Link copied!
Sign in / Sign up
17
Shares

लग्नानंतर वजन वाढायला ही साधी कारणे असतात !

           लग्नानंतर खूप स्त्रियांचे वजन वाढून जाते. तर त्याचे कारण कुणालाच माहिती नसते. एकदम वजन कसे वाढते. एकतर हार्मोनल बदलामुळे सुद्धा वजन एकदम वाढून जाते. पण काही वेगळे कारणे आहेत का ते आपण ह्या ब्लॉगमधून बघणार आहोत.

१) स्वतःच्या जेवणावर लक्ष न देणे

लग्नानंतर खूप जबाबदाऱ्या येत असतात. ती पूर्ण घराला सांभाळून सर्व घरच्या देखभालीत तीचे स्वतःचे जेवण बऱ्याचदा राहून जाते. किंवा खूप उशिरा जेवण करते.म्हणून तिच्या जेवणाचा पॅटर्न बिघडून जात असतो.

२) जेवण न करणे

सर्वांची काळजी घेता - घेता, सर्वांचे आवडते जेवण बनवता- बनवता ती दिवसाचे जेवण घेत नाही. आणि रात्रीच ती जेवण घेते. आणि त्यामध्ये पोट भरण्यासाठी ती काहीतरी जंक फूड खाऊन घेते.

३) नवऱ्याला ह्या गोष्टी आवडतात म्हणून ती नवीन खाद्यपदार्थ बनवत असते. मग त्यात खूप मसालेदार डिश बनवणे, आणि लग्नानंतर सुरुवातीच्या दिवसात खूप गोड खाण्यात येत असते. त्यामुळे अचानक कॅलरीचा मारा खूप वाढून वजन वाढून जाते.

४) लग्नानंतर सर्वात जास्त नवीन जोडीदार बाहेर खायला पसंत करतात. रात्रीचे जेवण हमखास बाहेर घेतात आणि ते एकमेकांना समजण्यासाठी चांगलेच आहे. बाहेरच्या खाण्यामुळे कॅलरी लवकर वाढतात कारण जेवल्यानंतर आईस्क्रीम वैगरे गोष्टी येतात.

५) बाळाची चाहूल

लग्नानंतर सर्वजण बाळाचीच वाट बघत असतात त्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात वजन वाढते. दिवसभर काम करण्याने ती खूप दमून जाते. आणि जेवण उशिरा करवून रात्री न काही हालचाल करता झोपून जाते. त्यामुळे तिच्या फॅट मध्ये वाढ होऊन जाते. लग्नानंतर तिचे फिरणे कमी होऊन जाते. आणि बऱ्याच स्त्रियांना वाटते की, समागम केल्यामुळे वजन वाढत असेल तर ते चुकीचे आहे. तसे नसते. समागम ही प्रक्रिया आहे. आणि त्याच्या खूप काही परिणाम शरीरावर होत नसतो. 

आमचा लेख वाचल्याबद्दल धन्यवाद ! आमच्या वाचकांसाठी आम्ही एक सवलत ऑफर देत आहोत त्यासाठी इथे क्लिक करा.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon