Link copied!
Sign in / Sign up
71
Shares

हे आहेत लहान बाळाच्या झोपेबाबत गैरसमज

नवीन पालक म्हणून बाळाचे झोपेचे भुकेचे पॅटर्न समजणे सुरवातीला अवघड जात असते. नवजात बाळ हे सुरवातीचे काही आठवडे १६ ते १८ तास झोपत असतं. हे कोणते १६ ते १८ तास असतील हे सांगणं कठीण असतं त्यामुळे हे दिवस पालकांसाठी थोडे कठीण असतात. त्यातच बाळाच्या झोपे विषयी काही गैरसमज पालकांना आणखी गोंधळात टाकतात. हे गैरसमज कोणते ते आपण पाहणार आहोत

१) जास्त खाणे म्हणजे जास्त झोप

तुम्हांला कोणीतरी सल्ला देईल की बाळ रात्री शांत झोपावे म्हणून त्याला रात्री झोपेच्या आधी स्तनपान ऐवजी भात किंवा काही पेज वैग्रे भरवावी. त्यामुळे बाळाचे पोट गच्च भरते. आणि त्यामुळे बाळाला रात्री चांगली झोप येईल. खरंच ही गोष्ट खरी झाली असती. पण याला कोणताही वैज्ञनिक पुरावा नाही. तसेच तज्ज्ञांचे मत असे आहे कि बाळाला ६ महिने पूर्ण होईपर्यंत कोणत्याही प्रकारचे वरचे अन्न देऊ नये. फक्त स्तनपान द्यावे

२) बाळाने सकाळी उशीर उठावे असे वाटते तर त्याला रात्री उशिरा झोपावा

बाळाने खूप सकाळी किंवा मध्यरात्री उठू नये म्हणून लहान मुलांना रात्री बराच वेळ जागे ठेवण्यांत येते आणि उशिरा झोपवले जाते बाळ झोपेला आले असून त्याला जबरदस्ती जागे ठेवण्यात येते. अश्यावेळी बऱ्याचदा मुल आपल्या नेहमीच्याच वेळेला उठते. त्यामुळे त्याची झोप अर्धवट होते आणि ते रडू लागते. आणि अस्वस्थ होते. तसेच काही वेळा या प्रकाराने दमून जाऊन आजारी देखील पडते. प्रत्येक मुलाचे झोपेचे एक वेळ असते काही मुले सकाळी लवकर उठणारी असतात काही मुले उशिरा उठणारी असतात . त्यांचा झोपेचा पॅटर्न नीट समजून घ्यावा आणि त्यानुसार त्याला झोपवावे.

३) बाळाला झोपवण्यासाठी स्तनपान देणे आणि झोका देणे वाईट सवयी आहेत

लहान बाळाला झोपण्यासाठी एक सोप्प उपाय म्हणजे बाळाला पाजणे. बाळ दूध स्तनपान करत असताना शारीरिक दृष्ट्या शांत होते आणि त्याला झोप यायला मदत होते. त्यामुळे बाळाला झोपण्यासाठी स्तनपान देणे हि वाईट सवय नाही. तसेच बाळाला कडेवर घेऊन झुलवणे किंवा मांडीवर घेऊन मांडी हलवून झोपवणे किंवा पाळण्यात घालून हलकेच झोका देणे यामुळे बळावर काही विपरीत परिणाम होत नाही उलट बाळाला मांडीवर घेऊन तसे हातात घेऊन झुलवल्यामुळे बाळाला शांत झोप लागते.

४) दिवसा कमी वेळ झोपल्यामुळे बाळ रात्री जास्त वेळ झोपते

बाळाला दिवस कमी वेळ झोपू दिल्यावर ते रात्री जास्त वेळ झोपते. काही वेळा हि गोष्ट खरी ठरते परंतु बाळ रात्री जास्त वेळ झोपण्याचे कारण बाळ दिवसभर पुरेशी झोप न मिळाल्यामुळे दमून रात्री जास्त वेळ झोपते. बाळाच्या भविष्यातील आरोग्यास घातक आहे. सुरवातीच्या काळात बाळाला दिवसभरतील बराच वेळ झोप मिळणे आवश्यक असते.आणि त्यामुळे बाळाची वाढ नीट होते. परंतु या काळात दिवसभर पुरेशी झोप न मिळाल्यास बाळच्या वाढीमध्ये समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे बाळाला झोप यायला लागल्यावर झोपू द्या बाळाकडे लक्ष देण्याची जबाबदारी वाटून घ्या त्यामुळे तुम्हांला देखील आराम मिळेल

५) शांतता........बाळ झोपले आहे

 मोठ्यांना झोपायला शांतात लागते तशीच बाळाला देखील लागते असे नाही बाळ पोटात असताना आई ज्या आवाजात जास्त वावरलेली असते ते आवाज बाळाच्या ओळखीचे झालेले असतात. ते आवाज जर बाळ झोपलेले असतात जर आसपास चालू असले तर बाळ दचकत नाही किंवा उठत नाही त्यामुळे त्यामुळे बाळ झोपले असताना चुकून काही आवाज झाला तर घाबरण्याचे कारण नाही.

पण म्हणून बाळाला सतत आवाज आणि गोंधळ असलेल्या ठिकाणी झोपवू नये तसेच ते झोपलेले असताना आसपास शांतात ठेवण्याचं प्रयत्न करावा. मोठा आवाज होणार नाही याची काळजी घ्यावी बाळ झोपले असताना दचकणार नाही याची काळजी घ्यावी.

आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद ! Tinystep परिवाराच्या वतीने वाचकांना नवीन वर्षाची एक भेट देण्यात येणार आहे त्यासाठी इथे क्लिक करा 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon