Link copied!
Sign in / Sign up
46
Shares

या गोष्टी करा आणि मुलांची उंची वाढावा.

 

https://dynamic-cdn.tinystep.in/image/600x600/admin-panel-image-9dba1586-1f39-47a5-8106-7e3cf990269e-1503565222804.jpeg

आपलं मुलाचे वजन उंची त्याच्या वयानुसार योग्य प्रमाणात वाढावी,असे प्रत्येक पालकाला वाटत असते. आपल्या मुलांचा शरिराची वाढ योग्य प्रमाणात व्हावी अशी इच्छा प्रत्येक पालकाची असते. अश्यावेळी मुलाच्या जन्माआधीपासून या गोष्टीची काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच काही पदार्थ आणि आणि काही गोष्टी ज्या लहान मुलांची उंची वाढवण्यास मदत करतात. त्या कोणत्या ते आपण पाहणार आहोत.

मुलाच्या जन्माआधीपासून घ्यायची काळजी

आपल्या मुलाची उंची योग्य असावी अशी इच्छा असेल तर याची काळजी पालकांनी मुलाचा जन्म आणि गर्भधारणा होण्याआधीपासून पालकांनी घेतली पाहिजे. या गोष्टी काही अंशी अनुवांशिकतेवर अवलंबुन असले तरी स्त्री-पुरुषांनी धातुपोषणाकडे व्यवस्थित लक्ष देणे आवश्यक आहे. असे असेल तरच बाळाचे वजन व उंची व्यवस्थित वाढते. 

शरीर सात धातूंपासून बनलेले आहे, हे आपण जाणतो. यातील अस्थी धातूवर म्हणजेच हाडांवर उंची अवलंबून असते व ती शोभून दिसण्यासाठी मांस-मेद धातूंना व्यवस्थित पोषण मिळण्याकडेही लक्ष ठेवावे लागते. गर्भधारणेच्या काळात गर्भवतीने लोह, हिमोग्लोबिन, कॅल्शियम योग्य मात्रेमध्ये व नैसर्गिक स्वरूपात सेवन करणेही उंचीच्या दृष्टीने महत्त्वाचे होय. रासायनिक द्रव्यांपासून बनविलेली औषधे आतमध्ये हाडांपर्यंत तसेच हाडांचे पोषण करणाऱ्या मज्जेपर्यंत पोचू शकतातच असे नाही, त्यापेक्षा नैसर्गिक अन्न व औषधातून ही तत्त्वे शरीरात सहजपणे स्वीकारली जातात व त्यामुळे उंची नीट वाढण्यास, एकंदरच सर्व शरीराचे पोषण होण्यास मदत मिळते.

या पदार्थच्या सेवनाने लहान मुलांची उंची वाढण्यास मदत होते
१. दूध

दूध हे कॅल्शियम आणि प्रथिने यांनी समृध्द असते. त्याच्या सेवनाने हाडे मजबूत होतात. दूध उंची वाढण्यास मदत करण्यासाठी आवश्यक असलेले कॅल्शियम पुरवते. तसेच,ते आणि त्याद्वारे शरीर तंदुरुस्त ठेवते. पांढऱ्या रक्तपेशींचे उत्पादन वाढवून, ते बालकांच्या रोगप्रतिकारक प्रणालीला सुधारण्यात मदत करते.त्यामुळे दूध आणि दुधाच्या पदार्थ जर लहान मुलांच्या आहारात समावेश केल्यास याच मुलांची उंची वाढण्यास उपयोग होतो.

२. सुका मेवा

उंची वाढवण्यासाठी सुकामेवा मधील अनेक पोषक द्रव्ये उंची वाढीच्या हार्मोनला उत्तेजन देऊन उंचीत वाढ होण्यास मदत. परंतु, अति सुक्यामेवाच्या सेवनाने कदाचित पोटाची समस्या निर्माण होऊ शकते.

३. फळे आणि भाज्या

एक गोष्ट जी जवळजवळ प्रत्येकजण बद्दल माहिती आहे, फळे आणि भाज्या या अन्नपदार्थांमध्ये जास्तीत जास्त पोषक घटक असतात आणि ते मुलांच्या संपूर्ण वाढीसाठी मदत करतात. परंतु मुले ते खाण्याचा कंटाळा करतात. त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या प्रकारे या गोष्टी त्यांच्या पोटात कश्या जातील हे पालकांनी बघणे गरजेचं आहे. मुलांना भाज्यांचे सूप, फळाचे रस हे नियमित द्यावे. हे देण्या आधी त्यानं कोणती एलर्जी नाही याची काळजी घ्या.

४.अंडी

अंड्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते. तसेच आपल्या शरीरातील मेंदूच्या विकासासाठी महत्वाचे असणारे व्हिटॅमिन बी 12 देखील अंड्याच्या आढळते. अंडी मुलाच्या संपूर्ण वाढीची उपयुक्त असतात. तसेच मुलांची उंची वाढण्यास मदत करतात. तुमच्या मुलाला त्याच्या तब्बेतीनुसार अंडे कश्या स्वरूपात  व कधी द्यावे हे डॉक्टरांकडून जाणून घ्यावे. 

५. व्यायाम आणि योगा

लहानपणा पासून मुलांना व्यायाम आणि योग करण्याची सवय लावल्याने मुले सुदृढ होतात आणि तसेच त्यांची उंची वाढण्यास मदत होत पुढील काही व्यायाम आणि योगा प्रकार लहान मुलांची उंची वाढवण्यास मदत करतात.

 

१. ताडासन 

पाठीचे मणके ताणून आणि सरळ करून तुमची उंची वाढवण्यासाठी ताडासन हे एक आदर्श आसन आहे.

१. भुजंगासन 

भुजंगासनामुळे दोन्ही खांदे,छाती आणि उदराचे स्नायू ताणले जातात.यामुळे आपल सुधारते आणि त्यामुळे उंची वाढण्यात मदत होते.

३. सूर्यनमस्कार 

 

आमचा लेख वाचल्याबद्दल धन्यवाद ! आमच्या वाचकांसाठी आम्ही एक सवलत ऑफर देत आहोत त्यासाठी इथे क्लिक करा.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

We have a great opportunity for you. You can EARN up to Rs 10,000/- every month right in the comfort of your own HOME. Sounds interesting? Fill in this form and we will call you.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon