाहेर गेले व मुलांना घेऊन जाता आले नाही तर मुले ही घाबरतात. तेव्हा ह्यासाठी त्यांना अगोदर कल्पना द्यायची. आजी-आजोबांची सवय लावून द्यायची. म्हणजे त्यांच्याकडे त्यांना सुरक्षित वाटेल. त्यांना एकटे राहण्याची थोडी - थोडी सवय करून द्या.  

६) डॉक्टर

लहान मुलांना डॉक्टरांबद्धल भीती वाटणे साहजिकच आहे. त्यात सगळ्यात जास्त भीती डॉक्टरांनी दिलेल्या सुईची असते. पण ही भीती मोठ्यांनाही असते. बाळाला त्याच्या काळजीसाठीच तुम्ही डॉक्टरांकडे घेऊन जाता हे समजून द्या.

 

 

 

 

 Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon