Link copied!
Sign in / Sign up
47
Shares

टीव्ही किंवा मोबाईल शिवाय मूल जेवत नसेल तर हे करा.

 मुले झाल्यानंतर त्यांच्या वयाच्या टप्प्यांनुसार ती मनस्वी होतात. त्यांचा खेळ वाढतो, मस्ती वाढते. मुले मस्ती करायला लागली एका जागी थांबायचे नाव घेत नाहीत आणि मग जेवतानाही ती एका जागी बसत नाहीत. अशा वेळी पालक मुलांनी एका जागी बसून रहावे म्हणून टीव्ही किंवा कॉम्प्युटर वर कार्टून लावून खायला देतात. जेवायला देतात.

पालकांचा उद्देश एकच असतो की एका जागी बसून मुलांनी खावे. त्यांचे पोषण व्हावे. पण हीच धारणा चुकीची आहे. मुलांनी जेवताना एकाग्र चित्ताने जेवले पाहिजे. पण टीव्ही मुळे ही एकाग्रता ढळते. बऱ्याचदा पालक एखादा पदार्थ अमूक इतक्या प्रमाणात खाल्लाच पाहिजे म्हणून मुलांना टीव्हीसमोर बसवतात.

काही मुले जेवणाबाबत उदासीन असतात, त्यांना जेवण्यात रस नसतो म्हणून त्यांना टीव्ही लावून देण्याचा फार काही फायदा होत नाही.

जेवताना मुलांना टीव्ही लावलेला असला की त्यांना स्वतःच्या मेंदून दिलेल्या सूचना कळत नाहीत. त्यामुळे आपले पोट भरले की नाही हे देखील कळत नाही.

एकदा मुलांना ही सवय लागली की ते कुटुंबासमवेत जेवण्याचा आनंद लुटू शकत नाहीत. तसेच जेवताना टीव्ही पाहण्याची सवय असलेली मुलांना जेवणापेक्षा सटर फटर किंवा जंक फूड खाण्यात अधिक रस असतो.

शारिरीक दुष्परिणामांचा विचार करता टीव्ही समोर बसून जेवल्याने जास्त खाल्ल्याने मुलांमध्ये स्थूलता वाढीस लागते.

कुटुंबाबरोबरचा संवाद खुंटत जातो. त्यामुळे दिवसभरात काय केले हे देखील पालकांना सांगितले जात नाही.

मुलांची टीव्हीसमोर बसून जेवण्याची सवय मोडण्यासाठी काय करावे हा यक्षप्रश्न नक्कीच पालकांना भेडसावतो.

एकत्रित कौटुंबिक भोजन-

मुलांनी किती वेळ टीव्ही पहावा त्याची वेळ निश्चित करावी. सर्व कुटुंबानी त्या वेळेत एकत्र टीव्ही पाहणेही योग्य आहे. जेवणाच्या वेळी टीव्ही बंद करुन ठेवावा. तसेच झोपण्यापुर्वी एक तास टीव्ही बंदच ठेवावा.

कार्यक्रमाची निवड-

टीव्हीवरील कोणते कार्यक्रम पहायचे याची निवड विचार पूर्वक केली पाहिजे. जेवणाच्या वेळी टीव्ही बंद असला तरीही मुलांनी कोणते कार्टून, चित्रपट, कार्यक्रम पाहायला हवे याचा विचार जरुर करावा. कारण मुले जे पाहतात ते मनावर ठसलेले असते. त्यामुळे मुलांसाठी योग्य असेच कार्यक्रम निवडावेत.

जेवणाची वेळ-

मुलांच्या न्याहारीची, संध्याकाळच्या न्याहाराची वेळ योग्य असावी. अन्यथा त्या वेळा उशीरा असतील तर जेवणाची वेळ लांबत जाते. त्यामुळे मुलांना कडकडून भूक लागत नाही.

आवडीचे पदार्थ-

मुले जेव्हा स्वतःच्या हाताने खाऊ लागतात तेव्हा आवडीचे त्यांना माहित असणारे पदार्थ न्याहारीसाठी द्यावेत जेणेकरून ते पटापट खातील. जेवणाच्या वेळीही भूक लागेल.

अपेक्षा-

मुले चळवळी असतात त्यामुळे त्यांनी १५-२० मिनिटे एकाच जागी स्थिर बसावे ही अपेक्षाच चुकीची आहे. त्यामुळे सुरुवातीला एका जागी पाच मिनिटे बसण्यास सांगावे. मग हळूहळू वेळ वाढवावा.

मुलांबरोबर जेवा-

काही वेळा मुलांना नावडते पदार्थ आपण वाढत नाही कारण मुले ते न खाता टाकून देतात. अन्न वाया जाणे पटत नाही. पण पालकच मुलांबरोबर बसून जेवले तर मुलांना सर्व पदार्थ खायचे असतात हे दिसते. पानात वाढलेले पदार्थ टाकून न देता ते संपवायचे असतात याचे वळण पालकांच्या सवयी पाहून लागू शकते.

प्रयोगशील रहा-

मुलांनी व्यवस्थित जेवण केल्यास त्यांना आवडीचे काही पदार्थ अधूनमधून द्यावेत. दुधाबरोबर कधीतरी १-२ बिस्कीटे द्यावीत. कधीतरी वेफर्स, फ्रायम्स द्यावेत.

मुलांना सामील करुन घ्या-

सुट्टीच्या दिवशी स्वयंपाकात किंवा न्याहारीला काय बनवायचे हे ठरवताना मुलांनाही विचारा. तसेच भाजी, किराणासामान भरतानाही मुलांना बरोबर न्या. त्यामुळे भाज्या, फळे, किराणा सामान यांची ओळख होते. त्याचबरोबर कोणत्या पदार्थातून कसे पोषण मिळते हे देखील त्यांना समजेल असे सांगावे.

मुलांशी सतत संवाद साधून त्यांना गोष्टी, गाणी ऐकवावीत. पालकांनीही मुलांसमोर टीव्ही पाहात जेऊ नये कारण मुलांना पालक आदर्श वाटत असतात. अनेकदा मुलांनी त्रास देऊ नये म्हणून पालकच लहानपणी टीव्ही लावून देतात. मग त्याची सवय जडते मुलांना. लहानपणीची ही सवय मोठेपणी अधिक कठीण होते कारण मुले जुमानत नाहीत. मुलांना खेळणे, वाचन करणे याच्या सवयी लावाव्यात. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon