Link copied!
Sign in / Sign up
5
Shares

लहान मुलांसोबत प्रवास करायला जाणार तेव्हा.....

रोड ट्रिपला जाताना नेहमीच खूप मजा येते. पण जेव्हा तुम्ही आपल्या लहान बाळाला घेऊन प्रवास करता तेव्हा काही गोष्टींची काळजी अवश्य घ्यावी. बऱ्याचदा तणावाची परिस्थिती येऊ शकते.आज आम्ही या ब्लॉगमध्ये तुम्हाला या तणावाच्या परिस्थितीवर कशी मात करायची, मनोरंजनाच्या कल्पना, प्रात्यक्षिक सल्ला देऊन तुमच्या ट्रिप जास्तीत जास्त संस्मरणीय कशा होतील यासाठी टिप्स देत आहोत :

१. पॅकिंग 

एका लहान बॅगेत मुलाचे नेहमीचे कपडे, जास्तीचा कपड्यांचा जोड (जर मुलाला उल्टी किंवा शौचास अधिक झाल्याने)कपडे खराब होतात. दिवस आणि रात्र दोन्ही वेळेला लागणारी डायपर्स, नॅपकिन, लाळेरं अशा सर्व गोष्टी यांत भरा. ही सुटकेस उघडायला सुद्धा एकदम सोपी असते.

जर तुम्ही एकददिवस राहणार असाल तर लहान मुलांची उशी,ब्लँकेट बरोबर ठेवावे. मुलांना त्यांच्या सवयीच्या पांघरुणात नीट झोप लागते. यामुळे तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये किंवा नातेवाईकांच्या घरी सहज नेऊ शकता आणि राहू शकता.

मोटारीतून प्रवास करताना मूल खाते,पिते,थुंकू शकते, ओकू शकते जर त्यांना सतत खाण्याची सवय असेल तर. यासाठी नेहमी मुलांच्या बॅगेत एक पेपर नॅपकिनचे पॅक, वाइप्स सीट समोर ठेवावे. एखादी छोटी कचर्‍याची पिशवी सुद्धा आसनासमोर ठेवावी.

२. प्रवासात 

 मुलांना नेहमी थकवा येतो तेव्हा त्यांना काही तरी खाण्याची इच्छा होते. प्रवासात नेहमी बरोबर खाद्यपदार्थ ठेवा. जेव्हा मुले अस्वस्थ होतात तेव्हा त्यांचे मन खाण्यामध्ये गुंतवता येते.भूकेमुळे होणारी चंचलता कमी होईल. पण एक लक्षात ठेवा हे सर्व खाद्यपदार्थ नेहमी आरोग्यदायीच असले पाहिजेत.

मोटारीमधील म्युझिक प्लेअरमध्ये मुलांच्या आवडीची गाणी देखील लोड करा. लहान मुलांच्या सीडी,डीव्हीडी बरोबर ठेवल्यास त्यांच्यासाठी ही खूप मोठी गोष्ट असते.त्यांच्या आवडीची गाणी हेडफोनमध्ये लावून दिल्यास ते प्रवास एन्जॉय करू शकतात. हे हेडफोन लावताना ते त्यांच्या कानासाठी सुरक्षित असल्याची खात्री करून घ्या. जास्तीचे हेडफोन बरोबर ठेवा.

लहान मुलांसोबत मागच्या आसनावर बसून काही मजेदार खेळ खेळा. चेहर्‍यावरील हावभावांनी त्याला हसविण्याचा प्रयत्न करा. असे खेळ दिर्घकाळ मुलांना कंटाळवाण्या प्रवासातून दुसरीकडे लक्ष वेधतील. मूल रडू नये यासाठी खेळणे, गाणे, त्यांची नाराजी दूर करण्याचे हर एक प्रयत्न आपण प्रवासात करू शकतो. आता फक्त भूक लागल्याने, डायपर पूर्ण भरल्याने त्याला ओलावा लागत असेल तरच तो थोडा जास्त रडेल याची काळजी मात्र आई-वडीलांनी घ्यावी. कधी कधी प्रचंड झोप आल्यामुळे सुद्धा ते रडू शकतात.

३. दोन अंतरांमध्ये थोडावेळ थांबा 

लहान मुलांसोबत प्रवासाला निघताना थोडा जास्तीचा वेळ गृहीत धरून निघावे. याचे कारण असे की, मुलाला स्तनपान,डायपर बदलणे, लहान मुलाच्या आसनावरून बाजूला काढून पाय मोकळे करणे. या सर्व गोष्टी तुम्ही टाळू शकत नाही त्यामुळे त्या गृहीत धरूनच तुम्हाला प्रवासाचे नियोजन केल्यास तणाव कमी होतो.

थोडे थांबून मुलाला मोटारीतून बाहेर काढा, फिरवा, ते जर चालत असेला तर त्याला मोकळेपणाने फिरू द्यावे.यामुळे कदाचित तुम्ही सबंधित ठिकाणी उशीरा पोहोचाल पण तो जितका जास्त वेळ तुम्ही मोटारी बाहेर व्यतित करेल तितका जास्त सहनशीलपणे तो मोटारीत बसू शकेल.

तुमच्या जेवणाच्या वेळी किंवा नाश्त्याच्या वेळी अर्धा तास थांबावे लागले तर लक्षात असू द्या की, तुमच्या बाळाला शु-शी  नेऊन आणावे.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon