लहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे
लहान मुल पाच-सहा महिन्याचे झाल्यावर घरातल्या सगळ्यांना बाळाच्या दाताविषयक प्रश्न पडायला सुरवात होते. किंवा मूळचे पोट बिघडले कि दात यायला लागले असतील असं आपल्याला मोठी लोकं सांगतात. आणि मग पालकांना बाळाच्या दंतविषयक अनेक प्रश्न पडू लागतात. बाळाला दात येत असतील तर बाळ रडतं तर त्यावर काय करावे ? बाळ ११ महिन्याचे झाले तरी अजून बाळाला दात नाही आले काय करावे, बाळाला जन्मतःच दात आला हे वाईट आहे कि चांगले असे नाना प्रश्न पालकांच्या मनात येतात. या सर्व प्रश्नाची उत्तरे आम्ही तुम्हांला या लेखाद्वारे देणारा आहोत.
१. बाळाचे दात कधी येतात
२. दाताचे प्रकार
३. काही बाळांना दात उशिरा का येतात
४. बाळाला दात येताना होणारा त्रास
५. बाळांच्या दातांचीकाळजी कशी घ्यावी.
१. बाळाला दात कधी येतात आणि दातांचे प्रकार
साधारणत: मुलाला दुधाचे दात वयाच्या सहा ते नऊ महिन्यांत येऊ लागतात. पण काही मुलांना एक वर्षापर्यंत आणि त्यानंतर देखील येऊ शकतात.
अ. दुधाचे दात म्हणजे काय
बाळाला दुधाचे दात साधारणतः सहा महिन्यांच्या वयात यायला सुरू होतात. हे २० दात असतात हे दुधाचे दात दोन अडीच वर्षापर्यंत पूर्ण येतात नंतर हे दात मुलच्या वयाच्या सहा-सात वर्षेपर्यंत टिकतात. मुल साधरणतः सात वर्षाचे होते त्यावेळी त्याचे हे दुधाचे दात पडायला सुरवात होते आणि नऊ वर्षापर्यंत ते पडत असता ते नऊ या वर्षांमध्ये दात आले त्या क्रमाने पडायला लागतात.
महत्वाचे-दुधाचे दात पडून नवीन पक्के दात जरी येणार असेल तरी दुधाचे दात हे महत्वाचे असतात कारण दुधाचे दात हे लहान मुलांना फक्त खाण्यासाठी व चावण्यासाठीच नव्हे तर बोलण्यासाठी व शब्द उच्चारासाठी गरजेचे असतात.आणि हेच दुधाचे दात जबड्यात नवीन कायमच्या दातांसाठी जागा तयार करतात. त्यामुळे या दातांची देखील काळजी घेणे आवश्यक असते
ब. कायमचे दात म्हणजे काय
कायमच्या दातांमध्ये आधी दाढा यायला सुरवात होते, या दाढा दुधाचे बरेच दात शिल्लक असताना यायला सुरवात होते म्हणून अनेक पालकांना या दाढा या दुधाच्याच दाढा वाटतातपरंतु या कायमस्वरुपी दाढा असतात. ज्याच्याकडे सुरवातीपासून लक्षण देणे आणि काळजी घेणे आवश्यक असते. या दाढा आल्यानंतर वरच्या जबडयाचे पुढचे दात येतात. साधारण ८-९व्या वर्षाच्या दरम्यान बाळाला कायमचे दात येण्याची क्रिया सुरुया असते. मुलाच्या वयाच्या १२ ते १६ वर्षापर्यंत २८ दात आलेले असतात.
क. अक्कलदाढा
अक्कल दाढा येण्याचा नक्की असा कालावधी सांगता येत नाही. वयाच्या १६ व्या वर्षानंतर साधारणतः अक्कलदाढ येतात. अक्कलदाढा जबडयाच्या कोनाशी असल्याने त्याचा फारसा फायदाही होत नाही. हल्लीतर काही जणांनाअक्कलदाढेचा त्रास होतो आणि शस्त्रक्रिया करून काढावी लागते. खरं तर मानवाची जसं जशी उत्क्रांती होत गेली तसं-तसं त्याला अक्कलदाढेची गरज कमी झाली कारण मानवाचे आताचे अन्न हे शिजवून किंवा भाजून खात असल्यामुळे ते जास्त मऊ झाले.
काही मुलांना दात उशिरा का येतात
साधारणतः बाळ ५-६ महिन्याचं झालं कि त्याच्या दात येण्यासाठी हिरड्या टणक व्हायला लागतात आणि बाळाला येणाऱ्या लाळेचे प्रमाण देखील वाढते. बाळाच्या हिरड्या टणक झाल्यानंतर ते बाळाच्या दीड वर्षापर्यंत कधीही दात येऊ लागतात. परंतु काही बाळांना या काळात दात येत नाही अश्यावेळी पालकांनी घाबरून जाण्यासारखे काही नसते.
