Link copied!
Sign in / Sign up
154
Shares

लहान मुलांमधील तणाव : कारणे व उपाय

 आपल्या लहान मुलांची सततची चिडचिड  मुलांची अस्वस्थता आपल्याला बघवत नाही.आणि लहान मुलांना आपल्याला काय होत आहे हे सांगता देखील येत नाही. ती फक्त  रडून आणि चिडून आपला त्रास व्यक्त करतात. त्यामुळे बरेचदा बाळाचा]स्वभावच चिडचिडा आहे असे समजून त्याचा त्रास कडे दुर्लक्ष केले जाते. आणि त्यावर काही उपाय करण्यात येत नाही. तर आपण लहान मुलांमध्ये असा ताण - तणाव कश्यामुळे निर्माण होऊ शकतो यांची करणे जाणून घेऊया.

नुकत्याच चालू लागलेल्या मुलाच्याबाबतीत असा ताण-तणाव कोणत्या कारणामुळे निर्माण होऊ शकतो याची साधारणता करणे पुढील प्रमाणे

१) प्रेमची कमतरता आणि दुर्लक्ष

लहान मुलांना त्यांचा प्रिय व्यक्तींने म्हणजे आई- वडील सतत आसपास असणारी माणसे त्याच्याकडे लक्ष दयावे. त्यांचे लाड करावे. त्यांनी त्याचा सतत आसपास असावे असे वाटत असते. आसपास असले कि त्याचा कडे लक्ष द्यावे. पण कधी कधी काही कारणामुळे लहान मुलांकडे दुर्लक्ष होते. त्यावेळी मुलं  चीड-चीड करू लागतात .लक्ष वेधून घेण्यासाठी रडू लागतात .

२) लहान मुलांच्या आसपासच्या वातावरणात असणारी नकारात्मकता

लहान मुलांवर ताण -तणाव  असण्याचे आणखी एका कर्ण म्हणे त्याचा आसपास सारखी होणारी भांडण .त्याचा प्रिया व्यक्ती मध्ये होणारी भांडणं.रडा-रड, मार-झोड ,आरडा-ओरड अश्या नकारात्मक वातावरणामुळे लहान मूळ घाबरून जाते आणि रडायला लागते त्याचा मनावर एक प्रकारचा ताण येतो आणि त्याचा त्याला त्रास होतो.   

३) शारीरिक अस्वस्थता आणि त्रास

हे मुलाच्या रडण्यामागे आणि त्याच्यावर असलेल्या तणावामागे हे कारण प्रामुख्याने असु  शकते  लहान मुलाला अस्वस्थ वाटत असेल ,कुठे दुखत असेल, जसं  पोट  दुखणे ,सर्दी मुळे  नाक बंद होणे. भूक लागणे. थंडी मुळे  झोप न येणे यामुळे देखील मुल  चीड-चिड करते आणि सारखे रडत असते. त्यामुळे मुल सारखे रडत असल्यास या कारणांची खात्री करून घ्या.  

४) प्रिय व्यक्तीची आठवण येणे

बराच वेळ आपली प्रिय व्यक्ती दिसली नाही की  बाळ  अस्वस्थ होऊन रडू लागते. विशेषतः आई बराच वेळ मुलाला भेटली नाही कि मुल  अस्वस्थ होऊन रडू लागतं. अनोळकी चेहरे आसपास दिसल्यावर ते घाबरून आईच्या किंवा ओळखीच्या माणसाच्या आठवणीने रडू लागतं.

६) भुक

लहान मुलाला वेळच्यावेळी खायला दिलं  नाही तर ते भुकेमुळे देखील रडू लागतं  आणि  चिडचिड करतात

लहान मुलांवरील तणावाची लक्षणे

पालकांनी आपल्या मुलाच्या रडण्याबाबत त्याचावर असलेल्या तणावाबाबत जागरूक असणे गरजेचे असते. पालकांनी आपलं लहान मुल का चिचिड करत आहे का रदात आहे त्याचावर काही तणाव तर नाही ना? याचा कडे लक्ष देणे गरजेचे असते . लहान मुल  तणावाखाली आहे हे साधरणतः पुढील लक्षणांनी आपल्याला ओळखता येईल१ मुल  सारखं रडत असेल

१)झोपेमधुन  अचानक दचकून जागे होणे /झोपेचे बदलले वेळापत्रक

२) शी च्या वेळा ,शी मधील फरक

३) अंग आणि पोटदुखी  अंगदुखीत हात पाय जोर जोरात हलवणे, पोट  दुखत असेल तर सारखे रडणे

४) खाण्यास नकार देणे, रडणे

५) नेहमीपेक्षा वेगळ्या हालचाली

६) सतत अंगठा चोखणे ,आई जरा दिसली नाही की  रडते

 ७)अनोळखी चेहरा समोर आल्यास रडायला सुरवात करणे

लहान मुलाचा ताण  कसा हाताळावा

ज्यापद्धतीने लहान मुले तणावाची प्रतिक्रिया खूप रडून रडून तीव्रतेने देत असली तरी कधी कधी त्याचे कारण काही गंभीर नसते. परंतु त्याच्याकडे दुर्लक्ष करणे देखील योग्य ठरणार नाही. जर बाळाच्या रडण्यामागचं त्याचा वर असणाऱ्या तणावामागचं कारण जर लवकर कळले तर त्याच्यावर लवकर काही मार्ग काढता येणे सोपे जाईल. लहान मुलांनाच हा ताण  कश्याप्रकारे हाताळावा याच्या काही टिप्स पुढे दिल्या आहेत.

१) लहान मुलांच्या वागण्यातील हालचालीतील बदल जाणवल्यास बालरोगतज्ज्ञास बाळाला  बाळाला घेऊन जावे. आणि त्याचा सल्ल्यानुसार उपाय करावे  

२) पालक म्हणून लहान मुलाबरोबर जास्तीत-जास्त वेळ घालवण्यासच प्रयत्न करावा. लहान   मुलाला त्याला अनोळखी असलेल्या व्यक्ती बरोबर जास्त वेळ ठेवू नये.

३) लहान मुलांना वेळच्यावेळी खायला द्यावे(भरवावे).भूक नसताना भरवू नये आणि जास्त वेळ उपाशी ठेवू नये तसेच त्याच्या खाण्याच्या वेळा मध्ये सतत बदल करू नये

४) लहान मुलांच्या आसपासचे वातावरण आनंदी आणि उत्साही ठेवण्याचा प्रयत्न करावा.  लहान मुलांच्या समोर भांडणे करू नये. घरातील वातावरण  सकारात्मक आणि आनंदी  ठेवावे.

५) तुमच्या बाळाला हवं तसं निरागसपणे  वागू द्यावे. लहान मुलांमध्ये असणारा निरगसपणा जपावा.   

६) दोन्ही पालक जर नोकरी करणारे असतील तर त्यांनी दिवसातून  एकदा तरी मुलाला   फिरायला घेऊन जावे .

७.आपल्या बाळाला प्रोत्साहित करा आणि त्याची प्रशंसा करा.Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon