मूल जन्माला आल्यापासून साधरणतः एक ते दीड वर्ष त्याचा त्याच मल-मूत्र विसर्जनावर ताबा नसतो हा काळ प्रत्येक मुलाचा बाबतीत वेगळा असू शकतो. शी-शूची सवय मुलांना लावावी लागते. मुल साधारण ४,५ महिन्या नंतर २,३ वेळाच शी करतात. साधारणतः १ वर्षांनंतर मुलांना या सवयी लावायला सुरवात करावी असे डॉक्टर सांगतात. परंतु हि सवय कशी लावावी यासाठी काही उपाय पुढे दिले आहेत.
१) शू- शी ची सवय
६ महिन्यानंतर मुलाला थोड्या थोड्या वेळाने लहान मुलांना बाथरूम मध्ये पकडावे आणि शु… आवाज काढून त्यानं सवय लावावावी . मुल ६ महिन्याचे झाल्यावर एका वर्षाचे होई पर्यंत दोन दोन तासाने मुलांना बाथरूम मध्ये धरून शू करायला धरल्यामुळे त्याल शू लागली की बाथरूम मध्ये नेतातया गोष्टीची सवय होईल. एक वर्षांनंतर लहान मुलांना स्वतः बाथरूम मध्ये जायला सांगा. त्याचा बरोबर तुम जा आणि त्याला शू करायला लावा. तसेच शी लागली की बहुतेक करून मुलांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात. मुल शी करत आहे लक्षात आल्यावर त्याला लहान मुलाच्या पॉट वर किंवा बाथरूम मध्ये घेऊन जा.
2) केलेल्या कृतीचे कौतुक
जरा मुलांना तुम्ही सांगितल्या प्रमाणे बाथरूम मध्ये जाऊन शू /शी केली तर त्याचे/तिचे कौतुक करा. किंवा त्यांना शू- शी लागल्याचे त्यांनी सांगितले तर त्यांचे कौतुक करा.
3) टप्या-टप्याने जा.
लहान मुलांना शू-शीची सवय लावताना त्याला एकाच दिवसात हि सवय लागेल अशी अपेक्षा ठेवू नका. टप्प्या-टप्प्याने त्याला या गोष्टी शिकवा जर हट्टी पण करत असेल तर त्याला नीट समजवून सांगा, त्याच्यावर ओरडू नका.प्रत्येक मुल एखादी गोष्ट शिकण्यासाठी वेगवेगळा वेळ लागू शकतो.
४) संयमाने वागा
आधी सांगितल्याप्रमाणे लहान मुलांना काही गोष्टी शिकण्यास वेळ लागतो. त्यामुळे कंटाळून किंवा ना चिडता संयमाने वागा . तसेच सतत त्याच गोष्टीसाठी त्याच्या मगर लागू नका. अश्याने ते कंटाळतील आणि त्याचा मनात या गोष्टीचा तिरस्कार किंवा भीती निर्माण होईल व शु- शी लागल्यावर ते तुम्हाला सांगणार नाहीत
५) वेळापत्रक तयार करा
लहान मुलाच्या शू ला आणि शीचे वेळापत्रक करा आणि त्या- त्या वेळेला त्याला शू आणि शी करायाला लावा. सुरवातीला थोडे कुर कुर करतील पण नंतर त्यानं सवय होईल. म्हणजे सकाळी उठल्या-उठली शू ला घेऊन जा. थोड्या वेळाने खाऊन किंवा दूध पिऊन झाल्यावर शी ला घेउन जा. त्यावेळी त्याने /तीने त्यावेळी शी केली नाहीतरी चालेल आहे पण त्यावेळी त्याला शी ला घेऊन जा. अश्याप्रकारे वेळापत्रक ठरवल्याने मुलाला मया गोष्टीची सवय होते. आणि त्यावेळी शी रात्रीच्या वेळी बाळाला झोपवावयाच्या आधी दोन वेळा तरी शू ला नेऊन आणा.
शी- शू ची सवय लावणे आवश्यक असते परंतु त्या साठी जोर- जबरदस्तीचा वापर करू नका. मुलाच्या कला-कलाने घ्या.