अनुवंशिकता
अमुक या वेळेनंतर दात येणे, आधी कोणता दात येणे हे बहुतांश अनुवांशिकतेवर देखील असल्याचे आढळून असले आहे. अनेक सुदृढ मुलांच्या एका पालकाचे दात जर समाजा उशिरा आले असतील तर मुलाचे दात देखील उशिरा येण्याची शक्यता असते. तसेच बाळाच्या पालकांपैकी एकाच्या दात येण्याच्या अनुक्रमानुसार बाळाच्या दात येण्याचा अनुक्रम असण्याची शक्यता असते. कधी-कधी आई-वडिलांच्या कुटूंबात कोणाची दात उशिरा येण्याची पद्धत असले तर बाळाचे दात देखील ऊशिरा यतात त्यामुळे काळजी करू नका. मात्र दिड वर्षांच्या आसपास बाळाला दात आले नसतील तर मात्र डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते
काही समस्या
काही बाळे हि शाररिक दृष्टया अशक्त किंवा त्यांची पोषण योग्य प्रमाणात न झाल्यामुळे किंवा मुडदूस झाल्यामुळे बाळाला दात उशिरा येण्याची शक्यता असते. तसेच हायपो थायरॉयडिझममुळे किंवा पिटय़ुटरी ग्रंथीच्या संप्रेरकांच्या आजारामुळे असे होण्याची शक्यता असते. बाळाला दात येण्याची ही प्रक्रिया अगदी अडीच वर्षे वयापर्यंत सुरू राहते.
काही मुलांनाजन्मत:च दात असतात. या दातांबद्दल खूप समज-गैरसमज आढळतात. हे फार दुर्मिळ असले तरी यामध्ये वाईट आणि विचित्र असे काही नाही.
सुदृढ बाळाच्या दात साधारणतः कसे आणि कधी येतात याचे वेळापत्रक जाणून घेण्यासाठी इकडे क्लिक करा.
बाळाला दात येताना होणार त्रास
बाळाला दात यायला लागले कि त्याच्या वागण्यात काही बदल झालेले आढळून येतात यापैकी काही म्हणजे हिरडय़ा सळसळ करायला लागत आणि मुलं दिसेल त्या गोष्टी तोंडात घालायला बघतात. तसेच चावा घेण्याचा वा कुरतडण्याचा प्रयत्न करते.अश्यावेळी अस्वच्छ काहीतरी तोंडात घातल्यामुळे देखील बाळाला जुलाब व्हायला लागतात.
दात येत असताना होणार त्रास सांगता येत नसल्याने चिडचिड करता, काही खायला तयार होत नाहीत. तत बोटं किंवा काहीतरी वस्तू तोंडात घालू लागते. लाळ गळल्यामुळे बाळाच्या तोंडावर हनुवटीवरच्या त्वचेवर पुरळ येते. काही लहान मुले दात येताना स्वत:चे कान ओढताना दिसतात.
बाळाला दात येणाऱ्या त्रासाबाबत आणि त्यावरील उपाय जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
बाळाला दात आल्यावर त्यांची काळजी कश्या प्रकारे घ्याल हे जाणून घ्या
१. बाळाच्या दातांची काळजी हि अगदी बाळाच्या हिरड्या टणक व्हायला सुरवात झाल्यापासून घेणं आवश्यक असते. बाळाला नेहमी दूध पाजून झाल्यावर बाळाच्या हिरड्या स्वच्छ ओल्या कपड्याने साफ कराव्यात
२. तसेच बाळाचा पहिला दात आल्यावर लहान बाळांसाठी मिळणाऱ्या ‘फिंगर ब्रश सिलिकॉनने बनवलेलं असतात त्यामुळे हे उकळत्या पाण्यात टाकून स्वच्छ करता येतात. किंवा आपले बोट स्वच्छ करून बाळाच्या दातावर बिलकुल दाब न देता दात स्वच्छ करू शकता. या दरम्यान टूथपेस्टचा वापर करू नये नुसत्याच बोटाने किंवा ब्रशने घासावे. कमीत-कमी दोन वर्ष पर्यंत मुलचे दात पेस्ट ने घासू नये
३. दात आले नसताना शिव-शिवणऱ्या हिरड्यांना दात नसलेल्या जागी दररोज आपल्या बोटाने मसाज करा.
४. रात्रीच्या वेळेस मुलांना गोड द्रव्य पदार्थ,फळांचा रस वगैरे बाटलीत घालून पाजू नये.
५. रात्री दूध पाजल्यावर हळूच स्वच्छ मऊ ओल्या कापडाने दात आणि हिरड्या पुसून घाव्या
