ज्या घरात तुम्ही भावाशी भांडतात, खूप दंगा करतात, वडिलांकडे हट्ट धरतात, आणि त्याच घरात ठिकाणी एका कोपऱ्यात रुसून रडलात, त्याच घरात तुमचा वाढदिवस व यशही साजरे होते. ती माणसे तुमच्या सुखात दुःखात साथ देतात. असे आनंदी घर सोडून तुम्हाला जावे लागते. सगळ्या आठवणी मनातल्या कप्प्यात ठेऊन तुम्ही सासरी निघतात. सासरी गेल्यानंतर पुढील
सात गोष्टी ज्यांची तुम्हाला सतत आठवण येते.
१) आईच्या हाताचे जेवण
लग्न झाल्यावर आईने बनवलेल्या जेवणाची मनापासून खूप आठवण येते. ज्यावेळी आवडीची भाजी केली नसेल तेव्हा आई स्वतःच्या हाताने घास भरवते. व तिने भरवल्यावर नावडती भाजीही खाऊ लागतो.आईच्या हातात जादू असते.
२) झोप
आईच्या घरी असतो तेव्हा सकाळी उठायचे काम नसते, उशिरा उठले तरी चालते, आई सकाळी नाश्ता बनवून ठेवते. लग्न झाल्यानंतर सकाळी लवकर उठणे, नाश्ता बनवणे, या गोष्टी कराव्या लागतात. खूप उशिरापर्यंत झोपून राहता येत नाही.
३) तुमची भावंड
असा एकही दिवस नसेल ज्या दिवशी तुमचे भावाशी भांडण झाले नसेल. तरीही त्याचे प्रेम सर्वात जास्त तुमच्यावर असते. भांडण झाल्यावर वडिलांनी तुमची बाजू घेणे व ते त्याने मुकाट्याने मान्य करणे. ह्या सर्व क्षणांची आठवण तुमच्या हृदयाच्या कप्प्यात असते आणि ती सासरी गेल्यावर जास्त यायला लागते.
४) सतत पाठीशी असणारे वडील
कोणत्या कॉलेजला जाऊ, कसा जाऊ, हे क्षेत्र माझ्यासाठी कसा आहे, कोणतं करियर निवडू अश्या सर्व प्रश्नांना उत्तर देणारे, आणि एखाद्या गोष्टीला घरातल्या सर्वाचाच विरोध असेल, तरी तुम्हाला पाठिंबा देणारे वडील.
५) घरकाम
माहेरी आईने सांगितलेली जी कामे करत नव्हता तीच कामे आता इच्छा असो वा नसो करावीच लागतात.
६) जबाबदारी नसणे
लग्न अगोदर वडील घरातल्या जबाबदाऱ्या पार पाडतात, तेव्हा काहीच चिंता नसते. पण आता ह्या नव्या घरात कुटुंबाचे नियोजन स्वतःच करतो तेव्हा लक्षात येते. घर चालवण्यासाठी काय - काय करावे लागते. यावरून वाटते लग्न अगोदर आयुष्य किती निवांत असते.
७) स्वतःचे अस्तित्व
लग्न झाल्यानंतर नवऱ्याची काळजी, सासू - सासऱ्याची देखभाल, काही जबाबदाऱ्या यातच तुमचा वेळ जातो. ह्याच्या अगोदर तुम्ही स्वतःला व स्वतःच्या आवडीला जपलेले असते, ते विसरले जाऊन नवऱ्याच्या आनंदातच तुम्ही आनंद मानायला लागतात. पण तुम्ही खरंच स्वतःला विसरणार का? तुमचे छंद, ते उनाडपणे बोलणे, मैत्रिणी याची तुम्हाला आठवण येतच राहील.
लग्नानंतर ह्याचा त्रास तुम्हाला होईल, पण काहीतरी बदल होण्यात त्रास होतोच. तुम्हाला माहेरची ओढ लागेलच. पण काळजी करण्याचे कारण नाही, एक फोन करून तुम्ही आई - वडिलांशी संवाद साधून मन मोकळं करू शकतात. आणि वाटलंच तर माहेरी जाऊन या, तुम्हाला छान वाटेल.
