Link copied!
Sign in / Sign up
10
Shares

काम-जीवनाविषयी कसे बोलावे ?


लग्न झाल्यावर काही समस्या उद्भवत असतात. पण त्या चार - चौघात बोलता येत नाही. आणि त्या जोडीदारांना एकमेकांना बोलायची शरम वाटते किंवा कसे बोलावे हेच समजत नाही. आणि ते आपल्याकडे सर्वच जोडीदारांचा प्रॉब्लेम आहे. काही वेळा तुमच्या कामजीवनात म्हणावा तितका उत्साह राहील नाही. आणि लग्न झाल्यावर कामजीवन हे खूप महत्वाचे असते. पण ह्यात कोणत्या गोष्टींचा अडथळा येत आहे. त्या तुम्ही संवाद करून सोडवायला हव्यात. तेव्हा लग्न झाल्यावर सेक्स जीवनाविषयी कसे बोलावे आणि ह्यात काही समस्या असतील त्या दोघांनी कशा पद्धतीने सोडवायच्या ह्या विषयी हा ब्लॉग.

१) तुमचा रोमान्स बंद झालाय?
 

जर तुमच्या जोडीदाराने तुमच्याबरोबरचे अगोदरचे होणारे कामुक चाळे आता पूर्णपणे थांबवले असतील, तर त्यावर उपाय म्हणून हा उपाय आजमावून पाहा- तुम्ही फक्त तुमच्या जोडीदाराशी त्याचा स्वाभिमान दुखावला न जाईल, अशा रीतीने बोलून पाहा. तुम्ही यावेळी खेळकर अथवा पोरकट बनून, तुमच्या जोडीदाराचा मूड बदलण्याचा प्रयत्न करु शकता.

२) समागमाबद्दल बोला

जर तुमच्या नातेसंबंध वा लग्नाला प्रारंभ होऊन भरपूर काळ लोटला असेल आणि तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर सेक्सबद्दल कधीही बोलला नसाल, तर तुम्ही या नातेसंबंधात कुठेतरी चुकत आहात. तुम्ही याबाबत बोलणे टाळत असाल कारण तुमच्या जोडीदाराला याबाबत गैरसोयीचे वाटू नये; आणि तसेच असे बोलायला गेल्यास तुमचे हसे होईल, असे तुम्हाला वाटत असेल.

जरी सेक्स हा एक व्यक्तिगत आणि खाजगी विषय आहे; तरी याबाबत बोलण्याने तुमचे नातेसंबंध दृढ होण्यास मदत होऊ शकते. जर तुम्ही याबाबत खूपच लाजाळू असाल, तर बेडवर असताना 'समागम आणि लग्न' यावरचे एखादे पुस्तक वाचायला घ्या. याने तुमच्या जोडीदाराचे लक्ष वेधले जाईल आणि तो तुम्हाला त्यावर प्रश्न विचारेल. अशा प्रकारे तुम्ही लगेच ज्या समस्या भेडसावत आहेत, त्यांवर त्याच्याशी बोलू शकता.

३) गर्भनिरोधके

जेव्हा तुम्ही अनैच्छिक गर्भधारणेचा विचार करत असाल, तेव्हा तुमची समागमाची उत्कट इच्छा बाजूला पडते. शेवटी संभोग ही एक मनोरंजक क्रिया आहे; जी स्त्री आणि पुरुष दोघांनाही सुख प्रदान करते. अशाच एका समागमावेळी जर तुम्हाला तुमच्या सहचऱ्याने कंडोमचा वापर करावा, असे वाटत असेल; तर त्याला तसे सांगून पहा.

लिंग बाहेर काढून घेणे (विथड्रॉअल मेथड) ही अनैच्छिक गर्भधारणा रोखण्याचा खात्रीशीर उपाय असू शकत नाही. म्हणून तुमचे लग्न झाले म्हणून काय झाले? आताही तुम्ही संभोगाचा आनंद घेऊ शकता आणि तुम्ही तयार होईपर्यंत गरोदर होणे टाळू शकता.

४) एकमेकांचे बोलणे ऐका

संसार सुरळीत पार पाडताना तुम्हाला भरपूर संभाषण करावे लागते आणि तुमच्यात नियमित संवाद होतो ना, याची दक्षता घ्यावी लागते. जर तुमचा जोडीदार त्याला सतावणाऱ्या गोष्टींबाबत बोलायचा प्रयत्न करत आहे असे तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही त्याला संधी दिली पाहिजे आणि कोणताही व्यत्यय न आणता त्याचे बोलणे ऐकून घेतले पाहिजे. हा तुमच्या जोडीदाराप्रति आदर दाखवण्याचा एक उत्तम मार्ग आहे. काय माहित, ही अदब पाहून गोष्टी पहिल्यासारख्या सुरळीत पण होतील!

५) विक्षेपांपासून (distractions) दूर राहा

 

 

प्रणयकाळावेळी जर तुम्ही तुम्हाला जोडीदारापासून दूर ठेवणाऱ्या गोष्टी दूर केल्या, तर इथेच तुम्ही अर्धी लढाई जिंकल्यात जमा आहे. जर तुमचा जोडीदार तुम्हाला प्रणयाराधनेचे इशारे करत असेल, तर तेव्हा तुमचा मोबाईल दूर ठेवा.

६) एखादी ट्रिप(सहल) काढा(फक्त दोघांची)

बऱ्याचदा आयुष्यात साचलेपण येऊन जाते. त्यातच घराचा ताण, नोकरीचा ताण, आणि काही अनपेक्षित गोष्टी ह्यामुळे मनावर खूप साचलेपण आणि नैराश्य येते. ते दिसत नाही व जाणवत नाही. पण तुमचा उत्साह कमी होऊन जातो. त्यावरून ते दिसून येते. म्हणून तुम्ही दोघांनी एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी किंवा तुमचे जे आवडते ठिकाण असेल त्या स्थळावर जाऊन एन्जॉय करावा. व त्या ठिकाणी तुम्हाला व्यक्त होता येत असेल तर व्हावे. ह्यातून तुम्ही स्वतःला शांत आणि उत्साहित वाटेल. 

 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon