Link copied!
Sign in / Sign up
13
Shares

कधी-कधी मुलांची होणारी चीड-चीड चांगली असण्याची काही कारणे

          लहान मुले देवाघरची फुले असतात, ती गोंडस, लाघवी आणि निष्पाप असतात असे आपण म्हणतो आणि ते खरेही असते. पण काही वेळा मात्र ती आख्ख्या घरासाठी तापदायक ठरतात. मुलांना वाढवणे हे काही सोपे काम खचितच नव्हे आणि जेव्हा ते काही चुकीच्या गोष्टींची मागणी करत असतील तर त्यांना नाही म्हणणे नक्कीच सोपे नसते. परिणाम असा होतो की ते जोरजोरात रडतात किंवा मारत सुटतात. त्यामुळे काही क्षण अगदी चीडचीड होणे साहाजिक असते मात्र विश्वास ठेवा की दीर्घकालीन परिस्थितीमध्ये ही गोष्ट चांगली ठरते. मुलांना एखाद्या गोष्टीसाठी नाही म्हटले की आपल्या मुलामुळे काही त्रास होतो किंवा ती काहीतरी त्रास देतात किंवा रडून गोंधळ घालतात आणि ही चांगली गोष्ट असल्याचे कसे कोणी सांगू शकते असा विचार नक्कीच तुमच्या मनात आला असेल. पण मन थोडे हलके करा. मुलांची चीडचीड किंवा त्यांना राग येणे ही गोष्ट कशी चांगली आहे हे सांगणारी काही कारणे समजून घेऊया.

१. जवळीक वाढू शकते. 

चीड-चिडी नंतर मुलांचा राग कमी झाल्यावर  त्यांच्याशी प्रेमाने बोला आणि त्यांना जवळ घ्या. विश्वास ठेवा अगर ठेवू नका पण प्रेमाने एकदा मारलेली मिठी हजारो शब्द सांगून जाईल. त्यामुळे त्यांना रागवले असताना समजून घेतले तर त्याची तुमच्याशी असलेली जवळीक वाढते. 

 

२. झोप नीट लागते. 

यावर विश्वास ठेवणे अवघड आहे पण मुलांचा  भावना मोकळेपणाने व्यक्त करू देणे खूप महत्त्वाचे आहे. मुले त्यांच्या भावना मोकळेपणाने व्यक्त करु शकली नाही तर ती सारखे त्याच गोष्टींचा विचार करत राहातात. त्यामुळे दबलेल्या भावना अधिकाधिक वाढत जातात. त्यामुळे त्यांना सर्व भावना मोकळेपणाने व्यक्त करु द्या आणि त्यांच्या भावनेत हस्तक्षेप क़रण्याचा किंवा त्यांना ओरडण्याचा प्रयत्न करु नका. त्यांचा भावना मोकळ्या झाल्यावर त्यांना झोप लागते. 

३. भावनाना मुक्तपणे व्यक्त होण्यास मार्ग मिळतो 

अति चीड-चीड हिंसकपणा हा  मुलांचा आपल्या भावनांशी चाललेला संघर्ष आहे हे दर्शवणारी ही सर्वसाधारण लक्षणे आहेत. खूप चीडचीड होणे किंवा आक्रस्ताळेपणा करणे यामुळे मुलांच्या मनात दडलेल्या भावना मुक्त होण्यास मदत होते आणि स्वतःचा मार्ग मिळवण्यास मदत होते.

 

४. तुमच्या नकाराचा केलेला स्वीकार   

बहुतांश वेळा मुलांनी तुम्ही एखाद्या गोष्टीला दिलेला नकार पचवलेला असतो आणि त्यांना नाही म्हटल्यावर काय वाटते आहे हे दाखवण्याच्या भावना म्हणजे ही चीडचीड किंवा आक्रस्ताळेपणा असतो. त्यामुळे  तुम्ही तुमच्या नकारावर ठाम राहू शकता ते त्यांच्या पद्धतीने त्या नकाराला स्वीकारून विरोध करतात आणि भावना किंवा आधी मनात न व्यक्त होतात. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon