Link copied!
Sign in / Sign up
22
Shares

लग्नानंतर ह्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील


    नवीन लग्न झाल्यानंतरचे सुरुवातीचे दिवस खूपच ‘ऑसम (awesome)’ असतात. तुमच्या कुटुंबापासून दूर जाणं किंवा नव्या नोकरीची सुरुवात किंवा नव्या जबाबदाऱ्या अंगावर घेणं हे सगळं अगदी खूप साहसी आणि आकर्षक वाटतं. हे तुम्हाला काही नव्या गोष्टी शिकायलाही लावतं ज्या तुम्हाला तुमचं लग्नबंध मजबूत करून तुम्हा दोघांना एक आनंदी जोडपं बनवेल.

१) नाट्यमय बदल न होणे

आपण प्रत्येकजण आपल्या कल्पनाशक्तीच्या भराऱ्या मारत लग्नानंतर आयुष्य कसे पूर्णपणे/नाट्यमयरीत्या बदलते याचा विचार करतो. घरचे लोक आणि मित्रमंडळी लग्न झाल्यावर कसं वाटतं हे विचारत राहतात. पण तुमच्या लक्षात येतं की असा कोणताच अनाकलनीय बदल तुमच्या जगण्यात होत नाही. आयुष्य स्वत:च्या गतीने चालू असते. चित्रपटांमध्ये दाखवतात अशा प्रकारचं काहीच (प्रत्यक्षात) घडत नाही/नसतं. तुम्ही दोघेही लग्नापुर्वीचेच/तेच दोघे असता आणि ते कधीच बदलत नाही.

२) ‘मी’ नाही ‘आम्ही!’

जसं आत्ता सांगितलं, आयुष्य बऱ्याच अंशी सारखंच असतं. अवघड अशा समस्या/आव्हाने येत असतात, तुमची त्यांना सामोरे जाण्याची पद्धत मात्र थोडीशी बदलते. तुम्ही निर्णय घेताना तुमच्या जोडीदाराच्या सोयही विचारात घेता. तुम्ही पूर्वीसारखेच प्लॅन्स बनवता, प्रश्नांची उत्तरे/समस्यांवर उपाय शोधता पण फक्त एकत्र!

३) जबाबदाऱ्या वाटून घेणे

काही गोष्टी अशा असतील ज्या करणं तुमच्यासाठी थोडंसं अवघड असेल मात्र तुमचा जोडीदार ते अगदी सहजपणे करत असेल आणि त्याचवेळी, तुमच्या जोडीदाराला अवघड जाणारी एखादी गोष्ट तुम्ही लीलया पार पाडाल. अशाप्रकारे, तुम्ही तुमची घरगुती कामे आणि इतर जबाबदाऱ्या वाटून घेतल्याने तुमचं घर अगदी व्यवस्थित चालेल. तुमच्या जोडीदाराबरोबर तुमची बलस्थाने आणि कमजोरी/दोष यांची चर्चा करणे तुम्हाला एकमेकांना जाणून घ्यायला मदत करेल आणि तुम्हाला एकमेकांच्या आणखी जवळ आणेल.

४) नाव बदलणे

लग्नानंतर मुलीने आपले नाव बदलावे अशी लोकांची अपेक्षा असेल. मात्र आपलेच नाव यापुढेही लावायचे की आपल्या नवऱ्याचे आडनाव लावायचे हा निर्णय सर्वस्वी मुलीचा असावा. जरित तुम्हीतुमच्या नवऱ्याचे नाव लावले तरी तुम्हाला सुरुवातीला ते थोडेसे विचित्रच वाटेल आणि त्याची सवय व्हायला थोडसा वेळ लागेल. मित्र आणि कुटुंबियांचं तुम्हाला मुद्दामहून तुमच्या नव्या नावाने बोलावणं आणि विनाकारण त्याचा बोभाटा करणं या सगळ्याला अजूनच थोडं विचित्र बनवेल. हे सगळं अगदी सुरुवातीपासून अंगवळणी पडणार नाही, आणि यात काहीही गैर नाही!

५) फावला वेळ न मिळणे

लग्नानंतरच्या पहिल्या काही महिन्यात तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला तुमचा स्वत:चा असा वेळ मिळत नाहीये. तुम्ही तुमचे वीकेंड्स काहीही न करता आणि झोपून काढत नाही. तुम्ही तुमचे छंद आणि आवडी-निवडी यांच्यावर तर पाणी सोडलेलच आहे. त्याऐवजी तुम्ही तुमच्या भविष्याबाबत प्लॅन्स करण्यात किंवा मोठे घर शोधण्यात किंवा एकेमकांना घरगुती कामात मदत करण्यात दंग आहात.

६) बाळ

तुमच्या लग्नानंतर अगदी कोणीही तुम्हाला मुले कधी होणार असे विचारू लागेल. कुटुंबीय आणि नातेवाईक अगदी फालतू कारणे देऊन नियमितपणे याबद्दल विचारत राहतील. मात्र हा एक मोठा निर्णय आहे हे लक्षात ठेवा. अनोळखी लोक किंवा कुटुंबाच्या दबावाला बळी पडू नका. तुम्ही दोघांनी तुमचा हा निर्णय एकत्र कोणत्याही घाई-गडबडीशिवाय घेणं आवश्यक आहे. योग्य वेळी योग्य त्या घटना घडत जातील.

७) मतभेद सोडवणे

लग्नानंतर छोटे-छोटे प्रॉब्लेम्स कमी होत नाहीत. ते वाढतच जातात आणि अजूनच मोठे होतात. असे छोटे प्रॉब्लेम्स रेंगाळत ठेवू नका. जर एखादी गोष्ट खटकत असेल तर जोडीदाराबरोबर बोलून त्यावर उत्तर शोधा. छोट्या भांडणांतून हळूहळू मोठे भांडण सुरु होईल आणि या चक्राला अंतच राहणार नाही. म्हणूनच तुमचा राग वाढू देऊ नका व तुमच्यातील मतभेद जिथल्या-तिथे सोडवा.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon